विधानपरिषदेच्या एका जागेसाठी २४ जानेवारीला पोटनिवडणूक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतनवी दिल्ली, दि. 04 : श्री. धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून गेल्याने रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी 24 जानेवारी 2020 ला पोटनिवडणूक घेण्यात येणार असून त्याच दिवशी मतमोजणी  होणार  आहे.

मागीलवर्षी 24 ऑक्टोबरला विधानपरिषदेचे आमदार धनंजय मुंडे हे विधानसभेवर निवडून गेल्याने वरिष्ठ सदनाची ही जागा रिक्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने शुक्रवारी  विधानपरिषदेच्या या रिक्त जागेसाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 7 जानेवारीला निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 14 जानेवारी  असून 15 जानेवारीला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. 17 जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. तर 24 जानेवारीला मतमोजणी पार पडून निकाल जाहीर होईल.


या  विधानपरिषद सदस्यपदाची  कालमर्यादा 7 जुलै 2022 पर्यंत  आहे.
००००
रितेश भुयार/दि.4.1.2019

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.