'व्हर्च्युअल क्लासरुम'च्या माध्यमातून शिक्षणसंस्थांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे मंत्री उदय सामंत यांचे आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


विज्ञान संस्थेचा पदवीदान सोहळा 

मुंबई, दि.7 : व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शहरी भागासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा सेतू शिक्षण संस्थांनी तयार केला पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या संशोधनाला चालना देत त्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी विद्यापीठ आणि संस्थांनी कटिबद्ध असले पाहिजे,  असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

ते आज विज्ञान संस्थेच्या वार्षिक पदवीदान समारंभात बोलत होते.

महाराष्ट्र शासनाच्या विज्ञान संस्थेने शंभर वर्ष पूर्ण केली आहेत. या संस्थेतून अनेक थोर तज्ज्ञ, शास्त्रज्ञ निर्माण झाले आहेत. आज पदवी घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी उद्याचा महाराष्ट्र आणि देश घडविण्यासाठी कार्यशील राहतील.  विद्यार्थ्यांनी स्वतःचा आदर्श निर्माण  करून महाराष्ट्राचे नाव मोठे करावे, असे श्री. सामंत म्हणाले.राज्यातील विद्यार्थी सर्व क्षेत्रांमध्ये गुणवत्तेच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण करीत आहेत. विशेषत: आजच्या या पदवी प्रदान सोहळ्यात विद्यार्थिनींची दिसणारी लक्षणीय संख्या पाहून आनंद होतो, असेही श्री.सामंत यांनी सांगितले.

यावेळी संस्थेचे संचालक डॉ. जयराम खोब्रागडे, प्रमुख अतिथी प्रा. एस. मजुमदार, प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
००००
काशीबाई थोरात वि.स. अ.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.