राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी टूर ऑपरेटर, ट्रेकर्स, ब्लॉगर्स यांच्यासमवेत चर्चा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतसंकल्पनासूचना देण्याचे पर्यटन मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांचे आवाहन

मुंबईदि. ४ : राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध घटकांचा सहभाग घेण्याच्या दृष्टीने पर्यटन मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी राज्यातील विविध भागातील सहल आयोजक (टूर ऑपरेटर)ट्रेकर्स (गिर्यारोहक) आणि पर्यटनविषयक लेखक (ब्लॉगर्स) यांच्यासमवेत बैठक घेऊन चर्चा केली. या सर्व घटकांनी राज्याच्या पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने विविध संकल्पनासूचना द्याव्यातअसे आवाहन मंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी केले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस पर्यटन विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर-सिंहपर्यटन संचालक दिलीप गावडेअभिनेते मिलींद गुणाजी, पर्यटन सहसचिव धनंजय सावळकर यांच्यासह विविध सहल कंपन्यांचे प्रतिनिधीनामवंत ट्रेकर्ससोशल मीडियावर ट्रॅव्हल आणि टुरीजमसंदर्भात लिहिणारे नामवंत ब्लॉगर्सलेखक उपस्थित होते.

सहल आयोजकांशी चर्चा करताना मंत्री श्री. ठाकरे म्हणाले कीदेश आणि जगभरातील पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्यासाठी पर्यटन विभाग नियोजन करत आहे. यामध्ये टुर ऑपरेटर्सचा सहभाग महत्त्वाचा राहणार आहे. टुर ऑपरेटर्सनी यासाठी योगदान द्यावेत्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य शासनामार्फत दिले जाईल. सर्वजण मिळून महाराष्ट्राच्या पर्यटनाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी प्रयत्न करुयाअसे आवाहन त्यांनी यावेळी केले.

महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या पर्यटनाला चालना देण्यासंदर्भात यावेळी गिर्यारोहकांसमवेत चर्चा झाली. गडकिल्ल्यांवर दारुबंदी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल यावेळी उपस्थित सर्व गिर्यारोहकांनी शासनाचे तसेच मंत्री श्री. ठाकरे यांचे आभार मानले. या गडकिल्ल्यांचे पावित्र्य राखणे तसेच या परिसरातील पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने हा क्रांतिकारी निर्णय आहेअशा भावना यावेळी गिर्यारोहकांनी व्यक्त केल्या. गिर्यारोहणासह विविध साहसी पर्यटनाला चालना देण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली.

मंत्री श्री. ठाकरे यांनी फेसबुकट्वीटरइन्स्टाग्रामयुट्युबटीकटॉक आदी सोशल माध्यमांवर लोकप्रिय असणाऱ्या सोशल माध्यम लेखकफोटोग्राफरव्ह‍िड‍िओग्राफर आदींशी चर्चा केली. महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्याच्या अनुषंगाने विविध संकल्पना सुचवाव्यातत्यातील कल्पक सूचनांची अंमलबजावणी केली जाईलअसे मंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
००००
इरशाद बागवान/विसंअ/4.2.2020 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.