एकात्मिक विद्यापीठ व्यवस्थापन प्रणाली विद्यापीठांनी तातडीने राबवावी - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत निर्देश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 8 : महाआयटी अंतर्गत एकात्मिक विद्यापीठ व्यवस्थापन प्रणाली (आययुएमएस) राज्यातील 14 विद्यापीठे आणि साडेचार हजारांपेक्षा अधिक महाविद्यालये यांचे एकत्रितरित्या नियंत्रण करता यावे, यासाठी विकसित करण्यात आली आहे. ही प्रणाली अनेक विद्यापीठांनी सुरू केली आहे. मात्र काही विद्यापीठांचा यात समावेश झालेला नाही, त्यांनी तातडीने प्रणाली सुरू करावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले. 

श्री.सामंत म्हणाले, ज्या विद्यापीठाने आययुएमएस ही प्रणाली सुरू केली नाही, त्या विद्यापीठाने  तातडीने  सुरू करावी. यामधून कोणत्याही विद्यापीठाला बाहेर राहता येणार नाही. सर्व विद्यापीठाच्या कामांमध्ये सुसूत्रता यावी यासाठी विद्यापीठांमध्ये एकात्मिक विद्यापीठ व्यवस्थापन प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामध्ये 14 विद्यापीठ, 4 हजार 600 पेक्षा अधिक महाविद्यालये, 26 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी आणि 80 हजारपेक्षा अधिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश आहे.

त्यामध्ये विद्यापीठांच्या आणि महाविद्यालयांच्या ॲकेडमिक, प्रवेश, महाविद्यालय, मनुष्यबळ व्यवस्थापन, प्रशासन यांच्याशी निगडीत मॉड्युल्स यांचा समावेश आहे. याअंतर्गत गुणवत्तेच्या आधारे प्रवेश, जागा वाटप, नोंदणी प्रक्रिया, वसतीगृह नोंदणी, हजेरी, शुल्क अभ्यासक्रम तयार करणे, ॲकेडमिक कॅलेंडर, परिक्षा व्यवस्थापन, संशोधन व्यवस्थापन, ई-सर्व्हिस बुक, पदोन्नती, भरती, पेन्शन, वित्त, लेखा, ई-निविदा, ग्रंथालय यासारखे सर्व विभाग एकत्रित जोडले जाणार आहे. त्यामुळे ज्या विद्यापीठाने ही प्रणाली सुरु केली नाही, त्यांनी ही प्रणाली तातडीने सुरु करावी. या प्रणालीमुळे राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या विद्यापीठांची माहिती एकत्रितपणे उच्चस्तरीय पातळीवर उपलब्ध असेल, असेही श्री.सामंत यांनी सांगितले.
000000
काशिबाई थोरात/वि.सं.अ/08/02/2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.