प्राध्यापक वेतन निश्चिती प्रकरण : विद्यापीठ छाननी समिती आणि महाविद्यालयात समन्वय राखण्याच्या मंत्री उदय सामंत यांच्या सूचना

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 3 : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाविद्यालयातील  सहाय्यक प्राध्यापकांच्या वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणीमध्ये पदोन्नती करताना छाननी समिती आणि मूल्यमापन समिती गठित करुन त्याची वेतननिश्चिती करण्यात येते. मात्र यामध्ये विलंब होऊ नये, यासाठी महाविद्यालय आणि विद्यापीठ यांच्यात समन्वय असावा, अशा सूचना श्री. सामंत यांनी केल्या.

विधानभवनात औरंगाबाद विभागातील प्राध्यापकांच्या विविध अडचणींसंदर्भात आढावा बैठक आयोजित केली होती. त्यावेळी श्री. सामंत बोलत होते. बैठकीला आमदार विक्रम काळे, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय व संबंधित अधिकारी उपस्थित होते.श्री. सामंत म्हणाले, प्राध्यापकांचे नुकसान होऊ नये यासाठी प्राध्यापकांच्या पदोन्नतीसंदर्भात समितीने पदोन्नती मान्य केलेल्या दिनांकापासून पदोन्नतीचा दिनांक निश्चित करुन त्यांची वेतननिश्चिती करावी.    यासाठी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालय यांनी समन्वय राखून कार्य करावे. तसेच तासिका तत्वावरील पदासाठी पात्र उमेदवार न मिळाल्यास पदव्युत्तर पदवीधर यांना संधी मिळावी, यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल आणि विद्यापीठातील 6 हजार 690 अधिकारी/कर्मचाऱ्यांना काही तांत्रिक अडचणींमुळे 7 व्या वेतन आयोगानुसार वेतन मिळत नाही त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.