‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या ‘महाऊर्जा’चे महासंचालक कांतीलाल उमाप यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



दिलखुलासकार्यक्रमात बुधवारी आणि गुरुवारी मुलाखतीचे प्रसारण

मुंबई,दि.6: - माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र  दिलखुलासकार्यक्रमात महाऊर्जाचे योगदान- निर्मिती आणि कार्यया विषयावर महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाचे (महाऊर्जा) महासंचालक कांतीलाल उमाप यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार, दि. ७ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता प्रक्षेपित होणार आहे. तर राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून बुधवार दि. ८ आणि गुरुवार दि.९  जानेवारी रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.
      
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा)  ची निर्मिती, महाऊर्जाचे कार्य,  महाऊर्जाच्या योजना, उपक्रम,   विद्युत कायदा २००३, राज्य ऊर्जा  संवर्धन धोरण २०१७, पवनचक्कीच्या माध्यमातून वीजनिर्मिती, अपारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात शेतकरी आणि ग्रामीण भागाला असलेली संधी, कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचे प्रयत्न या विषयांची माहिती श्री. उमाप यांनी जय महाराष्ट्रदिलखुलासकार्यक्रमातून दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.