‘फेकाम’ संस्थेच्या विद्युत कंत्राटदारांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक - नाना पटोले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 6 : रोजगार निर्मितीसाठी शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत असून राज्यातील विद्युत कंत्राटदार आणि कामगारांना बेरोजगारीला सामोरे जावे लागणार नाही. फेडरेशन ऑफ इलेक्ट्रीकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेच्या पदाधिका-यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक भूमिका घेईल, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

विधानभवन येथे फेडरेशन ऑफ इलेक्ट्रीकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अर्थात ‘फेकाम’ यांच्या विविध मागण्या जाणून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री.पटोले बोलत होते.

श्री. पटोले म्हणाले, कामे जलदगतीने व्हावी यासाठी सार्वजनिक बांधकामासंदर्भात सुधारित शासन निर्णय घेण्‍यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील ‘फेकाम’ संघटनेच्या विद्युत कंत्राटदारांना बेराजगारीला सामोरे जावे लागणार नाही. शासन आणि संस्थेच्या विचाराअंती निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी  सांगितले. तसेच अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या विद्युत कंत्राटदारांची शैक्षणिक पात्रता वाढावी व त्यांना नवीन कामांचा अनुभव मिळावा यासाठी तरतुद करण्यात यावी, असे निर्देशही श्री. पटोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकाम) ए.ए. सगणे, इलेक्ट्रीकलचे मुख्य अभियंता संदीप पाटील, ‘फेकाम’चे अध्यक्ष रामेश्वर निंभोरे, माजी अध्यक्ष अरूण पाटील आणि सचिव अतुल पाटील आदींसह संबंधित अधिकारी आणि संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
००००
श्रद्धा मेश्राम/6.1.2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.