अमरावती जिल्ह्यात तूर, हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याचे विधानसभा अध्यक्षांचे निर्देश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 11 : अमरावती जिल्ह्यात शासकीय तूर, हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत विधानभवनात बैठक झाली.

श्री.पटोले म्हणाले, नाफेड अंतर्गत शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी केली जाते. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा तसेच त्यांना वेळेवर पैसे देण्याबाबत त्वरीत कार्यवाही करावी. राज्यातील खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी. उर्वरित खरेदी केंद्रेही त्वरीत सुरु करावी, अमरावती जिल्ह्यात शासकीय तूर, हरभरा खरेदी केंद्रासाठी नोडल एजन्सी व सबएजंट संस्थेने शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घ्यावी, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

राज्यातील ‘नाफेड’ची बैठक लवकरच घेण्यात येईल. हरभरा खरेदीबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला असून राज्यात लवकरच त्याची खरेदी सुरु होईल, असेही श्री.पटोले यांनी सांगितले.

यावेळी ऊर्जामंत्री नितीन राऊत, आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार विरेंद्र जगताप, महाराष्ट्र मार्केटींग फेडरेशनचे मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक योगेश म्हसे, नाफेड मुंबई ब्रँच मॅनेजर पुनीत सिंग, मार्केटींग फेडरेशनचे नागपूरचे संजय निचल, पणन विभागाचे अवर सचिव श्रीमती सुनंदा घड्याळे आदी उपस्थित होते.

००००

प्रवीण भुरके/11.2.2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.