शिवभोजन थाळीचा राज्यातील १ लाख ४८ हजार ८२० नागरिकांनी घेतला लाभ - मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई दि. 6 : प्रजासत्ताक दिनापासून (दिनांक 26 जानेवारी) सुरु झालेल्या शिवभोजन थाळीचा राज्यातील 1 लाख 48 हजार 820 नागरिकांनी लाभ घेतल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राह‍क संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

श्री.भुजबळ म्हणाले,  राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला  सवलतीच्या दरात जेवण उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने शिवभोजन योजना सुरु केली आहे. शिवभोजन ही शासनाची महत्वाकांक्षी योजना असून तिची राज्यात काटेकोर  आणि व्यवस्थित अंमलबजावणी सुरु आहे. आतापर्यंत राज्यात 126  शिवभोजन केंद्रे सुरु करण्यात आली असून या केंद्रांच्या माध्यमातून गरीब जनतेला 10 रुपयात जेवण उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेला मिळत असलेला प्रतिसाद पाहता भविष्यात याची व्याप्ती वाढविण्यात येईल, असेही श्री. भुजबळ यांनी सांगितले.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.