हिंगणघाट प्रकरणातील आरोपीला कृत्याची जबर शिक्षा लवकरच मिळेल - उपमुख्यमंत्री अजित पवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



मुंबई, दि. 10 : हिंगणघाटमध्ये पेट्रोल ओतून जाळलेल्या शिक्षिकेचा झालेला मृत्यू ही लाजिरवाणी घटना आहे. या गुन्ह्यातील आरोपीला त्याच्या कृत्याची शिक्षा लवकर मिळेल आणि ती इतरांवर जरब बसवणारी असेल. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकार यापुढे अधिक संवेदनशील राहील व गुन्हेगारांविरोधात कठोर भूमिका घेईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिला.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, हिंगणघाटमधील बहिणीला नराधमाच्या हल्ल्यापासून आणि नंतर मृत्यूपासून आपण वाचवू शकलो नाही. ही महाराष्ट्राच्या मातीसाठी लाजिरवाणी घटना आहे. असे गुन्हे रोखण्यासाठी सरकार कठोर भूमिका घेईल. परंतु समाजानेही महिलांच्या सन्मानाप्रती जागरूक राहिलं पाहिजे. आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ न देणे हीच हिंगणघाट हल्ल्यातील मृत बहिणीला खरी श्रद्धांजली असेल. मृत बहिणीच्या कुटुंबियांच्या तसेच समस्त हिंगणघाटवासियांच्या दुःखात सहभागी असल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.