असा होता आठवडा (दि. 1 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी 2020)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


गेल्या आठवड्यातील महत्वाच्या बातम्यांचा गोषवारा 
(न्यूज डायजेस्ट)

दि. 1 फेब्रुवारी 2020

· मुंबई येथील व्ही.जे.टी.आय.मधील स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या स्टुडंट्स असोशिएशनच्यावतीने आयोजित स्थापत्य 2020 या टेक्नीकल फेस्टिव्हलचे जलसंपदा मंत्री श्री. जयंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन.

· महाबळेश्वर येथे मोरारजी गोकुळदास ग्रामीण रूग्णालयास मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांची भेट. मंत्रिमहोदयांचे निर्देश: महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयाला पाचगणी येथील प्रसिद्ध बेल एअर हॉस्पिटल आणि रेड क्रॉस संस्थेस पुढील वर्षासाठी देखील हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवा, कोणत्याही परिस्थितीत महाबळेश्वर- पाचगणी परिसरातील स्थानिक व पर्यटक यांना मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधांमध्ये खंड पडू देऊ नका.

· वास्तवाचे भान हरवलेला आणि केवळ स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा केंद्रीय अर्थसंकल्प असल्याची मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया.

· महाबळेश्वर येथे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्यामार्फत महाबळेश्वर पर्यटन विकास कामांचा आढावा. उद्योग मंत्री श्री.सुभाष देसाई आणि पर्यटन मंत्री श्री.आदित्य ठाकरे उपस्थित. महत्त्वाचे मुद्दे : महाबळेश्वर स्ट्रॉबेरीज संशोधन केंद्र उभारणार, महाबळेश्वराच्या बाहेरील भागात मोठे वाहनतळ उभारून बॅटरी व इलेक्ट्रीक वाहनांच्या पर्यायाचा विचार करणार, महाबळेश्वर परिसरातील पर्यटन स्थळाचा विकास करणार.
· केंद्रीय अर्थसंकल्पाने महाराष्ट्राचा अपेक्षाभंग, देशवासियांची निराशा केल्याची उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री श्री. अजित पवार यांची प्रतिक्रिया.
· कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनल येथे पहिल्या प्रिपेड रिक्षा स्टँडचे परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांच्या हस्ते उद्घाटन.
· महसूलमंत्री श्री.बाळासाहेब थोरात यांच्याद्वारे कोकण विभागाच्या कामाचा आढावा. मंत्रिमहोदयांचे निर्देश : सर्व विभागीय आयुक्तांची एक समिती तयार करून महसूल विभागाच्या माध्यमातून जनतेच्या कल्याणासाठी नवे उपक्रम सुचवा, ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी नाविण्यपूर्ण योजना त्यांच्या जिल्ह्यात राबविली असेल, त्या योजना राज्यातील इतर जिल्ह्यात राबवा,  सेवा हमी कायद्यांतर्गत महसूल विभागांतर्गत येणाऱ्या सेवांचा आढावा घ्या, प्रलंबित तक्रारींचा निपटारा करण्यासाठी अभियान राबवा.  झीरो पेंडंसीवर भर द्या, महसूल विभागाच्या तक्रारींसाठी विशेष पोर्टल तयार करा, महाराजस्व अभियान राबवा, सध्या चालू असलेले 7/12 डिजिटायझेशनचे काम 100 टक्के पूर्ण करून  ई फेरफार प्रकिया सुरु करा, डिजीटायईझ 7/12 पीक कर्ज योजनेसाठी लागू करण्याची शक्यता तपासून पहा. अभिलेख कक्षाचे अद्यावतीकरण-अभिलेख कक्षाचे स्कॅनिंगचे काम पूर्णत्वास आणा, 100 टक्के अभिलेख कक्ष डिजिटाईज करण्याचे उद्दिष्ठ ठेवा, ग्रामीण भागात महसूल विभागाशी संबंधीत बांधकाम परवानगीबाबत राज्यस्तरावर एक सुसूत्रता आणून प्रकिया सहज व सोपी बनविण्यावर भर द्या, आदिवासी खातेदारांच्या संदर्भात आदिवासी विभागाच्या मदतीने  त्यांच्या वारसनोंदी व वाटपनोंदीबाबत मोहीम घ्या, पानंद रस्त्याचा कार्यक्रम राबवा.
· गोंधळलेल्या सरकारचा गोंधळलेला अर्थसंकल्प; महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली...  मागासवर्गीयांवर अन्याय, अशी डॉ.नितीन राऊत यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया.
· करोना व्हायरस : रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्यांना घरी सोडण्याची कार्यवाही सुरू; पुणे येथील पाच जणांना घरी सोडले.
· कोरेगाव- भिमा चौकशी आयोगास 2019-20 या वर्षासाठी 65 लाख रूपयांचा निधी उपलब्ध.

दि. 2 फेब्रुवारी 2020

·         टेरी फॉक्स रन फॉर कॅन्सर रिसर्चचे राज्यपाल श्री.भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन.
·         नवी दिल्ली येथील एनसीसीचे प्रजासत्ताक दिन शिबीर तसेच अखिल भारतीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्र एनसीसीच्या 116 कॅडेट्स व 10 अधिकारी चमूच्या सन्मानार्थ राज्यपाल श्री.भगतसिंह कोश्यारी यांच्यामार्फत राजभवन येथे स्वागत समारंभ. राज्यपालांकडून एनसीसीला 50 हजार रूपयांचे बक्षीस.
·         कृषी विभागाची कार्यपद्धती समजावून घेण्यासाठी कृषीमंत्री श्री.दादाजी भुसे यांच्याद्वारे पुणे येथे कृषी आयुक्तालयाच्या सर्व विभागांची व कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंचीही बैठक.  मंत्रिमहोदयांचे निर्देश : शेतीत नवनवीन प्रयोग करून उत्पादन वाढविणाऱ्या विविध क्षेत्रातील शेतकऱ्यांची रिसोर्स बॅंक तयार करा. प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देणारे तालुकास्तरावर शेतकऱ्यांसाठी अभियान घ्या.
·         रायगड किल्ल्यावर सध्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पुरातत्व विभागाच्या सहकार्याने सुरु असलेल्या विकास कामांची, राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांच्याव्दारे पाहणी.
·         करोना व्हायरस : रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्या 17 पैकी 12 जणांना डिस्चार्ज; राज्यभरात 72 जणांची दूरध्वनीव्दारे दररोज विचारपूस.

दि. 3 फेब्रुवारी 2020
·         रायगड जिल्ह्याच्या नियोजन भवन येथे राज्य व केंद्र शासनाच्या महत्वकांक्षी योजनांचा राज्यपाल श्री.भगत सिंह कोश्यारी यांच्यामार्फत आढावा.
·         आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या 188 व्या पुण्यतिथीनिमित्त जलसंपदा मंत्री श्री.जयंत पाटील आणि सामाजिक न्यायमंत्री श्री.धनंजय मुंडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
·         लातूर महानगरपालिकेतील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सांस्कृतिक कार्यमंत्री व पालकमंत्री श्री.अमित देशमुख यांच्यामार्फत आढावा. लातूर महानगरपालिकेने सहायक अनुदानासाठी प्रस्ताव करण्याची श्री. देशमुख यांची सूचना.
·         प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गतआयोजित मातृवंदना सप्ताहाच्याउत्कृष्ट अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने  सन्मानित.
·         महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी शाळा, सांस्कृतिक संस्था, ग्रंथालय व नाट्यगृहांच्या समस्यांवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांसोबत मंत्री श्री.सुभाष देसाई यांच्यासमवेत बैठक.  मंत्रिमहोदयांचे निर्देश : सीमा भागात मराठी शिक्षक उपलब्ध असतील तर त्यांना प्राधान्याने मराठी शाळांत नोकरीची संधी, मराठी नाट्य चळवळ टिकवण्यासाठी स्थानिकांनी मराठी नाटके सादर केल्यास महाराष्ट्र शासनाचे अर्थसहाय्य, सीमा भागातील मराठी शाळासह, ग्रंथालय, सांस्कृतिक भवन, समाज मंदिर आदींना शासनाची मदत.

