नागरी सेवा परीक्षेतील पात्र उमेदवारांना मिळणार नवी दिल्लीत मुलाखतीचे मोफत प्रशिक्षण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 6 :  केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये  उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील उमेदवारांना नवी दिल्लीत मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. या विभागातर्फे अभिरुप मुलाखत प्रशिक्षण व क्षमतावृद्धी कार्यक्रमाचे आयोजन दि. 08 फेब्रुवारी ते 29 मार्च 2020 पर्यंत जुने महाराष्ट्र सदन, कोपर्निकस मार्ग, मंडी हाऊस जवळ, नवी दिल्ली -110001 येथे करण्यात आले आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी समन्वयक म्हणून डॉ.प्रमोद कमलाकर लाखे, प्र.संचालक, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्था, नागपूर यांची शासनातर्फे नेमणूक केलेली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9422109168 असा आहे.

राज्यातील सर्व उमेदवारांनी या प्रशिक्षणाचा फायदा घेण्यासाठी www.iasnagpur.org.in या संकेतस्थळावर सविस्तर सूचना उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय चौकशी संदर्भात directoriasngp@gmail.com यावर ईमेल करता येणार असून अधिक संपर्कासाठी दूरध्वनी 022-22070942/ 0712-2565626 व भ्रमणध्वनी क्रमांक 9819093410, 9422109168 यावर संपर्क करावा, असे आवाहन संचालक, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नागपूर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.