असा होता आठवडा (दि. २६ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२०)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
गेल्या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा गोषवारा (न्यूज डायजेस्ट)

दि. 26 जानेवारी 2020
·      राज्यपालांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे : शहरांच्या विकासाबरोबरच शहराच्या पर्यावरणाचे संरक्षण महत्त्वाचे, राज्यात विकासाच्या नियोजनात पर्यावरणपूरक बाबींवर भर, एकदाच वापरले जाणारे प्लॅस्टिक आणि थर्माकोलच्या वस्तू यावर बंदी घातली असून या बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी, राज्य प्लॅस्टिकमुक्त, कचरामुक्त आणि स्वच्छ करण्यासाठी सर्वांचा पुढाकार आवश्यक. 70 व्या प्रजासत्ताक वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण मुख्यमंत्री श्री.उध्दव ठाकरे यांची उपस्थिती. कान्होजी आंग्रे स्वराज्याचे पहिले सरखेल, चला मुलिंनो खेळू या, चित्ररथाचा संचलनात समावेश.  प्रथमच पोलीस अश्वदलाचा समावेश.
·      भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते तसेच विधानसभेचे अध्यक्ष, श्री.नाना पटोले आणि विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानभवनात ध्वजारोहण.
·      प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण.
·      प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई उपनगर महसुल कर्मचारी उपहारगृह, नवीन प्रशासकीय भवन, वांद्रे (पूर्व) येथे पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवभोजन योजनेचे उद्घाटन.
·      प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापनदिनानिमित्त वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
·      पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते शिवभोजन थाळी योजनेची नायर रुग्णालयात सुरूवात.
·      मुख्यमंत्री श्री.उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांच्याकडून पद्मभूषण,पद्मश्री पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन. उद्योजक आनंद महिंद्रा यांना पद्मभूषण आणि सुरेश वाडकर, पोपटराव पवार,श्रीमती राहीबाई पोपेरे, डॉ. रमण गंगाखेडकर, करण जोहर, श्रीमती एकता कपूर, श्रीमती सरिता जोशी, कंगना रानावत, अदनान सामी, झहिर खान बख्तीयार खान,डॉ. सॅड्रा डिसुझा, सय्यद मेहबूब शहा कादरी उर्फ सय्यदभाई यांना पद्मश्री.
·      मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ना..जोशी मार्ग जंक्शनवरील डिलाईल पुलाच्या पोहोच रस्त्याचे भूमिपूजन, पर्यावरण मंत्री श्री.आदित्य ठाकरे उपस्थित.
·      महालक्ष्मी रेल्वेस्टेशन जवळील दोन उड्डाणपूलांचे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन, पर्यावरण मंत्री श्री.आदित्य ठाकरे उपस्थित.
·      मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयातील प्राणी-पक्षांच्या नवीन सहा प्रदर्शनी कक्षांचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित.
·      मुंबई हरित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेला मियावाकी पद्धतीच्या वनीकरणाचा मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, वडाळ्यातील भक्ती पार्क येथे शुभारंभ.  पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित.
·      एम पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहान आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख 51 हजार रूपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द.
·      प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील शिवाजीनगर पोलीस परेड ग्राउंड येथे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण.

दि. 27 जानेवारी 2020
·      मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील खासदारांची बैठक. महत्वाचे निर्णय : केंद्र शासनाच्या विविध विभागांकडे राज्याच्या प्रलंबित प्रश्नांचा एकत्रित पाठपुरावा करण्यासाठी खासदारांची समिती गठीत, समन्वयकपदी खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती, दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये समितीसाठी जागा. मुख्यमंत्र्यांच्या सूचना : महाराष्ट्राचे प्रश्न संसदेत मांडताना विषयानुरूप टीम तयार करा, त्यात पक्षीय भेदाभेदाला थारा देऊ नका, ज्यावेळी महाराष्ट्रातील विषयांवर खासदार संसदेत विचार मांडणार असतील त्यावेळी सर्व खासदारांनी आवर्जून उपस्थित रहा, सीमा प्रश्नाबाबत सर्वपक्षीय खासदारांनी एकजूट दाखवा, पूर व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी सुमारे 15 हजार कोटी रुपयांपैकी 990 कोटी रुपये मंजूर झाले असून हा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करा, मुंबईमध्ये रेल्वे, केंद्र शासनाशी संबंधित विभागाच्या मोकळ्या जागा आहेत, त्या जागा परवडणारी घरे बांधण्याकरीता द्याव्यात, यासाठी प्रयत्न करा.
·      शिवभोजन थाळीच्या पहिल्याच दिवशी 11 हजार 417 नागरिकांनी लाभ घेतला. 122 शिवभोजन केंद्रे सुरु, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री.छगन भुजबळ यांची माहिती.
·      कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयास भेट. विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा त्यांच्यामार्फत आढावा, व्हर्च्युअल क्लासरुमद्वारे राज्यातील विविध ठिकाणच्याआयटीआयविद्यार्थ्यांशी संवाद.
·      पुणे जिल्ह्यातील नारायणगांवचे सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रनिर्माण युवक संघाचे अध्यक्ष विशाल दिलीप भुजबळ यांचा 'राष्ट्रीय युथ आयकॉन पुरस्काराने' सन्मानित.
·      महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या निर्देशानुसार, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गतघरपोच आहार’ (टीएचआर) आणिगरम ताजा आहार’ (एचसीएम) पुरवठयासाठी अधिकाधिक महिला बचत गट, संस्थांना निविदा प्रक्रियेत भाग घेता यावा म्हणून वार्षिक सरासरी शिलकीची मर्यादा 25 हजार रुपयांवरुन 10 हजार रुपये इतकी कमी करण्याचा निर्णय.
