कोणत्याही विद्यार्थ्याचे विद्यावेतन/शिष्यवृत्ती बंद केली नाही - 'बार्टी'चे स्पष्टीकरण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 14 : सन 2018 मध्ये एम.फील व पीएचडीसाठी नोंदणी दिनांक केलेल्या विद्यार्थ्यांचे सन 2019 मध्ये जाहिरात देऊन ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. काही विद्यापीठांनी विद्यार्थ्यांचे नोंदणी दिनांक उशिरा झाल्यामुळे ऑनलाईन अर्जासाठी मुदतवाढ देण्याबाबत लेखी विनंती केली होती. त्यानुसार ऑनलाईन अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली. नियामक मंडळाच्या निर्देशानुसार एफ.फील व पीएचडीसाठी निवड करण्याची कार्यवाही सुरु आहे. बार्टीमार्फत कोणत्याही विद्यार्थ्यांचे विद्यावेतन/शिष्यवृत्ती बंद केलेली नाही. सर्व अधिछात्रवृत्ती व शिष्यवृत्ती आजपर्यंत सुरु आहे, असे 'बार्टी'ने  एका प्रसिद्धीपत्रकामार्फत कळविले आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (BANRF) प्रकल्प वर्ष 2012 पासून राबविण्यात येत असून बार्टीमार्फत एम.फील व पीएचडी करणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना या अंतर्गत लाभ देण्यात येत आहे. 478 विद्यार्थी आजपर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन अधिछात्रवृत्ती (BANRF) प्रकल्प अंतर्गत लाभ घेत आहेत. त्यापैकी 199 विद्यार्थ्यांनी एम.फील व पी.एच.डी पूर्ण केलेला आहे. तसेच उर्वरित 279 विद्यार्थ्यांचा एम.फील व पी.एच.डी सुरु आहे. 

बार्टी नियामक मंडळ बैठक 18 फेब्रुवारी 2018 रोजीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (BANRF) हे एकच असावे असा निर्णय झाला आहे. सर्व अधिछात्रवृत्ती व शिष्यवृत्ती आजपर्यंत सुरु आहेत, असेही 'बार्टी'ने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.