'जय महाराष्ट्र', 'दिलखुलास' कार्यक्रमात उद्या विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


     


मुंबई, दि. 13 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र'   'दिलखुलास' कार्यक्रमात 'महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय मॅरेथान २०२०' या विषयावर विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. 14 जानेवारी रोजी सायंकाळी 7.30 वाजता प्रक्षेपित होणार आहे. तर राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून मंगळवार दि. 14 जानेवारी आणि बुधवार दि. 15 जानेवारी रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका पल्लवी मुजुमदार यांनी ही मुलाखत घेतली आहे.
          
महाराष्ट्र पोलिसांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या आयोजनामागचा उद्देश, पोलीस विभागाने या मॅरेथॉनची केलेली तयारी, मॅरेथॉनमध्ये स्वयंसेवी संस्थांचा सहभाग, मॅरेथानसारख्या उपक्रमामुळे पोलिसांचा जनतेशी संवाद वाढण्यास होणारी मदत, पोलीस विभागामार्फत पोलिसांसाठी राबविण्यात येणारे आरोग्यविषयक उपक्रम, मॅरेथॉनमध्ये लोकसहभाग  वाढावा यासाठी करण्यात आलेले आवाहन आदी विषयांची माहिती श्री. कृष्णप्रकाश यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.