·      बस स्थानकातील स्वच्छता आणि नवीन बसस्थानक उभारण्यासंदर्भात परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली आढावा. मंत्री महोदयांचे निर्देश : बसस्थानकांमधील स्वच्छतेबद्दलच्या प्रवाशांच्या तक्रारी दूर करा, बसस्थानके सुस्थितीत ठेवा, प्रवाशांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा बसस्थानकामध्ये उपलब्ध करुन द्या, बसस्थानकांचा आढावा घेऊन ज्या बसस्थानकाची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे त्याची दुरुस्ती करा. जेथे नवीन बसस्थानके उभी करावयाची आहेत, त्यासाठी आराखडा तयार करा, त्र्यंबकेश्वर, नगर जिल्हातील कर्जत, दापोली या बसस्थानकांचे काम तातडीने पूर्ण करा.
·      विधानसभा अध्यक्ष श्री.नाना पटोले यांच्याद्वारे नागपूर आणि मुंबई महानगरपालिकेतील विविध विषय, तलाव क्षेत्र, ऑटोरिक्षा चालकांच्या समस्या याबाबत आढावा.
·      करोना व्हायरस : 1 जानेवारीपासून चीनहून मुंबईत आलेल्या प्रवाशांच्या प्रकृतीची तपासणी  करण्याचा निर्णय. ‘करोनारुग्णांसाठी मुंबईत कस्तुरबा आणि पुणे येथे नायडू रुग्णालयात विलगीकरण कक्ष. आवश्यकता भासल्यास खासगी रुग्णालयांची मदत घेण्याचा निर्णय, खासगी रुग्णालय निवडीसाठी निकषांचे निर्धारन, ज्या रुग्णालयांचा समावेशकरोनारुग्णांच्या उपचारासाठी आहे तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांना मास्क, खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांना करोनाबाबत मार्गदर्शक सूचना, करोनासंदर्भात शंकांचे निरसन करण्यासाठी कॉल सेंटर. 104 क्रमांकावर संपर्क साधता येणार, चीनच्या वुआन प्रातांतून आलेल्या प्रवाशांवर लक्ष केंद्रीत.
·      मिठी नदीच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाचा, पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्याद्वारे आढावा. या नदीचे प्रदुषण निर्मूलन, स्वच्छता आणि सौंदर्यीकरणाच्या कामाला गती देण्याचे संबंधिताना निर्देश.

दि. 28 जानेवारी 2020
·      मंत्रालयात व्हिडिओलिंकच्या माध्यमातून मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नागपूर मेट्रोच्या ई-प्लागचे उद्घाटन. हिरवी झेंडी दाखवून लोकमान्य टिळक स्टेशन ते सिताबर्डी या ॲक्वालाईनचा शुभारंभ.
·      मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या कारकीर्दीवर आधारित 'एक कलासक्त प्रवास : मातोश्री ते मंत्रालय' या पुस्तकाचे प्रकाशन.
·      महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी यांच्या वतीने देण्यात येणारे डॉ.हॅनिमन जीवनगौरव पुरस्काराचे, वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. अमित देशमुख यांच्या हस्ते वितरण. येणाऱ्या काळात शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे श्री. देशमुख यांचे सूतोवाच.
·      प्रजासत्ताक दिनी शिवभोजन योजनेचा शुभारंभ झाल्यानंतर मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांचा  कोल्हापूर आणि नंदूरबार येथील शिवभोजन केंद्रात जेवणासाठी आलेल्या सर्वसामान्य लोकांशी, व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून संवाद.
·      मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे आणि खा. अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध बँकांच्या प्रतिनिधींची बैठक. म्हाडा आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांना बँकाकडून होणाऱ्या अर्थसहाय्याचा बैठकीत आढावा. म्हाडा आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या प्रकल्पांना बँकांनी आर्थिक पाठबळ दिल्यास घर बांधण्याच्या तसेच  पुनर्वसनाच्या कामाला गती येऊन  सर्वसामान्य माणसाला हक्काचे घर लवकर मिळण्यास मदत होईल, याकडे मुख्यमंत्र्यांनी बँकर्सचे लक्ष वेधले.
·      क्रीडा विभागामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी सुधारित नियमावलीनुसार सन 2018-19 या वर्षासाठी अर्ज करण्याचे आवाहन. शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अंतर्गत उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक), राज्य क्रीडा साहसी पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्कारांसाठी दि. 5 फेब्रुवारी 2020 पर्यंत अर्ज सादर करा. या पुरस्कारासाठी ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येतील. संकेतस्थळ - www.mumbaidivsports.com, www.mumbaidivsports.com.
·      महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे श्री.संजय पंडितराव दौंड यांची महाराष्ट्र विधानपरिषदेवर निवड. विधान भवन, मुंबई येथे विधानपरिषदेचे सभापती श्री. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याद्वारे श्री.दौंड यांना सदस्यत्वाची शपथ.
·      भंडारा जिल्ह्यातील साकोली व लाखांदूर तालुक्यातील विविध विकास कामांना निधी वितरित करण्यासंदर्भात विधानपरिषद श्री. नाना पटोले यांच्याद्वारे ग्राम विकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सामाजिक न्याय, आदिवासी विकास, नगर विकास, अल्पसंख्यांक विभाग आदी विविध विभागांच्या सचिवांना निर्देश.
·      मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर-3 आणि कै. बी.जी. छाया उपजिल्हा रुग्णालय अंबरनाथ येथील सोईसुविधांचा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा. मंत्रीमहोदयांचे निर्देश : मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर  आणि कै. बीजी. छाया उपजिल्हा रुग्णालया अंबरनाथ येथे या रुग्णालयातील रिक्तपदे प्राधान्याने भरा, शस्त्रक्रियागृह, शवविच्छेदनगृह, निवासस्थान, रुग्णवाहिका यांचा दर्जा सुधारा.
·      उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली व राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सदस्य मंडळाची 385 वी बैठक. प्रमुख मुद्दे : ठाणे, बारामती, पिंपरी, चाकण औद्योगिक क्षेत्र भूखंडाबाबत आढावा. भूखंडाचे वाटप, करारनामा, ताबा, इमारत पूर्णत्वाचा दाखला, अंतीम करारनामा, हस्तांतरण याबाबत चर्चा.