·         आरोग्यमंत्री श्री.राजेश टोपे यांची माहिती : महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 8 लाख कर्करुग्णांवर उपचार,  14 जिल्ह्यामध्ये केमोथेरेपी युनिट सुरु, आतापर्यंत 2800 रुग्णांवर उपचार,  महाराष्ट्र कँन्सर वॉरिअर मार्फत 23 जिल्ह्यामध्ये सेवा,  आतापर्यंत 40 हजार रुग्णांची तपासणी, अमरावती, गडचिरोली, भंडारा, सिंधुदुर्ग, सातारा, नाशिक, पुणे, जळगाव, अकोला, वर्धा, रत्नागिरी, बीड, जालना, नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये केमोथेरेपी युनिट सुरु,  कोल्हापूर आणि उस्मानाबाद‍ जिल्ह्यातील फिजीशिअन व नर्स यांना  केमोथेरेपीचे प्रशिक्षण, ठाणे, रायगड, अहमदनगर, परभणी, हिंगोली, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांचे प्रशिक्षण सुरू, कर्करोगाला आळा घालण्यासाठी सध्या लोकसंख्या आधारित तपासणी कार्यक्रम सुरु,  सर्व जिल्ह्यांमध्ये आशा कार्यकर्ती व एएनएमच्या माध्यमातून प्रत्येक घराचे आणि त्यातील व्यक्तींचे सर्वेक्षण.
·         महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) यांच्या संयुक्त विद्यमाने तरुणांसाठी आयोजित दोन दिवसीय ई - समिटमध्ये सुमारे 20 ते 22 हजार विद्यार्थी, उद्योजक, इन्व्हेन्टर यांचा सहभाग. 467 विद्यार्थ्यांची या कार्यक्रमासाठी नोंदणी.
·         आदिवासी विकास विभागातर्फे मुंबईच्या काळा घोडा कला महोत्सवात महाराष्ट्रातील आदिवासी कलाकारांना कलाकुसरीच्या वस्तूंच्या प्रदर्शन आणि विक्री करण्यासाठी दोन स्टॉलची उपलब्धता.
·         वनमंत्री  श्री. संजय राठोड यांच्यामार्फत निसर्ग पर्यटन योजनेचा आढावा. मंत्रीमहोदयांचे निर्देश: महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्याने निसर्ग पर्यटन विकासाचा बृह्त आराखडा तयार करावा, या मंडळातील रिक्त पदे तातडीने भरा, वनक्षेत्राच्या आसपास राहणाऱ्या स्थानिकांमध्ये वनसंरक्षणाबाबत जागृती निर्माण करा, वनक्षेत्रातील रस्ते तसेच निवासाच्या व्यवस्थेमध्ये सुधारणा करा.
·         शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीकोनातून राबवण्यात येणारे उपक्रम, शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी करावे लागणारे प्रयत्न, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवून शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळांसाठी भविष्यात कराव्या लागणाऱ्या उपाययोजना या मुद्दयांवर आदिवासी विकास विभागाची तीन दिवसीय वार्षिक परिषद नाशिक येथे संपन्न.
·         जलसंपदा मंत्री श्री.जयंत पाटील यांच्यामार्फत विविध तालुक्यातील सिंचनासंदर्भात बैठक. बैठकीला जलसंधारण राज्यमंत्री श्री.दत्रात्रय भरणे उपस्थित. मंत्रीमहोदयांचे निर्देश : महाराष्ट्र विकास महामंडळामार्फत सिंचन प्रकल्पासाठी वापरल्या जाणाऱ्या, त्याच प्रमाणे सिंचन प्रकल्पाव्यतिरिक उपलब्ध असलेल्या जमीनींचा आढावा घ्या, मंगळवेढा तालुक्यासाठी पाणी देताना कोणत्या निकषांवर निर्णय कपात करण्यात आली, याचा आढावा घ्या, सोलापूर जिल्ह्यातील कायम दुष्काळी असणाऱ्या  35 गावांसाठी मंगळवेढा उपसा सिंचन तातडीने बैठक घ्‍या.
·         सामाजिक न्यायमंत्री श्री.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत सामाजिक न्याय विभागात शासकीय वसतीगृहांसाठी मध्यवर्ती भोजनगृह सुरु करण्याबाबत बैठक. आदिवासी विभागाच्या धर्तीवर मध्यवर्ती भोजनगृह सुरु करण्याचा निर्णय.
·         स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक संदर्भातील संशोधनासाठी  राज्य निवडणूक आयोगाची शिष्यवृत्ती.
·         वरळीतील नेहरु सेंटर येथे 16 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल फॉर डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिक्शन आणि ॲनिमेशन अर्थात मिफ्फ 2020 चा सांगता समारंभ राज्यपाल श्री.भगत सिंह कोश्यारी आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न.

·         करोना संदर्भात आरोग्यमंत्री श्री.राजेश टोपे यांची माहिती : करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चीन येथून आलेल्या एका व्यक्तीस मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल, मुंबई, पुणे आणि सांगली येथे सहा जण रुग्णालयात दाखल, 83 प्रवाशांची दूरध्वनीद्वारे विचारपूस, 26 जणांचा आरोग्यविषयक पाठपुराव्यास 14 दिवस पूर्ण झाल्याने चौकशी थांबवली, मुंबई विमानतळावर आतापर्यंत 8 हजार 878 प्रवाशांची तपासणी.
·         गृहमंत्री श्री.अनिल देशमुख यांची पत्रकार परिषद. महत्त्वाचे मुद्दे : राजकीय विरोधकांवर पाळत ठेवण्यासाठी फोन टॅपिंग करण्यात आल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव, आणि राज्य गुप्तवार्ता विभागाचे सहआयुक्तांचा समावेश असलेली द्विसदस्यीय समितीची नेमणूक, सहा आठवड्यात चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश.  नागरिकत्व सुधारणा कायद्यानुसार राज्यातील कोणाचेही नागरिकत्व हिरावले जाणार नाही, वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट येथे महिला प्राध्यापिकेवर ॲसिडहल्ल्या केलेल्या व्यक्तीची ओळख पटली, आरोपीस अटक, महिला अत्याचारांच्या अनुषंगाने राज्य शासन संवेदनशील,  प्रकरण द्रुतगतिने (फास्ट ट्रॅक) चालविण्यात येईल, महिला अत्याचारांच्या अनुषंगाने आंध्र प्रदेशात करण्यात आलेल्या 21 दिवसात शिक्षा देण्याच्या कायद्याचा अभ्यास करणार.
·         औरंगाबाद विभागातील प्राध्यापकांच्या विविध अडचणीसंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.उदय सामंत यांच्या उपस्थितीत बैठक. मंत्रीमहोदयांचे निर्देश :  प्राध्यापकांच्या पदोन्नतीसंदर्भात समितीने मान्य केलेल्या दिनांकापासून वेतननिश्चिती करा, विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालय यांनी समन्वय राखून कार्य करा, तासिका तत्वावरील पदासाठी पात्र उमेदवार न मिळाल्यास पदव्युत्तर पदवीधर यांना संधी द्या.
·         उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.उदय सामंत यांच्याद्वारे जालना जिल्ह्यातील घनसांगवी येथील मॉडर्न कॉलेजच्या अडचणीसंदर्भात बैठक. विद्यापीठाने या महाविद्यालयाच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याचे निर्देश.
·         यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध रोजगार आणि करिर विषयक प्रशिक्षण राबविण्यासंदर्भात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि खासदार श्री.शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक. सामाजिक न्यायमंत्री डॉ.विश्वजीत कदम उपस्थित. महत्त्वाचे मुद्दे : सामाजिक न्याय विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) तसेच अन्य स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून तीन लाख अनुसूचित जातीच्‍या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण व हक्काचा रोजगार देण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविणार, एम.पी.एस.सी, यु.पी.एस.सी, एम.बी.ए, बँकिंग, रेल्वे, पोलीस, सैन्य दलातील विविध विभाग यांना अनुसरून विशेष अभ्यासक्रम निश्चित करून प्रशिक्षण कार्यक्रम तयार करणार. जपानी भाषा येणाऱ्यांना नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जपानी भाषा शिकवणारे विशेष प्रशिक्षण वर्ग सुरु करुन अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात नोकरी मिळवून देण्याचा विभाग प्रयत्न करणार.

