‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मराठी भाषा विभागाचे सचिव अतुल पाटणे यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबईदि. ९ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’   ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘मराठी भाषा पंधरवडा’ या विषयावर मराठी भाषा विभागाचे सचिव अतुल पाटणे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि. १० जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता प्रक्षेपित होणार आहे. तर राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शुक्रवार दि. १० जानेवारी आणि सोमवार दि.१३ जानेवारी रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका उत्तरा मोने यांनी ही मुलाखत घेतली आहे.

मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्यामागची भूमिकापंधरवड्यामध्ये राबविण्यात  आलेले उपक्रममराठी भाषा विभागाचं कामकाज, मराठी भाषेचे जतन व संवर्धन होण्यासाठी विभागाकडून सुरू असलेले प्रयत्ननव्या पिढीसाठी संकेतस्थळमराठी भाषा पंधरवड्यानिमित्त करण्यात आलेले आवाहन  या विषयांची माहिती श्री.पाटणे तसेच मराठी भाषा विभागाच्या सहसचिव अपर्णा गावडे, भाषा संचालनालयाच्या प्रभारी भाषा संचालक नंदा राऊत यांच्या प्रतिक्रिया  ‘जय महाराष्ट्र’  ‘दिलखुलास’ कार्यक्रमात दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.