महाराष्ट्र हे देशाला नवी दिशा देणारे राज्य : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतअनुसूचित जाती, अनुसूचित जमातींच्या आरक्षणाला मुदतवाढ देणारी संविधान सुधारणा - विधेयकास समर्थन देण्याचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर


      
मुंबई, दि. 8 : महाराष्ट्र विधानसभेच्या आज झालेल्या एक दिवसीय विशेष बैठकीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यासाठी लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेमध्ये राखीव जागा ठेवण्यास तसेच अँग्लो इंडियन समाजास नामनिर्देशनाद्वारे प्रतिनिधित्व देण्यास पुढील 10 वर्षासाठी मुदतवाढ देणारे संसदेने मंजूर केलेले संविधान (एकशे सव्वीसावी सुधारणा) विधेयक, 2019 या विधेयकाच्या अनुसमर्थनाचा ठराव एकमताने संमत करण्यात आला.

महाराष्ट्र हे देशाला नवी दिशा देणारे राज्य : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
        
या विधेयकाच्या अनुषंगाने महाराष्ट्र विधानमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन घेण्यात आले. त्याप्रसंगी ठराव मांडताना विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र हे देशात पुढारलेले राज्य असून देशाला नेहमीच नवी दिशा देण्याचे कार्य केले आहे. महाराष्ट्राच्या भूमीत अनेक साधुसंतांनी सामाजिक एकतेसाठी, समानतेसाठी काम केले आहे. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक समाजसुधारकांनी सर्व समाजघटकांना न्याय मिळावा यासाठी भूमिका घेतली आहे.
        
अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीतील समाज आजही खडतर परिस्थितीचा सामना करत असल्याचे आपण पाहतो. त्यांचे हक्क त्यांना मिळणे गरजेचे आहे. समाजाला प्रतिनिधित्व मिळण्यासाठी हे गरजेचे आहे. हे विधेयक समाजातील सर्व स्तरांना समान संधी देणारे असून सामाजिक न्यायाचा भक्कम पाया आहे. त्यामुळे संविधानातील या तरतुदीला मुदतवाढ देताना विशेष आनंद होत आहे. विधेयक मंजूर केल्यामुळे भारतीय संसदेचेही अभिनंदन करतो.
        
विधेयकास अनुसमर्थन देण्याबाबतचा ठराव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत मांडला. त्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनुमोदन व पाठिंबा दिला. संसदेने संमत केलेल्या संविधान (एकशे सव्वीसावी सुधारणा) विधेयक, 2019 द्वारे प्रस्तावित केलेल्या, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 368 च्या खंड (2) मधील परंतुकाच्या खंड (घ) च्या कक्षेत येणाऱ्या सुधारणेचे अनुसमर्थन करण्याचा ठराव विधानसभेत एकमताने संमत करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.

विधानसभेत दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली

माजी सदस्य चुन्नीलालभाऊ गोपालभाऊ ठाकूर, अमृतराव वामनराव पाटील यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत शोकप्रस्ताव मांडला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी शोकभावना व्यक्त केल्या आणि सभागृहात श्रद्धांजली वाहिली.

विधानसभा आणि विधानपरिषदेच्या कामकाजास वंदे मातरमने सुरुवात करण्यात आली व कामकाज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले.
0000
सचिन गाढवे/काशिबाई थोरात/ वि.सं.अ./दि.8.1.2020
0000

Legislative Assembly function:

Constitutional amendment extending the reservation of Scheduled Castes and Scheduled Tribes
A resolution to support the bill unanimously approved in the Legislative Assembly

Maharashtra always give new and positive direction to the country
- Chief Minister Uddhav Thackeray
Mumbai, 8.Jan.19: A resolution to support the bill giving extension to reserve seats of schedule caste and schedule tribe in Loksabha and in state assemblies and giving representation by the nomination to the Anglo-Indian community for next ten years, unanimously approved in legislative Assembly, in a special meeting of the Maharashtra Legislative Assembly which was held on today.
Maharashtra always give new and positive direction to the country: Chief Minister Uddhav Thackeray
 In pursuance of this bill, a one-day special session of Maharashtra Legislature was held. While presenting the resolution on the occasion, Chief Minister Uddhav Thackeray said that Maharashtra is an advance state in the country and has always worked to give direction to the country. In the land of Maharashtra, many saints have worked for social unity, and equality. Mahatma Phule, Dr.Babasaheb Ambedkar and many social reformers have played an important role in getting justice for all the constituents of the society.
 “We see that the Scheduled Castes and the Scheduled Tribes are facing a tough situation even today. They need to get their rights. It is necessary for the society to get representation. The Bill provides equal opportunity to all levels of society and is the cornerstone of social justice. It is therefore a pleasure to approve this provision of the Constitution. I also congratulate Parliament to pass this bill” said Chief Minister.
Chief Minister Uddhav Thackeray submitted a resolution to ratify the bill. He was endorsed and supported by opposition leader Devendra Fadnavis. Proposed by the Constitution (One Hundred Sixteenth Amendment) Bill, 2019, the resolution unanimously approved in the Legislative Assembly to repeal the amendments made in section (GHA) of provision in clause (2) of Article 368 of the Indian Constitution, passed in state assembly unanimously.
Tribute to the deceased members in the Assembly
Chief Minister Uddhav Thackeray offered condolence in the Legislative Assembly over the demise of former members Chunnilabhau Gopalbhau Thakur and Amritrao Vamanrao Patil. Opposition Leader Devendra Fadnavis, Water Supply and Sanitation Minister Gulabrao Patil expressed their condolences and paid tribute in the assembly.
 The working of the Legislative Assembly and the Legislative Council was started with Vande Mataram and concluded by the national anthem.

0000कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.