दि. 4 फेब्रुवारी 2020

·         वस्त्रोद्योग राज्यमंत्री श्री. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मार्फत रेशीम संचालनालयाचा आढावा. महत्वाचे मुद्दे : रेशीम विकासाला प्राधान्य, रेशीम शेतीला (तुती) कृषी पिकाचा दर्जा, पिकविम्याच्या यादीत समावेश,भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया येथे टसर रेशीम कोष बाजारपेठाची उभारणी,
·         पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची बैठक. महत्वाचे मुद्दे : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील 97 आदिवासी गावे व 259 पाड्यांना नाशिक जिल्ह्यातील भावली धरणातून ग्रीड पद्धतीने पाणीपुरवठा योजनेच्या खर्चास मान्यता.पाणीपुरवठा योजनेच्या दरडोई खर्चाच्या निकषांच्या 100 टक्‍क्‍यांहून अधिक दरडोई खर्च असणाऱ्या योजनांच्या प्रस्तावांना मान्यता देण्यासाठी समिती स्थापन.
·         युवक व क्रीडामंत्री श्री. सुनील केदार यांच्या उपस्थितीत स्काऊट्‌स आणि गाईड्‌स संस्थेच्या विविध मागण्या व समस्यांसदर्भात बैठक.
·         मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामविकास विभागाची आढावा बैठक. उद्योग मंत्री सुभाष देसाई, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित. मुख्यमंत्र्यांचे निर्देश : ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था सुधारण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग यांना जोडणाऱ्या ग्रामीण रस्त्यांचा विकास आराखडा तयार करा. हा आराखडा तयार करताना महत्वाच्या रस्त्यांच्या कामांची प्राथमिकता निश्चित करा. ग्रामीण रस्त्यांची कामे करताना रस्त्यांचा दर्जा  उत्तम राहील याकडे लक्ष केंद्रित करा, ज्या  कंत्राटदाराला हे काम देण्यात आले आहे, त्यांच्यावर रस्त्यांची जबाबदारी निश्चित करा, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या उपक्रमांना अधिक गती द्या,  बचतगटांच्या वस्तूंना व्यापक बाजारपेठ मिळावी यासाठी प्रदर्शनांचे आयोजन आणि कायमस्वरूपी बाजारपेठ मिळेल अशी व्यवस्था‍ करा, बचतगटांना ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रयत्न करा, तालुकास्तरावरील सक्षम बचतगटांना शिवभोजन योजना राबविण्यासाठी प्रोत्साहित करा, मागास आणि आदिवासी ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या विशेष सहाय्यात वाढ करा, ग्रामीण विकासाच्या योजनांना जिथे अधिक निधीची गरज आहे त्यासाठी उपलब्ध वित्तीय तरतुदींचे  नव्याने पुनर्वाटप  करा,ग्रामपंचायतस्तरावर घरपोच मालमत्ता पत्र (प्रॉपर्टी कार्ड) देता येईल का याची  चाचपणी करा, शक्य असल्यास अशी व्यवस्था विकसित करा, ग्रामीण तीर्थक्षेत्रे आणि परिसर स्वच्छ राखताना ती पर्यटनाच्यादृष्टीने विकसित करा,  रोजगार वाढावा व युवकांच्या हाताला काम मिळावे यासाठी मोठ्या तीर्थक्षेत्रांची जिल्हानिहाय यादी तयार करा,स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक सक्षम करा, शेतकऱ्यांचा शेतमाल बाजापेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी पाणंद रस्ते महत्वाचे असल्याने त्याकडे लक्ष द्या.
·         हिंगणघाटच्या जळीत तरुणीच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून
करण्याचे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांचे निर्देश.
·         'सत्यमेव जयते समृद्ध गाव' स्पर्धेच्या माध्यमातून पाणी फाऊंडेशन सुरू करीत असलेल्या नवीन उपक्रमाची माहिती देण्यासाठी अभिनेते आमीर खान, श्रीमती किरण राव यांची मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या समवेत बैठक. पाणी फाऊंडेशनच्या उपक्रमास शासन संपूर्ण सहकार्य करेल, असे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन.
·         जलसंपदा मंत्री श्री.जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची बैठक, महत्वाचे मुद्दे : मुंबई, पुणे, नागपूर अशा महानगरांमधील इमारतींमध्ये पाण्याचा पुनर्वापर करण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना विकासकांना देणार, घरात ठराविक क्षमतेचे वीज उपकरणे वापरली जातात त्याच प्रमाणे ठराविक क्षमतेचे जल उपक्रम आणता येतील का, जल उपकरणे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना उपकरणे बनतानाच तशी उपकरणे बनवण्यास सांगणार, पाणी चोरीविरोधात कायदा करणार.
·         उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांच्या उपस्थितीत विद्यापीठाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासंदर्भात आढावा बैठक. विद्यापीठातील प्रशासकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण यशदा किंवा अध्यापक विकास संस्थेतच देण्याचे श्री. सामंत यांचे निर्देश.
·         भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र प्रादेशिक शाखेच्यावतीने बी. जी. देशमुख स्मृती व्याख्यानअंतर्गत द इव्हॉल्विंग पॅराडाइम ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन इन महाराष्ट्रा सिन्स इंडिपेन्डन्स या विषयावर निवृत्त मुख्य सचिव द. म. सुकथनकर यांच्या व्याख्यानाचे दिनांक 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.30 वाजता आयोजन.
·         पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या मार्फत विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या सोबत व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत संवाद.          मंत्री महोदयांचे निर्देश : प्लास्टिक बंदी मोहिमेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी शालेय विद्यार्थी, महाविद्यालये, एनएसएस, स्काऊटस् अॅन्ड गाईडस्, स्पोर्टस् क्लब, हाऊसिंग सोसायट्या, रोटरी क्लब, लायन्स क्लब, एनजीओ अशा विविध संस्थांचा सहभाग घ्या, लोकचळवळीचे स्वरुप द्या, प्लास्टिकचे घातक परिणाम लोकांना समजावून सांगा, यासाठी प्रत्येक महापालिका, नगरपालिकांनी याचा आराखडा 20 फेब्रुवारीपर्यंत सादर करा, 1 मे पूर्वी संपूर्ण राज्य सिंगल यूज प्लास्टिकमुक्त होईल यादृष्टीने नियोजन करा,सिंगल यूज प्लास्टिकमुक्तीसाठी नवनवीन कल्पना मांडा व आराखडे तयार करा.
·         आरोग्य राज्यमंत्री श्री. राजेंद्र पाटील-यड्रावलकर यांच्या मार्फत मुंबईतील कामा रुग्णालय, जी.टी. रुग्णालय, सेंट जॉर्जेस रुग्णालय व जे.जे. रुग्णालय येथील वैद्यकीय सेवा समस्यांबाबत बैठक, या चारही रुग्णालयांच्या सेवेचा दर्जा उंचवण्याचे श्री. यड्रावकर यांचे सुतोवाच.
·         केंद्रीय परिवहन मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्यासमवेत परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांची बैठक. महत्वाचे मुद्दे : महाराष्ट्रातील 10 स्वयंचलित वाहन तपासणी व प्रमाणिकरण केंद्र तसेच 22 स्वयंचलित चालक चाचणी ट्रॅकसाठी 296.02 कोटी रूपयांचा निधी  केंद्र शासनाकडून मंजूर, 
