चणे -फुटाणे विकून शिक्षणासाठी धडपडणाऱ्या संतोष साबळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दिलासा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


प्रामाणिक प्रयत्नासाठी मदतीचे आश्वासन; माध्यमातील बातम्यांची मुख्यमंत्र्यांकडून दखल

मुंबई,दि. 14 : मुंबईत चणे -फुटाणे विकून शिक्षणासाठी रात्रीचा दिवस करणाऱ्या धडपड्या संतोष साबळे याला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रामाणिक प्रयत्न कर, तुला लागेल ती मदत केली जाईल असा दिलासा दिला.

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील राजेवाडीचा संतोष साबळे रात्री दहा ते पहाटे पाच वेळेत चौपाटीवर चणे फुटाणे विकून दिवसा मुंबई विद्यापीठात राज्यशास्त्राचा अभ्यास करतो. त्याचे स्पर्धा परीक्षेतून प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न आहे. साताऱ्यामधून मुंबईत येऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या संतोष साबळे याची बातमी दै.सकाळमध्ये प्रसिद्ध झाली होती. संतोष खूप गरीब असून दिवसा तो कलिना येथे विद्यापीठाच्या ग्रंथालयात अभ्यास करतो आणि सायंकाळनंतर मरिन लाईन्स आणि गिरगाव चौपाटी येथे शेंगदाणे विकतो. अशा आशयाच्या 'सकाळ'च्या बातमीची दखल घेऊन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी संतोषशी संपर्क साधण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आपला रात्रीचा नित्यक्रम संपवून विद्यापीठात जाणाऱ्या संतोषला मंत्रालयात येण्यासाठी संदेश देण्यात आला.

मंत्रालयात मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी संतोषची आस्थेने चौकशी केली. त्याची माहिती घेतानाच शिक्षणाच्या धडपडीचे कौतुक केले. "शिक्षणासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न कर, त्यासाठी तुला लागेल ती मदत केली जाईल,"असा दिलासा दिला. त्यासोबतच संतोषला कोणत्या प्रकारे मदत करता येईल याची माहिती घेऊन, त्याला अभ्यासासाठी तातडीने सर्वतोपरी मदत करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सामाजिक न्याय विभागाला दिले.

भारावलेल्या संतोषने मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी स्वत: दखल घेऊन आपली आस्थेने चौकशी केल्याबद्दल आभार मानले. यातून प्रेरणा घेऊन आणखी जोमाने शिक्षणासाठी प्रयत्न करण्याचा मनोदय व्यक्त केला.
०००
निशिकांत तोडकर/विसंअ/14.1.2020

Taking cognizance of media story
Chief Minister Uddhav Thackeray assures street vendor Santosh for all possible assistance
Mumbai, January 14:- Chief minister Mr Uddhav Thackeray assured a struggling youth named Santosh Sable for provide all possible assistance to him and asked him to keep on sincere efforts for higher education. He is a peanuts and gram vendor who is on the move the entire night and pursuing the higher education at day time.
 Santosh Sable, who hails from Rajewadi village of Maan Tehsil in Satara district, is selling peanuts and grams from 10 p.m. to 5:00 a.m. on the Chaupati for earning his bread and butter and meeting the expenses of his higher education. He is pursuing the political science course at the Mumbai University and his ambition is to become administrative officer through the competitive examinations. Daily Sakal has published the story of Santosh’s struggle who came all the way to Mumbai from Satara with the objective of preparation for competitive examinations. Santosh studies at the University library in Kalina during the daytime and at night, he goes to Marine Line and Girgaon Chaupati for selling the peanuts and grams.
 The chief minister took cognizance of this story published in Dainik Sakal and directed his office to contact Santosh. He was informed to visit the Mantralaya, keeping inside his daily routine. Chief Minister Mr Thackeray enquired about various aspects of his struggle with affection. He also applauded the efforts taken by Santosh for seeking education. Mr Thackeray said, ‘You carry on sincere efforts for the education and we will provide you whatever assistance you need’.
 Santosh breathed a sigh of relief. The chief minster took the information in concern with helping the youth. He directed the social justice department to provide him all possible assistance with immediate effect for his education. Santosh became emotional as the chief minister himself enquired about his plight. He also thanked the chief minister and said that now he got a boost to complete his higher education with more enthusiasm.
0000कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.