चुकीच्या शब्दांचा वापर टाळावा - भाषातज्ज्ञ भास्कर नंदनवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

                 
                       
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा समारोप

नवी दिल्ली, दि. १५मराठी भाषा  लिहिताना व बोलताना चुकीच्या शब्दांचा  वापर टाळणे हेच मराठी भाषा संवर्धनात प्रत्येकाचे  गदान ठरेल, अशा भावना भाषातज्ज्ञ  प्रा. भास्कर नंदनवार  यांनी आज येथे व्यक्त केल्या.
           
महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने १ ते १५ जानेवारी २०२० दरम्यान आयोजित   मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या समारोप कार्यक्रमात प्रा. नंदनवार  बोलत होते. मराठी भाषा संवर्धनात उल्लेखनीय योगदानासाठी गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त श्यामलाल गोयल आणि  निवासी आयुक्त समीर सहाय यांच्या हस्ते दिल्लीतील व्यक्ती व संस्थांचा यावेळी सत्कार करण्यात आला. पंधरवड्या दरम्यान घेण्यात आलेल्या सुंदर हस्ताक्षर आणि निबंध स्पर्धेच्या विजेत्यांना यावेळी बक्षीस वितरीत करण्यात आले.
           
महाराष्ट्रीय स्नेहसंवर्धक समाज संस्थेचे अध्यक्ष विजय महादाणी, वनिता समाजाच्या अध्यक्ष  नीलिमा चिमलवार,  नूतन मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका  शुभदा बापट, चौगुले पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका पूजा साल्पेकर, भाषातज्ज्ञ प्रा. भास्कर नंदनवार आणि ज्येष्ठ पत्रकार सुरेखा टाकसाळ यांचा यावेळी शाल, श्रीफळ  व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

सत्कारानंतर बोलताना भाषातज्ज्ञ  प्रा. भास्कर नंदनवार  म्हणाले, भाषाशास्त्राचा प्राध्यापक म्हणून गेली ३३ वर्ष  काम केले आहे. गेल्या पंधरा वर्षापासून दै. लोकमतमध्ये मराठी भाषेतील विविध शब्दांची व्युत्पती , नवीन शब्दार्थ  किंवा प्रचलीत शब्दाबदल्‍   माहिती सांगणारे सदर  लिहित आहे. हे सर्व कार्य करीत असताना  मराठी भाषा बोलताना व  लिहिताना होत असलेल्या दुर्लक्षाकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून विविध उदाहरणे  दिली. चुकीच्या शब्दांचा  वापर टाळणे हेच मराठी भाषा संवर्धनात प्रत्येकाचे  येागदान ठरेल असे ते म्हणाले.

महाराष्ट्रीय स्नेहसंवर्धक समाज संस्थेचे अध्यक्ष  विजय महादाणी म्हणाले,  महाराष्ट्राची संस्कृती,पंरपरा जपण्यासाठी राज्यातील उत्सव साजरे करण्यासाठी मराठी माणसांनी मिळून राजधानी दिल्लीत २३ डिसेंबर १९१९ रोजी या संस्थेची स्थापना केली. सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक  क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या या संस्थेने यावर्षी शताब्दी वर्ष साजरे केले. . वा. मावळणकर, काकासाहेब गाडगीळ,  विठ्ठलराव गाडगीळ, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण  यांनी या  संस्थेचे अध्यक्षपद भूषविले आहे. दिल्लीत येणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेची रास्त दरात निवासी व्यवस्था व्हावी या उद्देशाने संस्थेने १९५१ मध्ये पहाडगंज भागात 'दिल्ली महाराष्ट्रीय समाज ट्रस्ट' ची स्थापना करून बृह्नमहाराष्ट्र हे अतिथीगृह उभारल्याचे त्यांनी सांगितले.

वनिता समाजाच्या अध्यक्ष  नीलिमा  चिमलवार  म्हणाल्या, दिल्लीतील मराठी महिलांनी एकत्र  येत वनिता  समाजाची स्थापना केली. या संस्थेला ७० वर्ष पूर्ण झाली आहेत.  संस्थेच्या वतीने बालवाडी  चालविण्यात येते. संस्थेचे स्वतंत्र ग्रंथालय असून १० हजरांहून अधिक मराठी पुस्तक याठिकाणी  उपलब्ध आहेत. दर महिन्यात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते तसेच वर्षातून एकदा वधुवर मेळाव्याचे आयोजन करण्यात येते असे चिमलवार यांनी सांगितले.            


