कोल्हापूर चित्रनगरीला अधिक सोयी सुविधा देण्याचे सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे निर्देश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 20 : कोल्हापूर चित्रनगरीचा दर्जा उन्नत करून चित्रीकरणासाठी अधिकाधिक प्रतिसाद मिळावा याकरिता सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात, अशी सूचना सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज येथे केली.

विधानभवनामध्ये झालेल्या बैठकीत राज्यमंत्री श्री. पाटील यांनी सांस्कृतिक कार्य विभागाचा आढावा घेतला.

यावेळी राज्यमंत्री श्री. पाटील म्हणाले, मराठी चित्रपटसृष्टीसाठी कोल्हापूरची चित्रनगरी महत्त्वपूर्ण ठरत आहे. या ठिकाणी अनेक नामवंत दिग्दर्शक, कलाकारांनी चित्रपट निर्मिती केली आहे. त्यामुळे याठिकाणी अधिकाधिक चित्रपटांचे, मालिकांचे चित्रीकरण होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुविधा निर्माण कराव्यात.

कोल्हापूर चित्रनगरीमध्ये रेल्वे स्थानक उभारणी प्रस्तावित असून त्याचे काम झाल्यास हिंदी चित्रपट निर्मात्यांकडूनही चित्रनगरीसाठी योग्य तो प्रतिसाद मिळू शकतो, असेही राज्यमंत्र्यांनी सांगितले. रेल्वे स्थानकासोबतच या ठिकाणी विमानाची प्रतिकृतीदेखील ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

पु.ल. देशपांडे कला अकादमीच्या माध्यमातून नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ (एनएसडी)च्या धर्तीवर महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा’ (एमएसडी) हा दोन वर्षांचा नाट्य अभ्यासक्रम सुरू करण्याचे प्रस्तावित असून पदवी आणि पदव्युत्तर असा हा अभ्यासक्रम असेल, असेही राज्यमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

यावेळी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या विविध शाखांचे सादरीकरण करण्यात आले.
००००
अजय जाधव/विसंअ/12.2.2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.