कलेला प्रोत्साहन देण्यासाठी शासन प्रयत्नशील - उद्योगमंत्री सुभाष देसाई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


ज्येष्ठ कलावंत काशिनाथ साळवे यांना कला सृजन पुरस्कार


मुंबई, दि. 11 : कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी शासन सातत्याने पूरक असे काम करीत आहे.  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कलेची उत्कृष्ट जाण असून ते उत्तम कलावंत असल्याने आता आपले राज्य आले आहे, असा विश्वास कलाकारांमध्ये निर्माण झाला आहे, असे मत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केले.

आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्यावतीने जहांगिर आर्ट गॅलरी येथे आयोजित करण्यात आलेल्या 102 व्या वार्षिक कला प्रदर्शनाचे उद्घाटन श्री. देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कलावंत काशिनाथ साळवे, परवेझ दमानिया, वासुदेव कामत आदी उपस्थित होते.श्री. देसाई म्हणाले, मागील अनेक वर्ष कला क्षेत्रात सातत्याने आर्ट सोसायटी ऑफ इंडिया गुणवत्तापूर्ण कार्य करित आहे.  जागतिक दर्जाच्या कलाना प्रोत्साहन देणाऱ्या या संस्थेच्या माध्यमातून आलेल्या कलावंतांच्या कलेला राजाश्रयासह लोकाश्रयही मिळाला आहे. प्रदर्शनातील प्रत्येक चित्र व शिल्पातून कलाकारांच्या कलात्मकतेची तशीच बुद्धीमत्तेची उंची दिसून येते. हे प्रदर्शन कलाप्रेमींसाठी मोठी पर्वणी ठरेल.

कलाक्षेत्रात आपल्या अमूल्य योगदानाने ठसा उमटवणारे प्रा. काशिनाथ साळवे यांना यावेळी कला सृजनचा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सत्तर वर्षे कलेची सेवा करणारे प्रा. साळवी यांच्या हाताखाली अनेक उत्तम विद्यार्थी तयार झाले आहेत. यावेळी सर्वांचे आभार मानताना प्रा. साळवे यांनी आपले शिक्षक शंकर पळसीकर, श्री. परब यांचा आवर्जून उल्लेख केला व कुटूंबियांचे ऋण व्यक्त केले.उद्‍घाटन करण्यात आलेल्या प्रदर्शनासाठी पहिल्यांदाच ऑनलाईन प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. सुमारे अडीच हजार प्रवेशिकांमधून निवडक 107 प्रवेशिकांचे हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यात विद्यार्थी आणि व्यावसायिक कलाकारांचा समावेश आहे. यावेळी  विजेत्यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

००००

विसंअ/ अर्चना शंभरकर/ जहांगिर आर्ट / उद्योगमंत्री

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.