नूतन मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका शुभदा बापट म्हणाल्या,  व्यवसाय व नोकरी निमित्त  दिल्लीत निवासी असलेल्या  मराठीजनांना आपल्या पाल्यांना मराठीतून शिक्षण देता यावे म्हणून 'महाराष्ट्रीय शैक्षणिक,सांस्कृतिक संस्थेची' स्थापना करून पहाडगंज भागात १९२९ मध्ये नूतन मराठी प्राथमिक शाळेची स्थापना केली. आज वरिष्ठ माध्यमिक शाळेत याचे रुपांतर झाले आहे. या शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण, प्रसिद्ध कलाकार उत्तरा बावकर, प्रसिद्ध उद्योजक अशोक शिंदे आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी आनंद कुलकर्णी यांचा समावेश  असल्याचे त्यांनी सांगितले.


चौगुले पब्लिक स्कलच्या मुख्याध्यापिका पूजा साल्पेकर  म्हणाल्या, १९५६  मध्ये करोलबाग येथे  एका गॅरेजमध्ये  या शाळेची सुरवात झाली. पुढे  मराठी लोकांनी करोलबागेतच जागा विकत घेन शिशुविहार नावाची शाळा  सुरु केली.  चौगुले शिपिंग कॉर्पोरेशनच्या माध्यमातून या शाळेची वाटचाल हो  १९९८ पासून चौगुले पब्लिक स्कूल नावाने  ही शाळा नावारुपाला आली.  शाळेमध्ये ८ वी पर्यंत मराठी हा विषय  अनिवार्य आहे .  मराठी व अमराठी विद्यार्थी हा विषय आनंदाने शिकतात. या शाळेच्या विद्यार्थ्यांनी  गणतंत्र दिनी  राजपथावर होणाऱ्या पथसंचलनात सहभाग घेन मराठीची पताका उंचावली  असल्याचे  त्यांनी सांगितले.  

ज्येष्ठ पत्रकार सुरेखा टाकसाळ यांनी पत्रकारितेतील त्यांचा प्रवास व  दिल्लीतील पत्रकारितेचा अनुभव कथन केला. पत्रकारिता करताना दिल्लीच्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय  जीवनाचा अनुभव घेता आला, त्याचे वार्तांकन करता आले. त्या म्हणाल्या, माझे  आजोबा  काकासाहेब  लिमये हे प्रसिध्द मराठी वृत्तपत्र ज्ञानप्रकाशचे  दीर्घकाळ संपादक राहिले असून यांच्या प्रेरणेनेच पत्रकारितेत आले . आई , आजी  आणि पती यांनी या क्षेत्रात कार्य करण्यासाठी सतत प्रोत्सहान दिल्याचे त्यांनी  सांगितले.

यावेळी निवासी आयुक्त समीर सहाय, गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त श्यामलाल गोयल यांनी उपस्थितांना संबोधित केले. महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी प्रास्ताविक केले तर उपसंपादक रितेश भुयार यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.   

निबंध स्पर्धेत डॉ. गवई तर सुंदर हस्ताक्षरात विशाल कदम पहिले
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात २ जानेवरी रोजी 'सुंदर हस्ताक्षर स्पर्धा' तर  ४ जानेवारीला निबंध स्पर्धा घेण्यात आली. 'मराठी भाषा संवर्धनात माझे योगदान' या विषयावरील स्पर्धेसाठी  केंद्र शासनात कार्यरत डॉ. मनीष गवई  यांना पहिल्या तर महाराष्ट्र सदनाचे स्वागत अधिकारी प्रमोद कोलापटे यांना  दुसऱ्या क्रमांकाचे रोख बक्षीस प्रदान करण्यात आले. या स्पर्धेत महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षा अधिकारी अनिल चोरगे यांनी तिसरा क्रमांक पटकाविला.  सुदंर हस्ताक्षर स्पर्धेत महाराष्ट्र सुरक्षा बलाचे विशाल कदम, हेमंत राठोड आणि अविनाश राठोड यांनी पहिले तीन क्रमांक पटकाविले. यावेळी  अविनाश राठोड यांना बक्षीस प्रदान करण्यात आले..       
    
महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने १ ते १५ जानेवारी २०२० दरम्यान महाराष्ट्र सदनात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. पंधरवड्याचे उद्घाटन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते झाले. पंधरवड्या दरम्यान दररोज  फलकावर दर्शनी भागात मराठी सुभाषिते लिहिण्यात आली तसेच दिवाळी अंकांचे प्रदर्शनही भरविण्यात आले.  निबंध स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आल्या. मराठी पत्रकार  दिनाचे आयोजन करुन ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. 'तुकाराम' हा मराठी चित्रपट दाखविण्यात आला. मराठी काव्यवाचन झाले. आज  या पंधरवड्याचा समारोप झाला.    
                                                              *****

रितेश भुयार /वृत विशेष क्र.11 / दि.15.01.2020


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.