आंगणेवाडीच्या यात्रेच्या विकासकामांसाठी १३.५ कोटींच्या कामाला मंजुरी - मंत्री उदय सामंत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 6 : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथे होणाऱ्या यात्रेच्या अनुषंगाने विकासकामांना गती देण्यासाठी 13.5 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे दिली.

श्री.सामंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंगणेवाडी येथे यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहतात. येणाऱ्या भाविकांना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी या मार्गावरील काही रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच स्थानिक नागरिक आणि भाविक यांच्या मागणीनुसार यात्रेची जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे.

या विकासकामासाठी निधीची कमतरता नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी एक महिन्यात 13.5 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्हा नियोजन अंतर्गतच्या कामासाठी वार्षिक आराखड्यातील विकासकामांनाही सुरुवात करण्यता आली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.