महाराष्ट्रात प्रथम टप्प्यात कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, ठाणे (कल्याण), नागपूर (ग्रामीण), मुंबई (सेंट्रल), हिंगणघाट (नागपूर), पनवेल, दिवेघाट (पुणे), नांदेड या ठिकाणी स्वयंचलित केंद्रे,
एकूण 50 वाहन तपासणी आणि प्रमाणिकरण केंद्र उभारली जाणार, राज्यात 22 ठिकाणी मानवरहित स्वयंचलित चालक चाचणी ट्रॅक सुरू करणार.
·         म्हाडा, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने बांधकाम करताना प्री-फेबया नाविण्यपूर्ण बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे गृहनिर्माण मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड यांचे निर्देश.
·         सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक.
·         राज्यात केंद्राप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा करणे यासह राजपत्रित अधिकारी महासंघाच्या मागण्यांबाबत प्रशासनाने तातडीने प्रस्ताव पाठवावेत, असे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांचे निर्देश.
·         करोना व्हायरस : निरिक्षणाखाली असलेल्या 21 पैकी 19 जणांना घरी सोडल्याची आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांची माहिती.
·         आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांच्यामार्फत आरोग्य विभागाच्या कामकाजाचा पुणे येथे आढावा. मंत्री महोदयांचे निर्देश : गावांमधील पाणी नमुने तपासणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या  वापराचे धोरण तयार करा, आरोग्य विभागांतर्गत असणाऱ्या सर्व रुग्णवाहिका व इतर वाहनांबाबत अद्ययावत माहिती मिळण्याकरिता सॉफ्टवेअर तयार करा,  क्षयरोग निर्मुलनाचे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता तपासणी केंद्रांची संख्या दुपटीने वाढवा, खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग क्षयरोग निर्मुलन मोहिमेमध्ये वाढवा,आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची बाह्ययंत्रणेद्वारे तपासणी करा.
·         आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी.पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेतील आदिवासी उपयोजनेचा राज्यस्तरीय आढावा. मंत्री महोदयांचे निर्देश : जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्यात आदिवासी उपयोजनेअंतर्गत 2020-21 मध्ये प्रस्तावित निधी खर्च करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याने प्राधान्यक्रम ठरवावा, रस्ते, सौर ऊर्जा या कामांबरोबरच आदिवासी पाड्यांवरील तरुणांना कौशल्य विकास कार्यक्रम, आदिवासी समाजाला लागणारे दाखले देण्यासाठी शिबिर आयोजित करा, गेल्या वर्षीचा निधी परत जाऊ नये, यासाठी नियोजन करा, आदिवासी भागातील महिलांचे बचत गट तयार करून स्वयंरोजगारावर भर द्या.
·         महिला व बालविकास मंत्री श्री. बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली एकात्मिक बालविकास योजनेच्या संदर्भात आढावा. महत्वाचे मुद्दे : महिला आणि मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रालय स्तराबरोबरच क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका ते महिला बालविकास अधिकारी आणि सर्वसामान्य लाभार्थी महिला पालकांच्या सूचनांवर आधारित योजना राबवणार, किशोरवयीन मुले-मुली शाळेत का जात नाहीत, याच्या कारणांची महिला बाल विकास अधिकारी आणि गट शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत तालुका अथवा गावस्तरावरून माहिती मिळवून त्यावर प्रभावी उपाययोजना करणार, कुपोषण निर्मूलनासाठी १३ ते २४ वयोगटातील मुलींची आरोग्य तपासणी करणार, त्यासाठी एका जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर पायलट प्रोजेक्ट राबवणार.
·         राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत उद्योजकांसमवेत बैठक, मद्य व अनुज्ञप्ती व नियमावली संदर्भात मागणी तपासणी करताना कोणासही हानी पोहचवली जाणार नाही, असे मंत्री महोदयांचे सूतोवाच.
·         दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र  एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी देशात दुसरा क्रमांक पटकावला, त्यानिमित्त मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण.
·         विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली श्रीक्षेत्र माहूरगड विकास आराखड्यासंदर्भात़  बैठक.
·         विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोल यांच्या अध्यक्षतेखाली, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय अधिकारी व कर्मचारी कल्याण केंद्राच्या वतीने इयत्ता 10वी, 12 वी तसेच पदव्युत्तर परिक्षेत उच्च गुण प्राप्त करुन  उत्तीर्ण झालेल्या सभासदांच्या पाल्यांचा गुणगौरव, इयत्ता 4थी ते 9 वी मध्ये शिकत असलेल्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा पाल्यांना शैक्षणिक प्रोत्साहन म्हणून वहयांचे वाटप कार्यकम. 
·         पर्यटन राज्यमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांची राज्याच्या विविध भागातील सहल आयोजक (टूर ऑपरेटर), ट्रेकर्स (गिर्यारोहक) आणि पर्यटनविषयक लेखक (ब्लॉगर्स) यांच्यासमवेत बैठक. महत्वाचे मुद्दे : देश आणि जगभरातील पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्यासाठी पर्यटन विभागोच नियोजन, टूर ऑपरेटर्सना आवश्यक ते सर्व सहकार्य, गिर्यारोणासह विविध साहसी पर्यटनाला चालना.
·         सांस्कृतिक संचालनालयाचा दरवर्षी देण्यात येणारा भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीतासाठी दिला जाणारा यंदाचा पुरस्कार, पंडित अरविंद परिख यांना, सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. अमित देशमुख यांच्या हस्ते प्रदान, येणाऱ्या काळात महाराष्टात अधिकाधिक कलाकार घडावेत यासाठी महाराष्ट्रात 'संगीत, नृत्य आणि कला विद्यापीठ' सुरु करण्याबाबत पुढाकार घेण्याची  श्री. देशमुख यांची घोषणा.
·         माहूल येथील प्रदूषण कमी करण्यासंदर्भात पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्याद्वारे पर्यावरण विभागासह माहूल परिसरातील प्रमुख कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक. राष्ट्रीय हरीत लवाद यांनी दिलेल्या सूचनांची तंतोतंत अंमलबजावणी करुन या परिसरातील प्रदूषणाचे नियंत्रण करण्याचे श्री. ठाकरे यांचे निर्देश.
·         नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील स्थानिक लोकांसाठी रोजगार निर्मिती तसेच वन्य प्राण्यांचे संवर्धन व संरक्षण इको-टुरिझम मार्फत करणे याबाबत विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक.

