युवकांनी समाजहितासाठी कार्य करावे - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
विलेपार्ले येथील संन्यास आश्रमाचा अमृत महोत्सव

मुंबई, दि. १६ : युवकांनी शूरवीर बनून समाजहितासाठी, राष्ट्रधर्म वाढविण्यासाठी कार्य केले पाहिजेअसे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

विलेपार्ले येथील संन्यास आश्रमाच्या अमृत महोत्सवाचे उद्घाटन राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या उपस्थितीत झाले.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, धर्म म्हणजे आदर्श मूल्यांकरिता जगणेइतरांचा आदर करणे व चारित्र्य घडविणे. धर्माचे संस्कार युवा पिढीला दिल्यास चारित्र्यसंपन्न युवक तयार होतील.  

राष्ट्रदेवो भव ही संकल्पना पुरातन काळापासून आपल्या देशात आहे. सधन लोकांनी केवळ संपत्तीचे मालक न होता विश्वस्त जाणिवेने समाजासाठी धन वापरले पाहिजेअसेही श्री.कोश्यारी यांनी संगितले.

आज शिक्षण म्हणजे केवळ रोजगाराचे साधन असे समीकरण झाले असताना संन्यास आश्रम येथे आधुनिक शिक्षणासोबत  वैदिक शिक्षण देत धर्म जागरण व श्रद्धा जागृतीचे कार्य होत असल्याबद्दल श्री.कोश्यारी यांनी समाधान व्यक्त केले.

संन्यास आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरि यांनी आश्रमातर्फे केल्या जाणाऱ्या धर्मसंस्कृती व समाजकार्याची माहिती दिली.

आमदार मंगलप्रभात लोढाआमदार पराग अळवणीस्वामी शुकदेवानंदस्वामी प्रणवानंदस्वामी अखंडानंदगायिका अनुराधा पौडवाल आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.