·      रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील हातपाटी वाळू उत्पादकांच्या समस्याबाबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची बैठक. हातपाटी वाळू उत्पादकांच्या वाळू उत्खननासाठी प्रतीब्रास हातची किंमत ठरवितांना येणारी तफावत सर्वंकष विचार करून दूर करण्याच्या मंत्रीमहोदयांच्या सूचना.
·      जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत दुष्काळी भागातील नागरिकांना प्रामुख्याने पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या हेतूने प्रस्तावित असलेल्या महत्त्वाकांक्षी दमणगंगा-पिंजाळ व नार-पार-दमणगंगा-तापी-गोदावरी या नदीजोड प्रकल्पाबाबत बैठक. महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी मिळविण्यासाठी महाराष्ट्रालाच मिळावे, अशा भावना मंत्री महोदयांकडून व्यक्त, स्थानिक छोट्या पाटबंधारे प्रकल्पांना यात समावून घेऊन त्यांना गती देण्याचे श्री.पाटील यांचे निर्देश.
·      प्राथमिक आरोग्यसेवेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, ‘आशाकार्यकर्तिंना हॉर्वड विद्यापाठीच्या माध्यमातून कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्यासाठी, आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक. महत्वाचे मुद्दे :  ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यावर भर. उपकेंद्रांचे आरोग्यवर्धीनी केंद्रात रुपांतर.
·      जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या विविध भागात असलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पातील अडचणींबाबत स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत बैठक. दमणगंगा-नार पार खोऱ्यातील प्रमुख नदी जोड प्रकल्पासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ उपस्थित. मंत्री महोदयांचे निर्देश : स्थानिक पातळीवरील समस्या, प्रकल्पातील पाणीसाठा आकडेवारी संदर्भात तसेच इतर अडचणींबाबत तज्ज्ञांकडून तपासणी करा, हिंगोली जिल्ह्यातील मौजे पोटा, जोड परळी व पिंपळगाव कुटे बंधारा प्रशासकीय मान्यतेचा विषय जलपरिषदेत ठेवा, जळगावच्या अमळनेर तालुक्यातील निम्न तापी प्रकल्प प्रकल्पातील अडथळे दूर करून लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण करा. महत्वाचे मुद्दे : निरा देवधर प्रकल्पाच्या डाव्या कालवा व त्यावरील वितरण व्यवस्थेचे काम बंद नलिकेद्वारे सुधारित सर्वेक्षण, गुंजवणी-चापेट प्रकल्पाच्या वाजेघर वांगणी खोरे या उपसा जलसिंचन योजना प्रकल्पात समाविष्ट करून उपसा जलसिंचन योजनेद्वारे क्षेत्र ओलीताखाली, निरा-देवधर प्रकल्प - वेनवडी उपसा जलसिंचन योजना कामांना निधी द्या, निरा-देवधर प्रकल्प, भोर उजवा कालवा अस्तरीकरण निधी.
·      करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत 3997 प्रवाशांचे स्क्रीनिंग. या मध्ये 18 प्रवासी, आठ प्रवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल. राज्यात एकही पॉझीटिव्ह रुग्ण आढळून आला नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे  यांची माहिती.
·      मुंबई आणि महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, फलटण, यांच्या संयुक्त विद्यमाने एलफिन्स्टन महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या तैलचित्राचे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते अनावरण. महत्वाचे मुद्दे : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची एलफिन्स्टन महाविद्यालयात पहिले प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली होती. मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते. महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय दर्जाचा पत्रकारितेचा नवा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी समिती गठित करण्यात येईल. महाविद्यालयांच्या सभागृहासाठी 2 कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, सर्व महाविद्यालयाच्या नावाचे फलक मराठीत लावण्यात येतील. महाविद्यालयातील कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने केली जाईल.मराठी पत्रकारीतेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आणि हिंदी पत्रकारीतेचे पितामह बाबूराव पराडकर यांच्या स्मारकाचे कामही लवकरच पूर्ण करण्यात येईल.
·      ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत ऊर्जा विभागातील विविध योजनांचा आढावा, मंत्री महोदयांचे निर्देश : जुन्या वाहिन्या व वितरण साहित्य बदलून त्यांची क्षमता वाढ करुन ग्राहकांना अखंडीत वीजपुरवठा करण्याचे लक्ष साध्य करा, वीज वितरणातील तांत्रिक त्रुटी कमी करुन ग्राहकांच्या तक्रारींचे तत्काळ निरसन करा, ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करा, लघुदाब ग्राहकांच्या मीटरचे अचुक वाचन होण्याकरिता प्रयत्नशील रहा, घरगुती व्यवसायिक ग्राहकांना डीसीयु, आरएफ मीटरच्या माध्यमातून स्वयंचलित पद्धतीने मीटर वाचन करण्याचे लक्ष द्या, शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे व शासनाच्या अनुदानामध्ये बचत व्हावी या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या सौर कृषी पंप योजनेचे उद्दिष्ट विहित मुदतीत पुर्ण करा,  रोहित्रांचे ऑईल तत्काळ उपलब्ध करा. त्यांच्या दुरुस्तीचे योग्य नियोजन करा. दुरुस्तीस विलंब करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा.
·      वरळीतील नेहरु सेंटर येथे 16 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल फॉर डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिक्शन आणि ॲनिमेशन (मिफ्फ 2020) चे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. अमित देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन.
·      ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये म्हाडा, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण व शासनाच्या जमिनीबाबत आढावा तसेच ठाणे येथील शासकीय जमिनीवर महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणामार्फत सर्वसमावेशक प्रकल्प राबविण्यासंदर्भात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत बैठक.  येत्या तीन वर्षात म्हाडातर्फे पाच लाख घरांची निर्मिती. त्यापैकी 50 हजार घरे पोलीस कर्मचाऱ्यांना व 50 हजार घरे चतुर्थश्रेणी शासकीय कर्मचाऱ्यांना उपलब्ध करुन देण्याची श्री.आव्हाड यांची माहिती.