दि. 5 फेब्रुवारी 2020

मंत्रीमंडळ निर्णय
·         कापूस पणन महासंघास आवश्यक असलेल्या 1800 कोटी रुपयांच्या शासन हमीस मान्यता.
·         नागरी भागात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रीया करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील सांडपाणी प्रक्रिया प्रस्तावास मान्यता.
·         कंपनी एकत्रीकरण किंवा पुनर्रचनेसंबंधीच्या दस्तांसाठी आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्कावर विहीत केलेली कमाल मर्यादा 25 कोटीवरुन 50 कोटीपर्यंत वाढविण्यास मान्यता. 

·         कोरोना विषाणू : आजार बरे करणाऱ्या संदेशावर विश्वास न ठेवण्याचे आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांचे आवाहन.
·         गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील न्यायालयाच्या इमारतीची दुरुस्ती व नवीन इमारतीसाठी निधी उपलब्धतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक.
·         विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत बैठक.
·         जोगेश्वरी  विक्रोळी लिंकरोड येथे फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी अहोरात्र काम करुन त्या भागातील नागरिकांना गतीने पाणीपुरवठा सुरु करणारे महापालिका अभियंते, कर्मचारी, अधिकारी यांची भेट घेऊन पर्यावरण आणि पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्याद्वारे अभियंते व कर्मचाऱ्यांचे कौतुक.
·         पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री श्री. सुनील केदार यांच्यामार्फत पशुसंवर्धन व दुग्धविकास विभाग अंतर्गत असलेल्या प्रयोगशाळा व अन्न औषध प्रशासन विभागांतर्गत असणाऱ्या प्रयोगशाळा यांच्यातील विविध तपासण्यांबाबत बैठक. मंत्री महोदयांचे निर्देश : दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय तपासणी मोहीम राबवा, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग या तीनही विभागाच्या समन्वयाने एका पथकाची नियुक्ती करुन जकात नाका, चेक नाका, अशा विविध ठिकाणी धाडी टाकून भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, या कारवाईमध्ये पोलिसांना सहभागी करुन घ्या,दूध व दुग्धजन्य पदार्थांची तपासणी व गुणवत्तेची तपासणी  काटेकोरपणे करा.
·         भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील कंत्राटदार असोसिएशनच्या जीएसटी संदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक.
·         टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या दिनदर्शिकेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन.
·         राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांची मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्याद्वारे  गंभीर दखल. मुख्यमंत्र्यांचे निर्देश : महिला व बालकांची सुरक्षितता हा शासनाच्या सर्वोच्च प्राधान्याचा विषय असून यात हयगय करणाऱ्यांना माफी नाही, पोलीस यंत्रणेतील कोणतीही व्यक्ती, मग ती अधिकारी असेल किंवा कर्मचारी जे या कामात टाळाटाळ करतील किंवा विलंब लावतील त्यांच्यावर कडक कारवाई, घडलेल्या गुन्ह्यांचा एफआयआर तत्काळ नोंदवा, लवकरात लवकर तपास सुरु करा, गुन्हा सिद्धतेसाठी आवश्यक असलेल्या पुराव्यांचे संकलन करा, न्यायालयात लवकरात लवकर चार्जशीट दाखल करा, परिपूर्ण पुराव्यांसह या केसेस न्यायालयात अभ्यासपूर्ण रितीने मांडा, महिलांना आवश्यक कायदेविषयक संरक्षण आणि सहकार्य पुरवा,  प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस ठाणी सुरु करण्यासंबंधी गृहविभागाने चाचपणी करा, महिला अत्याचाराच्या केसेस लवकरात लवकर निकाली लागतील यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट, विशेष न्यायालयांची स्थापना, महिला आयोगाचे सक्षमीकरण, या बाबी  प्राधान्याने हाती घेणार.
·         उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीसाठी मराठी भाषा विभागाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार- 2018 जाहीर.
·       बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत सुरू होत असलेल्या 'मुंबई पब्लिक स्कूल' या उपक्रमाच्या बोधचिन्हाचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण, हा उपक्रम स्तुत्य असल्याची श्री. ठाकरे यांची प्रशंसा.
·         गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील गौणखनिजापासून मिळणारे स्वामित्व धन याबाबत विभानसभा अध्यक्ष श्री.नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा.
·         युवा उद्योजकांना स्वयंरोजगारास प्रोत्साहन देणाऱ्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यस्तरीय वित्तीयसेवा पुरवठादार समितीची (स्टेट लेव्हल बॅंकर्स कमिटी) उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या अंतर्गत आतापर्यंत राज्यातील 784 प्रकल्पांना मंजूरी, सप्टेंबर 2019 पासून सुरु झालेल्या या योजनेतून दहा लाख रोजगार निर्मितीचे लक्ष निर्धारित. अमरावती, औरंगाबाद, कोकण , मुंबई मेट्रोपोलीटन रिजन, नागपूर , नांदेड, नाशिक, पुणे या विभागातून 13 हजार प्रकल्पांचे  ध्येय निर्धारित , त्यासाठी 29 हजार 673 एवढे अर्ज ऑनलाईन, निकषांची पूर्तता करणारे 18 हजार 882 एवढे अर्ज बॅंकांकडे पाठविण्यात आले, आतापर्यंत 784 प्रकल्पांना बॅंकांकडून मान्यता.
·         डोंबिवलीत प्रदूषणामुळे रस्ता गुलाबी झाल्याच्या घटनेची मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्याद्वारे गंभीर दखल, यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना आदेश.
·         पालघर जिल्हयात डहाणूशेजारी वाढवण येथे प्रमुख बंदर उभारण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.
·         गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखू व सुपारी, खर्रा, मावा यासारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात उपमुख्यंत्री श्री. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे उपस्थित. गुटखाबंदीची अंमलबजावणी कडक करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश, राज्यातील गुटखाविक्रीच्या सूत्रधारांना शोधून त्यांच्यावर मोकांतर्गत कारवाईचे संकेत.
·         उद्योग राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत चिखलठाणा औद्योगिक क्षेत्रातील लघु  उद्योजकांच्या अडचणीसंदर्भात बैठक. या क्षेत्रातील उद्योजकांच्या अडचणीसंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश.
·         उद्योग राज्यमंत्री कु. अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत औरंगाबाद-मालजीपूरा येथील खादीग्रामोद्योग मंडळाची देवगिरी हायस्कूलसाठी असलेली जागा आणि खादीग्रामोद्योग मंडळाला तेथे प्रकल्प विकसित करण्यासंदर्भात आढावा बैठक.
·         सीआयआय’ (कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री) या संस्थेने सेवा व उद्योग वाढीची १२५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमास उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई उपस्थित.
·         मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाचे पत्रकारिता पुरस्कार प्रदान.

