महाबळेश्वर परिसरातील स्थानिक तसेच पर्यटकांना उत्तम वैद्यकीय सुविधा देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुख्यमंत्र्यांची मोरारजी गोकुळदास ग्रामीण रुग्णालयाला भेट


सातारा दि. 1 : महाबळेश्‍वर येथील ग्रामीण रुग्णालयाला तसेच पाचगणी येथील प्रसिद्ध बेल एअर हॉस्पिटल आणि रेड क्रॉस संस्थेस पुढील वर्षासाठी देखील हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवावा. कोणत्याही परिस्थितीत महाबळेश्वर-पाचगणी परिसरातील स्थानिक व येथे भेट देणाऱ्या पर्यटकांना मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधांमध्ये खंड पडू नये, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी आज मोरारजी गोकुळदास ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन संबंधितांशी चर्चा केली. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंग आदींची उपस्थिती होती.यावेळी मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांचीदेखील आस्थेवाईकपणे विचारपूस केली.  महाराष्ट्र शासनाने एका वर्षासाठी प्रायोगिक तत्वावर हस्तांतरित करण्याच्या निर्णयाने ग्रामीण रूग्णालयाच्या कारभारात सुधारणा झाली आहे असे यावेळी अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्‍वरमध्ये फक्‍त एकच ग्रामीण रूग्णालय असल्याने स्थानिक व पर्यटकांना फार अडचणी निर्माण होत होत्या. या रूग्णालयामध्येही पुरेशा वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी राज्य शासनाने पाचगणी येथील बेल एअर  हॉस्पिटलला प्रायोगिक तत्वावर हस्तांतरीत केले होते. या संस्थेशी असलेला करार संपुष्टात आल्याने मुख्यमंत्र्यांनी नवा प्रस्ताव त्वरित शासनास पाठविण्याचे निर्देश दिले. वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरणे व इतर समस्या दूर करण्याबाबत तातडीने कार्यवाहीचे आदेश देण्यात येतील असेही ते म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.