चित्रपटसृष्टीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या नवोदितांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



मुंबई, दि. 15 : पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. 18 जानेवारी 2020 रोजी सकाळी 11.00 ते 4.00 या वेळेत चित्रपटसृष्टीत प्रवेश करु इच्छिणाऱ्या नवोदित कलाकारांसाठी ऑडिशन, मार्गदर्शन कार्यशाळा पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या मिनी थिएटर येथे आयोजित करण्यात आली आहे.

ही कार्यशाळा विनामूल्य स्वरुपाची असेल. या कार्यशाळेसाठी चित्रपट क्षेत्रातील दिग्दर्शक, छायाचित्रकार, अभिनेते यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. चित्रपटसृष्टीत नव्याने प्रवेश करु इच्छिणाऱ्या नवोदित कलाकारांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार असून ऑडिशन कसे द्यावे याबाबत सखोल मार्गदर्शन होणार आहे. यास्तव या कार्यशाळेत इच्छुकांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्री.बिभीषण चवरे, प्रकल्प संचालक, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्यातर्फे करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या 022-24308876 या क्रमांकावर संपर्क करावा.
000
राजू पाटोदकर/वि.सं.अ./15.01.2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.