दि. 6 फेब्रुवारी 2020
·         उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत मोर मध्यम प्रकल्पातील सौरऊर्जा प्रश्नी पुनर्निरिक्षण करण्याचे निर्देश बैठक.
·         उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना यांच्या समवेत, वीज दर प्रश्नासंदर्भात बैठक. सामान्य वीज ग्राहकांना कमीत कमी दरात वीज देण्यासाठी शासन सदैव सकारात्मक असल्याचे डॉ. राऊत यांचे सूतोवाच.
·         वस्त्रोद्योग राज्यमंत्री श्री. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या उपस्थितीत वस्त्रोद्योग आयुक्तालयाची आढावा बैठक.  मंत्री महोदयांचे निर्देश : सहकारी सुतगिरणींना सौरऊर्जेवर वीज पुरवठा देण्यासाठी अनुदान द्या, सुतगिरण्यांना सौरऊर्जेचे प्रकल्प सुरु करता येणे शक्य व्हावे, म्हणून पुढाकार घ्या.
·         वनमंत्री श्री. संजय राठोड यांनी दिलेली माहिती :  रोही व  माकडाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसास 15 लाख रुपये अर्थसहाय्य, रोही व माकडाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना एक लाख 25 हजार रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य, किरकोळ जखमी झाल्यास औषधोपचारासाठी येणारा खर्च देणार, खाजगी रुग्णालयात औषधोपचार करणे अगत्याचे असल्यास 20 हजार रुपये प्रती व्यक्ती या मर्यादेत अर्थसहाय्य, या हल्ल्यात कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास त्या व्यक्तीला पाच लाख रुपये अर्थसहाय्य.आतापर्यंत वाघ, बिबट्या, गवा (बायसन)रानडुक्कर ,लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती व रानकुत्रे यांच्या हल्ल्यांमुळे मनुष्य हानी झाल्यास शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात येत होते. त्यात आता रोही व माकड या वन्य प्राण्यांचाही समावेश.
·         उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांच्या उपस्थितीत पुणे स्वायत्त संस्थेची प्रगती व अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे या संस्थेस अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे कायदा - २०२० द्वारे विशेष दर्जा बहाल करण्याबाबत बैठक.श्री. कामगार मंत्री श्री. दिलीप वळसे-पाटील उपस्थित. पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समस्या सोडविण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय.
·         पुण्यश्लोक अहिल्यादेवी या मराठी व हिंदी चित्रपटाच्या पोस्टरचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंत्रालयात प्रकाशन, पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, उद्योग राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे उपस्थित.
·         नवीन संगमनेर येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी निकृष्ट जेवणामुळे केलेल्या अन्नत्याग आंदोलनाची आदिवासी विकास विभाग दखल, विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार योग्य ती कार्यवाही सुरु करण्याची कार्यवाही सुरु.
·         रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या अंतर्गत प्रकल्पासंदर्भात धरणग्रस्तांचे पुनर्वसन व इतर प्रश्न तातडीने सोडवून प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्याचे जलसंपदा  मंत्री श्री. जयंत पाटील यांचे निर्देश.
·         सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थिती सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत येणाऱ्या विविध संचालनालयाचा आढावा. मंत्री महोदयांचे निर्देश : मुंबईत कला क्षेत्रात करीअर करण्यासाठी येणाऱ्या कलाकारांना भेटण्यासाठी, कला सादर करण्यासाठी, समन्वयासाठी हक्काची जागा असणे आवश्यक आहे. अशा सांस्कृतिक केंद्राच्या माध्यमातून कलाकारांना संपर्क करणे सोपे होणार असल्याने, असे केंद्र कुठे करता येईल याबाबत अभ्यास करा, राज्यातील गड- किल्ल्यांचे जतन व संवर्धन पुरातत्व संचालनालयामार्फत करण्यात येते. येणाऱ्या वर्षात अधिकाधिक गड- किल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करा, राज्यातील गड- किल्ल्यांचे संवर्धन करताना 'औसा' किल्ल्याचा इतिहास आणि संदर्भ लक्षात घेऊन औसा किल्ल्यांचे संवर्धन, विशेष प्रकल्पाअंतर्गत जिल्हा कला अकादमी, महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा,  राज्यातील नाट्यगृहांचे काम वेळेत पूर्ण करा, कलाकारांना देण्यात येणारे मासिक मानधन यासाठी अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करा.
·         उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांच्या उपस्थितीत मुंबई विद्यापीठ, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग आणि राष्ट्रीय उच्चत्तर शिक्षा अभियान (RUSA) महाराष्ट्र, यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठात कॅटलायझिंग इनक्युबेशन या एकदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन.
·         26 जानेवारीपासून सुरु झालेल्या शिवभोजन थाळीचा राज्यातील 1 लाख 48 हजार 820 लोकांनी लाभ घेतल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राह‍क संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याद्वारे माहिती.
·         ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 मध्ये क्यार व महाचक्रीवादळामुळे झालेल्या अवेळी पावसामुळे शेती पिकाच्या नुकसानीपोटी द्यावयाची मदत वनपट्टेधारक व वनदावे प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याची, मदत व पुनर्वसन मंत्री श्री. विजय वडेट्टीवार यांच्यामार्फत माहिती.
·         मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात जमीन देण्याचा निर्णय, मराठवाड्यातील ऊस संशोधनात वाढ व्हावी, तेथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे यादृष्टीनेच संस्थेला जमीनरुपी मदत देण्याची भूमिका शासनाने घेतली असल्याचे अल्पसंख्याक मंत्री श्री. नवाब मलिक यांचे प्रतिपादन.
·         प्रवाशांच्या तक्रारी अथवा समस्यांचे तातडीने निरसन करण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाच्या प्रत्येक बसमध्ये, ती बस ज्या आगाराची आहे त्या आगारप्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक व त्या विभागप्रमुखाचा दूरध्वनी क्रमांक ठळकपणे प्रदर्शित करण्याचे निर्देश परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष  ॲड. अनिल परब यांचे निर्देश.
·         बागायतदारांसाठी वीज दर कमी करण्यासंदर्भात उपाययोजना करण्याच्या ऊर्जा मंत्री डॉ. नितिन राऊत यांनी नाशिक जिल्ह्याच्या आढावा बैठकीत सूचना. मंत्री महोदयांचे निर्देश : शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर देण्यासंदर्भात उपलब्ध निधीअंतर्गत विविध योजना तयार करून त्याचे वितरण करा, १०० टक्के रक्कम देणारे शेतकरी, ३० टक्के रक्कम देणारे तसेच पूर्ण अनुदान शासन देणार असलेल्या शेतकऱ्यांची वर्गवारी करा, त्याप्रमाणे तत्काळ ट्रान्सफॉर्मरचे वितरण करा, जे शेतकरी थकबाकी अदा करीत आहेत अशांनाही विशेष प्रावधानाने ट्रान्सफॉर्मर वितरीत करा, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनअंतर्गत दिवसा सौर ऊर्जा शेतकऱ्यांना वितरीत करा,आदिवासी भागातील शेतकऱ्यांसाठी थकबाकीसंदर्भात उपाययोजना आखा, शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले विद्युत रोहित्रे जोडणीनंतर तात्काळ नादुरूस्त होत असल्यास संबंधित कंत्राटदारावर कारवाई करा, शेतकऱ्यांनी थकबाकी अदा केल्यास विद्युत रोहित्रे तत्काळ उपलब्ध करून द्या, जिल्हास्तरीय समिती तयार करून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करा.
·         उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत वस्त्रोद्योग धोरणांतर्गत सहकारी सुतगिरण्यांना देय असणारी वीज अनुदान सवलत मिळण्यासंदर्भात बैठक. मंत्री महोदयांचे निर्देश : जे उद्योजक राज्यात नव्याने उद्योग सुरू करण्यास उत्सुक आहेत, अशांना पुढाकार घेऊन परवानगी द्या, सुतगिरण्यांना वस्त्रोद्योग विभागाकडून वीजदरात सवलत मिळविण्यासाठी प्रयत्न करा, वीजनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना तयार करा, वीजदरात सवलत देण्याबरोबरच खरेदी दर माफ करा.            
·         उद्योग मंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा आढावा.  उद्योग राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे उपस्थित, बँकांचे प्रतिनिधी उपस्थित. महत्वाचे मुद्दे : प्रधानमंत्री रोजगार निर्म‍िती योजनेपेक्षा राज्याची मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना गतीमान, योजनेसाठी केंद्राचे कुठलेही अनुदान घेतले जात नाही, या योजनेत कुठल्याही प्रकारचे तारण ठेवण्याची गरज नाही. शासनाने त्यासाठी तारण हमी (क्रेडीट गॅरंटी) घेतली आहे. पुढील पाच वर्षांत एक लाख उद्योग आणि दहा लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीचे शासनाचे लक्ष, प्रत्येक जिल्ह्यात यासाठी प्रशिक्षणाची सोय, प्रशिक्षण घेतल्यानंतर उद्योजकांना उद्योग उभारणीच्या प्रशिक्षणासह भांडवल उपलब्धतेची माहिती मिळणार, ठळक वैशिष्टये :-योजनेची अंमलबजावणी पूर्णत: ऑनलाईन पद्धतीने उद्योग विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्गदर्शनाखाली व विकास आयुक्त (उद्योग)यांच्या संनियंत्रणाखाली, राष्ट्रीयकृत बँका तसेच खाजगी बँका यांच्या सहयोगाने योजना राबवणार,उद्योग संचालनालयाच्या सनियंत्रणाखाली महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, यांच्या सहयोगाने CMEGP कक्ष उद्योग संचालनालय, मुंबई येथे स्थापन, या योजनेसाठी ऑनलाईन पोर्टल maha-cmegp.gov.in विकसित,CMEGP योजनेचा लाभ सुलभतेने मिळण्यासाठी, आवश्यक सर्व जिल्हा उद्योग केंद्राच्या कार्यालयात विशेष Help-Desk स्थापन.
