हिंगणघाट येथील महिला अध्यापिकेच्या निधनाबद्दल राज्यपालांना तीव्र दुःख

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 10 : हिंगणघाट येथे जळीत प्रकरणात गंभीर जखमी झालेल्या महिला अध्यापिकेच्या निधनाबद्दल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आपल्या शोकसंवेदना कळविल्या आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत असलेल्या हिंगणघाटच्या अध्यापिका असलेल्या मुलीचे नागपूर येथे निधन झाल्याचे समजून अतिशय दुःख झाले. आज संपूर्ण समाज आक्रोशित आहे. ही दुर्दैवी घटना संपूर्ण समाजाला आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे. आज मुली आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर सर्वच क्षेत्रात प्रगती करीत आहेत. नवनवीन जबाबदाऱ्या व आव्हाने समर्थपणे पेलत आहेत. महिलांचा सर्वंकष उत्कर्ष होण्यासाठी समाजाचा महिलांप्रती दृष्टीकोन अधिक सकारात्मक होणे आवश्यक आहे. या दु:खद प्रसंगी मी मुलीच्या आई-वडिलांना आपल्या तीव्र शोक संवेदना कळवितो, असे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
00000‘Deeply saddened by the demise of woman lecturer” : Governor

Mumbai, 10th Feb : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari has expressed grief over the demise of the woman lecturer from Hinganghat who succumbed to her injuries in a Hospital in Nagpur today. In a condolence message, the Governor has said:

“I am deeply saddened to know about the passing of the young woman lecturer from Hinganghat who lost her battle to death. The entire society is agitated today. The unfortunate incident has compelled each one of us to introspect. Today women are progressing in all walks of life. They are assuming newer responsibilities and tackling challenges efficiently.  In order to further hasten the progress of women, society must bear a positive attitude towards them.  I convey my heartfelt condolences to the parents of the unfortunate girl in this moment of grief.”

००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.