रवींद्र नाट्य मंदिरात ४ ते ६ फेब्रुवारीला पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 1:  सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार व शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन  4, 56 फेब्रुवारी 2020 रोजी करण्यात आले आहे. हा महोत्सव रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे आयोजित करण्यात आला असून महोत्सवाचे हे सातवे वर्ष आहे.

या महोत्सवादरम्यान ज्येष्ठ सतारवादक पंडित अरविंद परिख यांना या वर्षीचा पंडित भीमसेन जोशी पुरस्कार देण्यात येत आहे. या पुरस्काराचे स्वरूप 5 लाख रुपये, मानपत्र तसेच मानचिन्ह असे आहे. पं. परिख आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार असून त्यांनी देश-विदेशात सतार वादनाचे असंख्य कार्यक्रम केले आहेत.

शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन
तीन दिवस संगीत महोत्सवात एकूण सात कलावंत आपली कला सदर करणार आहेत.
दिनांक 4 फेब्रुवारी : पूर्वी पारेख (गायन), वरद भोसले (सतार वादन), संजय गारुड (गायन)

दिनांक 5 फेब्रुवारी : पंडित मोहन दरेकर (गायन), कैलास पात्रा (व्हायोलीन वादन)

दिनांक 6 फेब्रुवारी : डॉ. श्रुती सडोलीकर-काटकर (गायन), दीपक क्षीरसागर (गिटार वादन)
दि. 4,5,6 फेब्रुवारी तिन्ही दिवस रसिकांसाठी उत्तम संगीत मेजवानी रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी येथे सायं.6.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या संगीत महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य असून जास्तीत जास्त रसिकांनी या महोत्सवाला उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची रंगत वाढवावी असे आवाहन  सांस्कृतिक कार्य संचालनालयमार्फत करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.