गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील गौणखनिजापासून मिळणाऱ्या स्वामित्व धनाबाबत आढावा बैठक संपन्न

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि.5 : गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील गौणखनिजापासून मिळणारे स्वामित्व धन याबाबत विभानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.
         
जिल्हा पातळीवर रेती व इतर  गौण खनिज यासंदर्भातील काम करताना विकास कामांना अडचणी निर्माण होणार नाही याची दखल घेण्यात यावी. केंद्र शासन व राज्याच्या असलेल्या योजनांबाबतची  माहिती  देण्यात यावी. विकासकामे करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनची बैठक दर महिन्यात घ्यावी, अशा सूचनाही  श्री. पटोले यांनी दिल्या.

गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील जलसंपदा विभागांतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये गोंदिया व भंडारा जिल्हा कंत्राटदार असोसिएशनच्या समस्यांसंदर्भात श्री. पटोले यांनी आढावा घेतला.

या बैठकीत महसूल व वन विभागाचे सह सचिव रमेश चव्हाण, गोंदियाचे अपर जिल्हाधिकारी सुभाष चौधरी, विदर्भ हॉटमिक्स कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष बॉबी वालिया, सचिव प्रदीप नगराळे कॉन्ट्रक्टर बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष प्रविण महाजन आदी अधिकारी उपस्थित होते.
००००
संगीता बिसांद्रे/5.2.2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.