केंद्राच्या संसदीय स्थायी समितीच्या सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबईदि. ९ : केंद्राच्या परिवहनपर्यटन आणि सांस्कृतिक विषयासाठी संसदीय स्थायी समितीच्या सदस्यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्यातील पर्यटनसांस्कृतिक विषयाच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. राज्यातील पर्यटन स्थळांच्या ठिकाणी असलेली स्वच्छतापार्किंग व इतर सुविधांच्या समस्यांवर काम करण्याची आवश्यकता असल्याचे मत सदस्यांनी व्यक्त केले. राज्यपालांनी  राज्यातील विविध पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी  यावेळी सदस्यांना आमंत्रित केले.

या शिष्टमंडळात खासदार सर्वश्री टी. जी. व्यंकटेशतिरूची सिवाप्रसन्ना आचार्यसौमित्र खान, सुनिल मेढेकमलेश पासवानतिरथ सिंग रावतरामदास तडसके.जी. रेड्डीश्रीमती गोडेट्टी माधवी यांचा समावेश होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.