·      उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतील येत्या वर्षांच्या प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, बुलडाण्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, अकोलाचे पालकमंत्री बच्चू कडू उपस्थित. उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश : राज्यातील सर्व जिल्ह्यांना लोकसंख्या, ग्रामीण लोकसंख्या, जिल्ह्याचे क्षेत्रफळ, मानव विकास निर्देशांक निकषांनुसार जिल्हा वार्षिक योजनेंत देण्यात येणारा निधी कळविण्यात आला आहे. या निधीच्या मर्यादेतच आराखडा तयार करा, जिल्ह्याच्या विकासासाठी देण्यात येणाऱ्या एकत्रित निधीपैकी वीस टक्के निधी शाळांच्या बांधकामासाठी द्या, अमरावती आणि अकोला येथील विमानतळाचा विकास गतीने करा,  वन विभागाच्या आक्षेपामुळे रस्ते आणि विजेची कामे करण्यात येत असलेली अडचण दूर करण्यासाठी नागपूर येथे सर्व यंत्रणांची एकत्रित बैठक घेऊन हे प्रश्न मार्गी काढा, विभागातील लोणार, सिंदखेड आणि शेगाव विकास आराखड्यांची कामे योग्य पद्धतीने करा, लोणार सरोवराजवळील अतिक्रमण हटविण्यासोबतच सांडपाण्यास पायबंद घाला. जलसंधारणाची कामे करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना आवश्यक असलेली इंधनाची सुविधा जिल्हा योजनेतून करा, कमी खर्चात पांदन रस्ते तयार करण्यासाठी अकोला जिल्ह्याला प्रायोगिक तत्वावर 15 कोटी रूपये द्या, प्रयोग यशस्वी झाल्यास राज्यातील इतर भागात हा उपक्रम राबवा.
·      मुंबई विद्यापीठाच्या कलीना संकुलात 14 व्या महाराष्ट्र आंतरविद्यापीठ आविष्कार संशोधन स्पर्धेचे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री श्री.उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन.  सर्वसामान्य माणसांचे जीवनमान उंचावण्यासाठी व समाजपयोगी संशोधनाची बीजे रोवण्यासाठी अविष्कारसारख्या संशोधन स्पर्धा महत्वाच्या असून अशा स्पर्धांच्या आयोजनातून भविष्यातील शास्त्रज्ञ तयार होतील, असे मंत्रीमहोदयांचे प्रतिपादन.
दि. 29 जानेवारी 2020

मंत्रिमंडळ निर्णय
·      सरपंचांची निवड लोकांमधून थेट निवडणुकीऐवजी आता निवडून आलेल्या सदस्यांमधूनच करण्याचा निर्णय. खर्चाच्या विवरणाच्या संदर्भात सुधारीत वेळापत्रकात बदल करण्यास मंजूरी देण्यात आली. संबंधित कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्यात येईल.
·       राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या आधुनिक शिक्षण पद्धतीतील बदल लक्षात घेऊन उच्च व तंत्र शिक्षण विभागातील अधिनस्त अध्यापकांच्या व प्राचार्यांच्या प्रशिक्षणासाठी कंपनी कायद्यान्वये अध्यापक विकास संस्था स्थापन करण्यास मान्यता.
·      राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्नित अशासकीय अनुदानित महाविद्यालयांतील ज्या अधिव्याख्यात्यांनी 1 जानेवारी 1996 पूर्वी पीएच.डी पूर्ण केली आहे, त्यांना 27 जुलै 1998 ऐवजी 1 जानेवारी 1996 पासून दोन आगाऊ वेतनवाढी देण्यास मान्यता.
·      अखिल भारतीय तंत्रज्ञान परिषदेने शिफारस केल्यानुसार शासकीय व अशासकीय अनुदानित पदवी व पदविका संस्था, रसायन तंत्रज्ञान संस्था, शासन मालकीचे अभिमत विद्यापीठ, मांटुगा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथील शिक्षक व समकक्ष पदांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याचा निर्णय.

·      सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या शिष्टमंडळासोबत पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांची बैठक.
·      बिजिंग जागतिक महिला परिषदेच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित कार्यशाळेचे विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्या हस्ते उद्घाटन. कुपोषण, बालमृत्यु, मातामृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष लक्ष देऊन महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच त्यांचे आरोग्य, शिक्षण, आर्थिक सक्षमीकरण याकडे लक्ष  देण्याची श्री.पाटील यांची सूचना.
·      ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत ऊर्जा मंत्री डॉ.नितिन राऊत यांची बैठक. मंत्रीमहोदयांचे निर्देश : उद्योजकांना मिळणारी वीज व त्यावरील दर यासंदर्भातही पुनर्विचार करा. राज्यात उद्योजक यावेत, उद्योग वाढावा यासाठी उद्योजकपूरक असे नवीन ऊर्जा धोरण तयार करा. राज्याच्या 6 विभागातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीला प्रायोगिक तत्वावर वीज देयक वसुलीसाठी नियुक्त करा.  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळालाही त्यांच्या मागणीनुसार नियुक्त करा. याबाबत प्रस्ताव तयार करा.
·      मराठी भाषा विभागाच्या विविध उपक्रमांची मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम  यांच्याद्वारे आढावा. मंत्रीमहोदयांचे निर्देश : मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंबंधीचा असलेल्या प्रस्तावाचा केंद्राकडे प्रलंबित आहे. त्याचा पाठपुरावा करा, यासाठी विविध क्षेत्रातील मराठी मान्यवरांची मदत घ्या, तरुण पिढीला मराठी भाषेची गोडी लागावी, यासाठी उपक्रम सुरू करा, मराठी चित्रपटसृष्टीचे मराठी भाषेमध्ये योगदान आहे, त्यामुळे या क्षेत्रातील गीतकार, पटकथाकार यांना तसेच संकेतस्थळावर विविध माध्यमातून मराठीचा प्रसार करणाऱ्यांना पुरस्कार देण्यासंबंधी विचार करा, मराठी भाषा नव्या पिढीपर्यंत पोचावी, यासाठी यूट्यूबवर बालगीते, कथा यांच्या छोट्या छोट्या चित्रफिती तयार करा.