·         मुंबई विद्यापीठात सार्वजनिक विद्यापीठांचे कुलगुरू आणि रजिस्ट्रार यांच्या चर्चासत्रानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुंबई विद्यापीठातर्फे सुरू करण्यात आलेल्या व्हर्च्युअल क्लासरूमचे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन.विद्यापीठ स्तरावर समुपदेशन केंद्राची निर्मिती करून विद्यार्थांना दर आठवड्यात मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घेण्याची श्री. सामंत यांची सूचना.
·         मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ठाणे महानगरपालिकेच्या विविध विकासकामांचे भूमीपूजन आणि उद्घाटन. सार्वजनिक बांधकाम, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री श्री.जितेंद्र आव्हाड, पर्यटन व पर्यावरण मंत्री श्री.आदित्य ठाकरे उपस्थित. शासकीय घरांच्या योजनेत दहा टक्के घरे पोलिसांसाठी राखीव ठेवणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच.
·         संघ लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये  उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी पात्र राज्यातील उमेदवारांना नवी दिल्लीत मोफत प्रशिक्षण,उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा पुढाकार.  अभिरुप मुलाखत प्रशिक्षण व क्षमतावृद्धी कार्यक्रमाचे दि. 8 फेब्रुवारी ते 29 मार्च 2020 पर्यंत जुने महाराष्ट्र सदन, कोपरनिकस मार्ग, मंडी हाऊस जवळ, नवी दिल्ली -110001 येथे आयोजन. प्रशिक्षण कार्यक्रम समन्वयक डॉ.प्रमोद कमलाकर लाखे,( प्र.संचालक, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्था), भ्रमणध्वनी 9422109168, संपर्क संकेतस्थळ - www.iasnagpur.org.in, ईमेल  directoriasngp@gmail.com,दूरध्वनी 022-22070942/ 0712-2565626,भ्रमणध्वनी 9819093410.
·         इज ऑफ डुइंग बिजनेसअंतर्गत नोंदणी व भूमी अभिलेख विभागातील सुधारणा आणि सुविधांबाबत जनतेला अवगत करुन त्यांचे अभिप्राय घेण्यासाठी विभागाची जनजागृतीपर कार्यशाळा संपन्न.
·         सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथे होणाऱ्या यात्रेच्या अनुषंगाने विकासकामांना गती देण्यासाठी 13.5 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आल्याची  सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांच्याद्वारे माहिती.
·         श्री क्षेत्र आळंदी येथे जोग महाराज शताब्दी महोत्सवनिमित्त कार्यक्रमात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. उदय सामंत उपस्थित. महाराष्ट्राला संत, महंत आणि वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. संतांची परंपरा पुढे चालू रहावी आणि वारकरी सांप्रदायाचे संस्कारही या पिढीला मिळावेत, यासाठी वारकरी आणि संत वाड्मय एकत्रित अभ्यासक्रम तयार करण्यासाठी समिती गठीत करण्याची श्री. सामंत यांची घोषणा.
·         गृहनिर्माण मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद. महत्वाचे मुद्दे :- गृहनिर्माण क्षेत्रातील मरगळ दूर करून या क्षेत्राला नवी उभारी देण्यासाठी थेट परकीय गुंतवणूक आणण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील, म्हाडामध्ये चतुर्थ श्रेणी शासकीय कर्मचारी आणि पोलिसांसाठी प्रत्येकी दहा टक्के घरे आरक्षित करण्याचा निर्णय, एसआरएला यापुढील काळात 'आसरा' असे संबोधणार, म्हाडा ची ओळख आता 'रोटी, कपडा और म्हाडा' अशी राहील,नव्या पिढीला मुंबई घडविणाऱ्या महापुरुषांची माहिती व्हावी म्हणून गृहनिर्माण विभागातर्फे कॉफीटेबल बुकची निर्मिती,झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील सदनिकांच्या क्षेत्रफळात वाढ, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये झोपडीधारकांच्या पात्रतेच्या संदर्भात केंद्रीय यंत्रणेमार्फत परिशिष्ट दोनची निर्मिती, झोपडीत प्रत्यक्षात वास्तव्य करणाऱ्या व्यक्तीला घर, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या योजनांची गतिने तांत्रिक तपासणी व अधिक पारदर्शकपणे करण्यासाठी ऑटो डीसीआर प्रणाली लागू करणार,पुनर्वसन घटक इमारतीच्या बांधकामाची गुणवत्ता व दर्जा वाढविण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अंतर्गत गुणवत्ता कक्षाची निर्मिती, भोगवटा प्रमाणपत्र दिल्यानंतर योजनेतील प्रकल्पग्रस्त सदनिका एका महिन्याच्या आत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे हस्तांतरित करणे विकासकाला अनिवार्य, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील धार्मिक स्थळांच्या स्थलांतरण याबाबत निर्णय घेण्यासाठी समिती स्थापना, पुणे- पिंपरी चिंचवड झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची चटईक्षेत्र निर्देशांक अनुसार असलेली प्रोत्साहन योजना ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण तसेच प्रस्तावित मुंबई महानगर प्रदेशाकरिता लागू करण्याचा निर्णय, मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील एकूण सात महानगरपालिका व आठ नगरपालिका क्षेत्रामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याचा निर्णय, ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये कायमस्वरूपी संक्रमण शिबिरांची तरतूद समाविष्ट करणार,  प्रस्तावित मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील झोपडी धारकांसाठी पार्किंगची तरतूद, शांतीसागर पोलीस सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या कामास लवकरच सुरुवात, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे घाटकोपर येथील चिराग नगर मध्ये स्मारक, इमारतीचे संरचनात्मक लेखापरीक्षण शुल्क रद्द, परळ येथील बीआयटी चाळीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य होते, त्या इमारतीचे जतन करून राष्ट्रीय स्मारक म्हणून विकास करण्याचा निर्णय, गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प मार्गी, माहूल (मुंबई) येथील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी म्हाडाची गोराई तसेच मागाठाणे बोरीवली येथे गृहनिर्माण योजनेत बांधलेल्या 300 घरांचा ताबा महानगरपालिकेकडे सुपूर्द, म्हाडाच्या पुनर्वसन प्रकल्पातील अतिरिक्त बांधकाम क्षेत्राच्या अधिमूल्यात सवलत, म्हाडाच्या भोगवटा प्रमाणपत्र देण्यामध्ये सुलभता, म्हाडा अभिन्यास मंजुरी 45 दिवसात, मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पांच्या सर्व परवानग्या एक खिडकी योजनेद्वारे देण्याचा निर्णय, ठाणे जिल्ह्यातील कळवा येथील शासकीय जमिनीवर सर्वसमावेशक पंतप्रधान आवास योजना राबवण्यात येणार, मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील म्हाडा वसाहतीतील समूह विकासाचा प्रत्येकी एक प्रस्ताव म्हाडाने शासनास तत्काळ सादर करण्याचा निर्णय, ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर गृहनिर्मिती, कोकण मंडळाअंतर्गत दहा हजार घरांची सोडत काढणार.
·         कोरोना विषाणू : राज्यात चार जण निरीक्षणाखाली, 22 जणांना घरी सोडले.
·         गृहमंत्री श्री. अनिल देशमुख यांच्यामार्फत सुरक्षा प्रकल्पांचा आढावा. महत्वाचे मुद्दे : कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने नाविण्यपूर्ण प्रकल्प गतीने राबवा, महिला अत्याचाराच्या घटना पाहता पोलीस विभागाने त्यावर कठोर कारवाई करत वेळीच प्रतिबंध घालावा. त्यासाठी आवश्यक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रकल्प हाती घ्या.शहरातील अंधाऱ्या तसेच धोकादायक जागा निश्चित करुन त्या ठिकाणी पथदिवे लावण्यासाठी महानगरपालिकेला निधी सुपूर्द, या ठिकाणी सीसीटीव्ही, ‘इमर्जन्सी कॉल बॉक्स’ (एस.ओ.एस.) लावण्याचे काम सुरू, शहरातील पोलीस ठाण्यांच्या गस्ती वाहनावर व्हिडिओ रेकॉर्डिंगची यंत्रणा, प्रत्येक पोलीस ठाण्याच्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांना शरीरावर लावण्याचे (बॉडी वॉर्न) कॅमेरा यंत्रणा, टॅबलेट संगणक,खास महिलांना तक्रार करता यावी यासाठी कक्ष, महिला पोलीस, कायदाविषयक सल्लागार तसेच महिला डॉक्टरची उपलब्धता, घटनेच्या ठिकाणी तत्काळ जाऊन संबंधित महिलेला मदत,सीसीटीव्ही सर्व्हेलन्स प्रकल्पात 1432 पोलीस वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली. निर्भया फंडाअंतर्गतचे कॅमेरे दुसऱ्या टप्प्यांतर्गत समाविष्ट असून  कॅमेरे जसजसे कार्यान्वित होतील, तसे ते सर्व डाटा सेंटरशी जोडण्यात येतील.मुंबई सर्व्हेलन्स प्रकल्पाशी खासगी मॉल्स, दुकाने यांच्याही सीसीटीव्ही यंत्रणा जोडण्यात येतील, भविष्यात शहरातील सर्व खासगी इमारतींना सीसीटीव्ही बंधनकारक करण्याच्या दृष्टीने प्रयत्न,मीरा भाईंदर, चंद्रपूर, अमरावती, सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूर तसेच इचलकरंजी या शहरांसाठीच्या सीसीटीव्ही प्रकल्पांना लवकरच मान्यता.
·         राज्यातील आरोग्य केंद्रांमध्ये औषधांच्या उपलब्धतेसाठी आरोग्यमंत्री श्री.. राजेश टोपे यांच्यामार्फत हाफकीन संस्थेची बैठक. आरोग्यमंत्र्यांचे निर्देश : पुरवठा झालेल्या औषधांची गुणवत्ता तपासण्यासाठी विभागनिहाय प्रयोगशाळा सुरू करणार. या वर्षासाठी औषधांची मागणी यादी आरोग्य विभागाने फेब्रुवारी अखेरपर्यंत हाफकीन संस्थेच्या खरेदी कक्षाकडे द्यावी. औषध आणि उपकरणांचे प्रमाणीकरण (स्टॅण्डरायजेशन) करून एकत्रित मागणी करा.


