यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणूक ३१ जानेवारीला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतनवी दिल्ली, दि.03 : राज्यातील यवतमाळ स्थानिक स्वराज्य मतदार संघातून विधानपरिषदेच्या रिक्त जागेसाठी 31 जानेवारी 2020 ला पोटनिवडणूक  घेण्यात  येणार  असून 4 फेब्रुवारीला  मतमोजणी  होणार  आहे. 

यवतमाळ स्थानिक स्वराज्य मतदार संघातून विधानपरिषदेचे आमदार तानाजी सांवत हे विधानसभेवर निवडून गेल्याने ही जागा रिक्त झाली  आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने आज यवतमाळ विधानपरिषदेच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
   
असा असणार पोट निवडणुकीचा कार्यक्रम
यवतमाळ विधानपरिषदेच्या जागेसाठी 31 जानेवारी 2020 ला मतदान घेण्यात येणार आहे. 7 जानेवारीला निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 14 जानेवारी  असून 15  जानेवारीला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. 17 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. तर 4 फेब्रुवारीला मतमोजणी पार पडून निकाल जाहीर होईल.

यवतमाळ विधानपरिषद सदस्यपदाची कालमर्यादा 5 डिसेंबर  2020 पर्यंत  आहे. 
00000
रितेश भुयार /वृत विशेष क्र.03 / दि.03.01.2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.