·      अल्पसंख्याक राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्याक विभागाची आढावा बैठक. मंत्रीमहोदयांचे निर्देश : अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीमध्ये वाढ करा, अल्पसंख्यांक समाजासाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, अल्पसख्यांक समाजातील नागरिकांसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमामधील विविध योजनाचा लाभ राज्यातील जनतेला मिळावा, यासाठी प्रस्ताव पाठवा.
·      उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यामार्फत तंत्रशिक्षण विभागाचा आढावा. मंत्रीमहोदयांचे निर्देश : राज्यात प्रत्येक विभागात एक याप्रमाणे सहा विभागात तसेच रत्नागिरी व कोल्हापूर येथे प्रत्येकी एक याप्रमाणे आठ शासकीय तंत्रनिकेतनमध्ये टप्प्याटप्प्याने कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रम सुरू करा, तीस वर्षे जुन्या आणि जीर्ण झालेल्या तंत्रनिकेतनच्या सर्व इमारतींच्या बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करा, हे स्ट्रक्चरल संबंधित जिल्ह्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या स्थापत्य अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांकडूनच करा, रत्नागिरी येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये कौशल्य विकासावर आधारित नवीन अभ्यासक्रम सुरू करा.
·      कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त 13 फेब्रुवारीपर्यंत कुष्ठरोग निवारण पंधरवडा राज्यात राबविण्यात येणार, त्यानिमित्त ग्रामसभांचे आयोजन करुन कुष्ठरोग निवारणाबाबत शपथ घेण्यात येईल, अशी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती.
·      उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली रायगड येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या  जागेसंदर्भात बैठक. अलिबाग येथील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा अधिग्रहणाच्या कामाला गती देण्यात यावी अशी सूचना श्री. पवार यांचे निर्देश. 
·      कॉमामाहितीपटाचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते विमोचन ; कॅन्सरविषयी जनजागृती आवश्यक असल्याचे सुतोवाच.
·      मुंबई महापालिकेच्या रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे बाधीत होत असलेल्या विले पार्ले येथील दि पेन्टीकोस्टल मिशन सोसायटीच्या चर्चच्या प्रश्नासंदर्भात, अल्पसंख्याक विकास मंत्री श्री. नवाब मलिक यांच्या बैठक मंत्रीमहोदयांचे निर्देश : रस्ता रुंदीकरण करताना चर्च इमारतीच्या होणाऱ्या नुकसानीसाठी योग्य भरपाई द्या, चर्चचे सुयोग्य पुनर्वसन करा, अल्पसंख्याक ख्रिस्ती समाजाच्या धार्मिक हक्कांचे संरक्षण करा.
·      संत चोखामेळा, जन्मस्थळ असलेल्या मेव्हुणाराजा, ता. देऊळगाव, जि. बुलढाणा येथील  समाज मंदिर बांधकामास साडेचार कोटी रुपये देणार असून 14 एप्रिल 2021 ला याचे उद्घाटन करणार असल्याची सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा.
·      मिरा भाईंदर व ठाणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाला आवश्यक परवानगी व निधी देण्यात आला असून या भवनाचे काम तत्काळ सुरु करण्याचे, निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश.
·      बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात विधानसभा अध्यक्ष श्री.नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक.
·      मेट्रो - ३ च्या भुयारीकरणाचा पंचविसावा टप्पा पूर्ण,  कुलाबावांद्रे - सीप्झ या मेट्रो मार्ग ३ च्या भुयारीकरणाचा पंचविसावा टप्पा वरळी येथे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन.
·      महाराष्ट्रात करोना व्हायरसबाधित एकही रुग्ण नाही ; मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 4600 प्रवाशांचे स्क्रिनिंग. आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांची माहिती.
·      मुंबई विद्यापिठाच्या प्राणीशास्त्र अभ्यासमंडळाने तयार केलेल्या प्राणीशास्त्र विषयातील शंभराव्या पुस्तकाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यामार्फत प्रकाशन. विद्यापीठाच्या इतरही अभ्यासमंडळांनी संदर्भ पुस्तके तयार करावीत. आज ऑक्सफर्ड विदयापीठ प्रेस प्रमाणे मुंबई विदयापीठानेही गुणवत्तापूर्ण आणि माफक दरात पुस्तके प्रसिध्द करावीत अशी लोकांकडून अपेक्षा.
·      छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय स्पर्धांच्या आयोजनाविषयी क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री. सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे बैठकीस उपस्थित. छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमधील पारितोषिकांची रक्कम वाढवण्याचा निर्णय.
·      यंदामहालक्ष्मी सरसने गाठला 15 कोटींच्या उलाढालीचा टप्पा ; बचतगट चळवळीमुळे गरीबी निर्मुलनास मदत झाल्याची माहिती ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची माहिती.
·      गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद, महत्वाचे मुद्दे : कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता महाराष्ट्राची पुरोगामी संस्कृती जपत, राज्याच्या परंपरेला गालबोट लागणार नाही, याची काळजी घेतली जाईल, नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी महाराष्ट्र शासनाची भूमिका स्पष्ट असून एकाही नागरिकाला या कायद्याचा त्रास होऊ देणार नाही वा नागरिकत्व गमवावे लागणार नाही.
·      उद्योग राज्यमंत्री श्रीमती आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची 385 वी बैठक. उदगीर आणि कर्जत येथील नवीन एमआयडीसी उभारण्यासाठी तत्वता मान्यता.
·      चीनमधील वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीची ग्रेट वॉल मोटर्स (जीडब्लूएम) कंपनी लवकरच महाराष्ट्रात प्रकल्प सुरू करणार, इलेक्ट्रिक वाहने व बॅटरी निर्मिती करण्यावर ही कंपनी भर, याद्वारे सुमारे पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक, कंपनीच्या प्रतिनिधीसोबत उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई यांची चर्चा.  
