कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी घेतला आढावा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 6 : कामगार आणि राज्य उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला.

कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या संघटित आणि असंघटित कामगारांसाठी विविध योजनांचा तसेच सुविधांच्या अंमलबजावणीचा आढावा श्री.वळसे-पाटील यांनी घेतला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कामकाजाचादेखील मंत्री श्री. वळसे-पाटील यांनी आढावा घेऊन कामकाजाच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी कामगार विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
००००
वर्षा आंधळे, वि.सं.अ. ६ जानेवारी २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.