दि. 7 फेब्रुवारी 2020

·         नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य दुष्यंत श्री. सतीश चतुर्वेदी यांना विधानभवनात विधानपरिषद सभापती श्री. रामराजे नाईक निंबाळकर यांच्याद्वारे सदस्यत्वाची शपथ.
·         महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्यावतीने मुंबईमध्ये रविवार दि. 9 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय दौडचे (महाराष्ट्र पोलीस इंटरनॅशनल मॅरेथॉन) आयोजन.
·         दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर आणि सर ज.जी. कला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्राची संस्कृती व लोककलाया विषयावरील चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन व कलाकारांचा, राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार.
·         उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांच्या उपस्थितीत विज्ञान संस्थेचा वार्षिक पदवीदान समारंभ संपन्न. व्हर्च्युअल क्लासरुमच्या माध्यमातून शिक्षण संस्थांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे  श्री. सामंत यांचे आवाहन.
·         जर्मनीतील बाडन  वुर्तम्बर्ग या राज्याच्या धोरण समन्वय मंत्री तेरेसा शॉपर यांची उच्चस्तरीय शिष्टमंडळासह राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट.
·         23 व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेचे आणि महाराष्ट्र तसेच देशातील विविध राज्यांच्या   माहिती तंत्रज्ञान विषयक  प्रदर्शनाचे उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई  यांच्या हस्ते आणि पर्यटन व पर्यावरणमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन.  माहिती व तंत्रज्ञान विभाग, केंद्राचा प्रशासकीय सुधारणा एवं जन तक्रार विभाग, माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार, यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय  परिषद आयोजित. ब्लॉक चेन सँडबॉक्सचे अनावरण. श्री. देसाई - गेल्या वर्षी नवीन औद्योगिक धोरण जाहीर, त्यामध्ये बदलत्या तंत्रज्ञानावर आधारित आर्टिफिशअल इंटेलिजिन्स, फिनटेक पॉलिसी आदी बाबींचा समावेश,  नव उद्यमींना ब्लॉकचेन या क्षेत्रात काम करण्याची मोठी संधी उपलब्ध, या  प्रणालीद्वारे राज्यातील जनतेला सर्व योजनांची सहजरीत्या माहिती उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न, श्री. ठाकरे -अनेक लोक मंत्रालयात आणि शासकीय कार्यालयात गर्दी करतात. नागरिकांना त्यांच्या कामासाठी कोणत्याही शासकीय यंत्रणेच्या दारी न जाता घरपोच सुविधा मिळाव्यात यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग व्हावा,ई-गव्हर्नन्स म्हणजे केवळ इलेक्ट्रानिक गव्हर्नन्स न ठरता, 'ईज ऑफ लाइफ' म्हणजे जीवन सुलभ बनविण्यासाठीचे साधन ठरावे, घरपोच सेवा मिळण्याच्या या काळात सामान्य नागरिकांना तंत्रज्ञानाच्या मदतीने शासकीय सेवांचा घरपोच लाभ मिळावा, तंत्रज्ञान हे जात-पात, धर्म असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान सेवा देणारे माध्यम, देशातील लोकशाहीला अधिक बळकटी देण्यासाठीही तंत्रज्ञानाचा वापर महत्वपूर्ण ठरणार, दुतर्फा संवादाचे माध्यम म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर शक्य, मुंबई ही ज्याप्रमाणे देशाची आर्थिक राजधानी आहे, त्याचप्रमाणे ती लवकरच फीनटेक उद्योगांचीही राजधानी बनेल असा विश्वास,
·         महाराष्ट्र शासनामार्फत लोककल्याणकारी योजना राबविण्यासाठी  ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा अवलंब. अशा प्रकारचा वापर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य, लवकरच याबाबतचे धोरण राज्य शासन जाहीर करणार, ब्लॉकचेन तंत्रज्ञानाअंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या विविध प्रणालीसाठी एक sandbox तयार, महाशृंखला या नावाने तयार करण्यात आलेल्या प्रणालीचे, श्री. ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन.





  • माहिती तंत्रज्ञानवाहनपायाभूत सुविधाकला-संस्कृतीसह पर्यावरण क्षेत्रात एकत्रित काम करण्यासाठी जर्मनीतील बॅडन- -ह्युटनबर्ग तसेच महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार.  महाराष्ट्र शासनाच्यावतीने उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि जर्मनीच्यावतीने बॅडन- -ह्युटनबर्गच्या मंत्री थेरेसा शॉपर उपस्थित.
  • महाराष्ट्रातील पर्यटन प्रसिद्धीसाठी पर्यटन संचालनालयामार्फत चेन्नई येथे भव्य रोडशोचे आयोजन.
पर्यटन मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे पर्यटन व्यावसायिकांशी संवाद - महाराष्ट्र आणि तमिळनाडू या दोन राज्यात कला, संस्कृती, साहित्य इ. बाबतीत समृद्ध वारसा आहे. तामिळ आणि मराठी या दोन्ही  भाषा श्रेष्ठ असून वर्षानुवर्षांपासून अस्तित्वात आहेत. सांस्कृतिक देवाण-घेवाणीद्वारे या दोन राज्यांमधील संबंध आणखी वृद्धींगत करणे शक्य.
  • महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या 8.53  टक्के व्याजदराच्या महाराष्ट्र राज्य विकास कर्ज2020  अदत्त शिल्लक रकमेची परतफेड दि. 9 मार्च 2020 पर्यंत (दि.10 मार्च 2020 रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने) देय असलेल्या व्याजासह दि. 9 मार्च 2020  रोजी सममूल्याने करण्यात येईल.
  • महाराष्ट्र शासनाने 8 वर्ष मुदतीचे  2500   कोटी रुपयांचे रोखे विक्रीस काढले आहेत. राज्य शासनास 500 कोटी रुपयापर्यंत अतिरिक्त रक्कम उभारण्याचा पर्याय यात उपलब्ध.  ही विक्री शासनाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेला रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या विकास कार्यक्रमांसाठी केला जाईल.
·         महाराष्ट्रातील केंद्र शासनाच्या अखत्यारितील कार्यालये, बँका, रेल्वे तसेच टपाल कार्यालयात त्रि-भाषा सूत्रानुसार मराठी भाषेचा सक्तीने वापर करावा, अशी मागणी करणारे, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र.
·         चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे नूतनीकरण आणि बांधकामाला गती देण्याचे परिवहन व संसदीय कार्य मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे  पालकमंत्री अनिल परब यांचे निर्देश.
·         महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या मार्फत जिल्हा यंत्रनेशी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे संवाद महत्वाचे मुद्दे -: 15 एप्रिल पूर्वी योजना पूर्ण करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दररोज आढावा घेणार, 21 फेब्रुवारीपासून गाव निहाय याद्यांना प्रसिद्धी, दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्याचे निर्देश, शेतकऱ्यांच्या आधार क्रमांच्या प्रमाणिकरणाच्या वेळेस प्रशिक्षित कर्मचारी तैनात करणार, इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसलेल्या जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत दळणवळण आराखडा तयार केला जाणार, गावनिहाय यादी तयार करताना विशेष खबरदारी, या योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या पोर्टलवर 88 टक्के डाटा अपलोड, 32 लाख 16 हजार 278 शेतकऱ्यांची माहिती अपलोड, कर्ज खात्याच्या आधार जोडणीचे प्रमाण 95 टक्के, 95 हजार 769 केंद्रावर प्रमाणीकरणाची सुविधा.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.