·      उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज ऑफिसर्स फोरम, महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी महासंघ, अखिल महाराष्ट्र शैक्षणिक कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी महासंघ यांची विविध मागण्यासंदर्भात बैठक. विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांना 7 व्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्याचे श्री. सामंत यांचे आश्वासन.
दि. 30 जानेवारी 2020
·      राज्याच्या प्रत्येक इंजिनिअरिंग, फार्मसी, डिफार्म, आर्किटेक्ट महाविद्यालयाची सुरवात सकाळी राष्ट्रगीताने करण्याचा निर्णय. उच्च तंत्रशिक्षण घेणारे 20 लाख विद्यार्थी जन गण मन म्हणनारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य असेल. अशी माहिती उच्च तंत्रशिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांची माहिती.
·      विधानसभेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानभवनात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली.
·      ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्या निधनाने नारीशक्तीचा बुलंद आवाज हरवला असून स्त्रीवादी चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची शोकभावना मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्याद्वारे व्यक्त.
·      महालक्ष्मी सरसने यंदा 15 कोटींच्या उलाढालीचा टप्पा गाठला असून  बचतगट चळवळीमुळे गरीबी निर्मुलनास मदत झाल्याची  ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची माहिती.
·      औरंगाबाद, अजिंठा आणि वेरुळ या ठिकाणी असलेला बौद्ध जपानी पर्यटकांच्या सोयीसाठी औरंगाबाद येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (एमटीडीसी) जपानी रेस्टॉरंट सुरु.
·      सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई बाळ यांच्या निधनाने ज्येष्ठ साहित्यिक, कृतिशील संपादक, स्री हक्क चळवळीतील अग्रणी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. स्त्री सक्षमीकरण चळवळीतील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्याद्वारे शोकभावना.
·      ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्या रूपाने स्त्री- पुरुष समानतेसाठी अखेरच्या श्वासापर्यंत झटलेल्या एका पर्वाची आज अखेर झाली, अशा शब्दात महिला व बालविकास श्रीमती मंत्री यशोमती ठाकूर यांच्याद्वारे श्रद्धांजली.
·      केंद्र सरकारच्या युवक व क्रीडा मंत्रालयांतर्गत येणाऱ्या नेहरु युवा केंद्र संघटनेच्या सहसंचालकपदी श्रीमती संध्या देवतळे यांची निवड. हे पद सांभाळणाऱ्या श्रीमती देवतळे या पहिल्या महिला अधिकारी.
·      महिला व बालविकास, ग्रामीण विकास, महिलांचा कौशल्य विकास आदी क्षेत्रात राज्यभरात काम करणाऱ्या एन.जी.ओंचे श्रीमती यशोमती ठाकूर यांच्यासमोर सादरीकरण. महिला आणि बालकांच्या विकासासाठी राज्य शासन विविध प्रकल्प राबवित आहे. या कामामध्ये अशासकीय सामाजिक संघटनांचा (एन.जी..) सहभाग आवश्यक असून प्रशासन आणि एन.जी.. नी समन्वयाने काम करण्याचे महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांचे आवाहन.
·      राज्यभर कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त दि.13 फेब्रुवारीपर्यंत कुष्ठरोग निवारण पंधरवड्यास प्रारंभ.
·      राज्याची स्टार्टअप्ससाठी कार्य करणारी अग्रगण्य संस्था महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) यांच्या संयुक्त विद्यमाने तरुणांसाठी उपयुक्त ठरेल अशा इ - समिटचे आयोजन.
·      डोंगरीच्या बाल निरीक्षणगृहाच्या नवीन इमारतीचे, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन.
·      कोकण विभागासाठी मंजुर असलेल्या क्रीडा संकूलाच्या कामासंदर्भात क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा. माणगावाच्या क्रीडा संकुलाचे काम त्वरीत सुरु करण्याचे मंत्री महोदयांचे निर्देश.
·      हुतात्मा दिनानिमित्त राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी  यांच्याद्वारे राजभवन येथे  दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली.
·      गोरेगाव पूर्व येथील बॉम्बे एक्जीबिशन सेंटरच्या परिसरात सुरू असलेल्या गारमेंट उद्योग प्रदर्शनास उद्योग मंत्री श्री. सुभाष देसाई यांची भेट
·      वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते मुंबईतील मध्य रेल्वेच्या 20 स्थानकांवरील इंटरनेट वायफाय सुविधेचा शुभारंभ.
·      करोना व्हायरस; खबरदारीचा उपाय म्हणून दाखल केलेल्या मुंबईच्या तीन रुग्णांना डिस्चार्ज दिल्याची आरोग्यमंत्री श्री.राजेश टोपे यांची माहिती.
·      नंदुरबार जिल्ह्यातील विकासकामांचा मुख्यमंत्री श्री.उद्वव ठाकरे यांच्याद्वारे आढावा. महत्वाचे मुद्दे :  
नंदुरबार जिल्ह्यातील बहुतेक भाग डोंगराळ आणि दुर्गम असून या भागातील समस्या सोडविण्याला प्राधान्य, डोंगराळ भागाच्या विकासाचा स्वतंत्रपणे विचार,  आरोग्यसेवा पुरविण्यासाठी सहकार्य,  शहादा ग्रामीण रुग्णालय सुरु करण्यासाठी आवश्यक कार्यवाही, दुर्गम भागात मोबाईल नेटवर्क उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा, उकई धरणातून जाणारे 5 टीएमसी पाणी उपयोगात आणण्यासाठी उपसा जलसिंचन योजनेबाबत विचार, सुसरी प्रकल्पासाठी 1.75 कोटी व धनपूर प्रकल्पासाठी 1.5 कोटींचा निधी, नवापूर एमआयडीसी क्षेत्रात फुड पार्क.
·      उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील महिला महाविद्यालयासंदर्भात आढावा. राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांची उपस्थिती. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी)  महिला विद्यापीठ अंतर्गत श्रीवर्धन येथे महिला महाविद्यालयामध्ये नवीन अभ्यासक्रमाचा समावेश करुन श्रीवर्धन येथे या महाविद्यालयाचा परिसर विकसित करण्याचा निर्णय.
·      उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांच्या उपस्थितीत एकात्मिक विद्यापीठ व्यवस्थापनप्रणाली संदर्भात आढावा. महाआयटी अंतर्गत एकात्मिक विद्यापीठ व्यवस्थापन प्रणाली (आययुएमएस) राज्यातील 14 विद्यापीठे आणि साडेचार हजारांपेक्षा अधिक महाविद्यालय यांचे एकत्रितरीत्या नियंत्रण करता यावे, यासाठी विकसित करण्यात आली आहे. ज्या विद्यापीठांनी या प्रणालीद्वारे काम सुरु नसेल त्यांनी तत्काळ या प्रणालीचा वापर सुरु करण्याचे श्री.सामंत यांचे निर्देश.
·      मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जिल्ह्याच्या विकास कामांचा आढावा. महत्वाचे मुद्दे : शेतकरी केंद्रबिंदू मानून त्यांचे जीवन सुखकर होण्यासाठी शासन प्रयत्नशील, शेतकऱ्यांना पिकांना पाणी देतांना होत असलेला त्रास लक्षात घेता कृषीपंपाना दिवसा जास्तीत जास्त वेळ वीज उपलब्ध करुन देण्यासाठी नियोजन, अपुरे सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य, जळगाव जिल्ह्यातील निम्नतापी प्रकल्प, पद्मालय सिंचन प्रकल्प, बलुन बंधारे शेळगाव बॅरेज, वरखेड लोंढे प्रकल्पाची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न, अंजनी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राचा अभ्यास,  जळगाव जिल्ह्यातील क्रीडा संकुलांचे अपुरे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी, चाळीसगाव येथील कत्तलखान्याची चौकशी, एक महिन्यात चाळीसगाव-मालेगाव रस्त्यांची दुरुस्ती, चाळीसगाव येथे सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रशासकीय इमारत बांधण्यास मंजुरी. अमळनेर येथील रुग्णालयास दर्जोन्नती, जळगाव बायपासमध्ये जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला देण्यास प्राधान्य, धानोरा येथील सबस्टेशन उभारण्याची तातडीने कार्यवाही., महानगरपालिका व नगरपालिकांना एलईडी लाईटचा वेळेवर पुरवठा होण्यासाठी संबधीत एजन्सीशी करण्यात आलेल्या कराराचा आढावा.
·      समाजसेविका, लेखिका व कवयित्री मंजू लोढा यांच्याऑल दॅट आय ऍमया चरित्रात्मक कॉफी टेबल पुस्तकाचे राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन.
·      मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली धुळे जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा. महत्वाचे मुद्दे : अपघातप्रवण क्षेत्रात ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यास शासनाचे प्राधान्य, राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील 1200 गावांचापेसामध्ये समावेश करण्यासाठी शासनाचा प्रस्ताव. आठ दिवसात केंद्र शासनास सादर, साक्री येथील मोडकळीस आलेल्या बसस्थानकाची दुरुस्ती, धुळे शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी मालेगाव रोडवर उड्डाणपूल. निम्न पांझरा, अक्कलपाडा धरण पूर्ण भरण्यासाठी आवश्यक असलेली भूसंपादनाची अडचण लक्षात घेता हे धरण भरल्यानंतर त्याखालील धरण भरुन जलसाठा वाढविण्यात येईल, शेतकऱ्यांच्या पीकविम्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नवीन कंपन्यांशी चर्चा सुरु. शिरपूर हे महामार्गावरील महत्वाचे शहर असल्याने येथील आरोग्य केंद्राचा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य.
·      रवींद्र नाट्य मंदिर येथे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य शासनाचा २०१९-२० या वर्षातीलगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न. जेष्ठ संगीत दिग्ददिर्शिका श्रीमती उषा खन्ना यांचा लता मंगेशकर पुरस्काराने सन्मान.
·      विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे महिलांच्या सर्वंकष सक्षमीकरणासाठी युवा पिढिने महिला सबलीकरणाची लढाई जिद्दीने लढावी असे आवाहन. बिजिंग येथील चौथ्या विश्व महिला संमेलनास (२८ ऑगस्ट,१९९५ ते १४ सप्टेंबर, १९९५) २५ वर्षे  पूर्ण होत असल्याने राज्य व देशपातळीवरील झालेली प्रगती आणि त्याबाबतची आव्हाने याबाबतचा आढावा घेण्यासाठी  विधानभवनात कृती कार्यशाळेत प्रतिपादन.
·      मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा. महत्वाचे मुद्दे : नाशिक जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मुंबई-पुणे-नाशिक हा सुवर्णत्रिकोण पूर्ण करण्याच्यादृष्टीने आवश्यक कार्यवाही, मालेगाव तालुक्यातील समस्या सोडविण्यासाठी आवश्यक सहकार्य व मालेगांवच्या सर्वांगीण विकासावर भर, शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना वीज पुरवठा करण्यासाठी पोर्टल तयार करण्याच्या कार्यवाहीला गती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक येथील उपकेंद्र कार्यवाही करण्यासंदर्भात एक आठवड्यात निर्णय, नदीजोड प्रकल्प, पाणी आरक्षण प्रश्नांबाबत स्वतंत्ररीत्या बैठक, आदिवासी भागातील प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांना वाळू पुरवठा करण्यासाठी  जिल्हा प्रशासनाकडून कार्यवाही, मनमाड पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक प्रयत्न.
·      मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगर जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा. महत्वाचे मुद्दे : निळवंडे धरणाची कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक अकराशे कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करण्यात येऊन येत्या दोन वर्षात कामे पूर्ण करणार, पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासंदर्भात राज्यस्तरावर पुन्हा आढावा, शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना वीज पुरवठा करण्यासंदर्भात सप्टेंबर 2018 पर्यंतचे अर्ज निकाली काढण्यात येत आहेत, नवीन अर्जासाठी पोर्टल सुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाशिक आणि अहमदनगर येथील उपकेंद्र कार्यान्वित करण्यासंदर्भात निर्णय, शिर्डी विमानतळ विस्तारीकरणासंदर्भातील निर्णय लवकरच, श्रीरामपूर येथे 220 केव्ही उपकेंद्र, एमआयडीसी मध्ये आवश्यक सुविधा.
दि. 31 जानेवारी 2020
·      ज्येष्ठ समाजसेवी श्री. अझिज मक्की यांच्या समाजसेवा कार्याला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अंजुमान ए इस्लाम शिक्षण संस्थेच्या वतीने, अंजुमनच्या करिमी ग्रंथालय येथे राज्यपाल श्री.भगत सिंह कोश्यारी यांच्या सत्कार.
·      मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट देऊन पहाणी. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाला विशेष दर्जा देऊन संग्रहालयातील दुर्मिळ आणि नवी ग्रंथसंपदा संवर्धन आणि वाचकांसाठी मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याची श्री. सामंत यांची घोषणा.
·      मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे मेट्रो आणि युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक यांच्यात सामंजस्य करार, पुणे मेट्रो प्रकल्पासाठी युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक पहिल्या टप्प्यात 1600 कोटी रुपयांचा पुरवठा करणार.
·      मृद व जलसंधारण राज्यमंत्री श्री. दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली रायगड जिल्ह्यातील जलसंधारण कामांचा आढावा. रायगड जिल्ह्यात सुरू असलेली जलसंधारणाची कामे गतीने पूर्ण करण्यासह भूसंपादनाच्या कारणास्तव प्रलंबित असलेली कामे मार्गी लावण्याचे श्री भरणे यांचे निर्देश.
·      कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर चीनमधील हुवान शहरात, हुबई सायन्स अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातील  काही विद्यार्थी - विद्यार्थिनी अडकून पडले आहेत, त्यांना मदत करण्याचे, आरोग्य राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे चीनमधील भारतीय दुतावासाला आवाहन.
·      मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांची फिक्की (द फेडरेशन ऑफ इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री ) च्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा, उद्योग उभारणीसाठी उद्योजकांनी पुढाकार घेण्याचे श्री.ठाकरे यांचे आवाहन.
·      इतर मागास वर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग,विमुक्त जाती,भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग मंत्री श्री.विजय वडेट्टीवार यांची पत्रकार परिषद ; प्रमुख मुद्दे : विजाभजविद्यार्थ्यांसाठीच्या मॅट्रीकोत्तर प्रलंबित शिष्यवृत्ती तत्काळ देणार, ‘डीबीटीयोजनेत काही अडचणी दूर करणार, ‘ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या नवीन वसतीगृहासाठी सध्या भाड्याची इमारत उपलब्ध करुन देणार, वसतीगृहाकरीता कायमस्वरुपी इमारतीसाठी सरकारी जागा निश्चित करणार, राज्यात अशी 72 वसतीगृहे उभी करणार, आश्रमशाळांची गुणवत्ता तपासणी करणार, वसंतराव नाईक तांडा /वस्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणार, इमाव, विजाभज व विमाप्र या समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी  सारथी, बार्टी या संस्थांच्या  धर्तीवर नागपूर येथे महाज्योती संस्था निर्माण करणार, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणार, भटक्या जमाती-, धनगर समाजाच्या लोकांसाठी शासनाने 12 योजनांचे निर्णय निर्गमित केले आहेत, त्यांची तातडीने अंमलबजावणी करणार, इमाव, साशैमाप्र, विजाभज व विमाप्र समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी शाळेत प्रवेश देणार, धनगर समाजासाठी 10 हजार घरकुले बांधणार, भटक्या विमुक्त जमातीतील वडार, रामोशी, नाथजोगी,पारधी व अन्य तत्सम  जातीमध्ये अजूनही आर्थिक शैक्षणिक दृष्ट्या मागासलेपण असून त्यांच्या विकासासाठी काही सुविधा उपलब्ध करुन देणार, पुढील आठवड्यात यवतमाळ जिल्ह्यातील दुर्गम तांड्यांना भेटी देणार, सारथी संस्थेच्या अनियमिततेचा प्राथमिक अहवाल प्राप्त.
·      करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी रुग्णालयात दाखल केलेल्या व्यक्तिंच्या डिस्चार्जसाठी केंद्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी. संबंधित व्यक्तीचा चाचणीसाठी पाठविलेला नमुना जर निगेटीव्ह आला तर त्याला डिस्चार्ज देऊन 14 दिवसापर्यंत पाठपुरावा करण्याच्या केंद्राच्या सूचना, संचालक, आरोग्य सेवा, पुणे यांच्या नवीन मध्यवर्ती इमारतीमधील कार्यालयात करोना नियंत्रण कक्ष स्थापन. संपर्क : दूरध्वनी क्रमांक ०२० - २६१२७३९४.
·      झोपडपट्टी पुनर्वसन (झो.पु.) प्रकल्पांच्या कामांचागृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याद्वारे आढावा. मंत्रीमहोदयांचे निर्देश : ज्या विकासकांनी गेल्या 10 वर्षात प्रकल्पग्रस्त सदनिकाझो.पु.’ प्राधिकरणाकडे विहित कालावधीत हस्तांतरीत केल्या नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा, पंचशीलनगरमध्ये सुसज्ज बुद्ध विहार बांधण्यासाठी सुधारित आराखडा झो.पुप्राधिकरणाकडे त्वरीत सादर करा, हनुमाननगर पार्कसाइड विक्रोळी (.) येथीलझो.पुप्रकल्पाबाबत सुधारित आराखडा तयार करुन येत्या 15 दिवसात विकासकाबरोबर बैठक घ्या, सांताक्रुझ येथील शिवालीक व्हेन्चर्सच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांचे प्रलंबित राहिलेले काम येत्या तीन आठवड्यात सुरु करा, रहिवाशांचे थकीत भाडे अदा करा. 
·      राज्यशासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2019 साठी प्रवेशिका पाठविण्यास 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ.
         कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.