भोकर, धर्माबाद, उमरी व भेंडेगावमधील रेल्वे उड्डाणपुलासाठी प्रस्ताव सादर करा - सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

            

मुंबईदि. ९ :  नांदेड जिल्ह्यातील हदगाव-तामसा-उमरी महामार्गावरील भोकर शहरातील अपूर्ण रेल्वे उड्डाणपूल पूर्ण करणे आणि  धर्माबादउमरीभेंडेगाव चौक व किनवट तालुक्यातील गोकुंदा येथे नवे उड्डाणपूल उभारण्याबाबत आठ दिवसात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) अशोक चव्हाण यांनी आज येथे दिले.

नांदेड जिल्ह्यातील रेल्वे फाटकाच्या ठिकाणी पुल बांधण्यासंदर्भात श्री.चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी त्यांनी विविध सूचना केल्या. श्री. चव्हाण म्हणाले कीभोकर शहरातील लेव्हल क्रॉसिंग क्र.वर रेल्वे उड्डाणपुलाचे काम मंजूर करण्यात आले होते. मात्रदोन वर्षे झाले तरी अद्याप काम पूर्ण झालेले नाही. पुलाकडे जाणाऱ्या पोच रस्त्याचे काम राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. मात्ररेल्वे रुळावरील उड्डाणपुलाचे काम अर्धवट आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. हे काम तातडीने सुरू होण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने रेल्वे विभागाशी संपर्क साधून लवकरात लवकर काम पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करावा. तसेच पोच रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम तातडीने सुरू करावे. या पुलाच्या कामातून बचत होणाऱ्या रक्कमेतून भोकर-नांदेड रस्त्यावरील काही भागाचे काँक्रिटीकरण करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करावा.

याशिवाय धर्माबाद व उमरी येथेही रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाची आवश्यकता आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव तातडीने सादर करावा. किनवट तालुक्यातील गोकुंदा रेल्वे क्रॉसिंगनांदेड औरंगाबाद रस्त्यावरील भेंडेगाव येथे तसेच वसमत तालुक्यातील कुरुंदा गावाजवळील चौकातही उड्डाणपुलाची आवश्यकता आहे. या सर्व ठिकाणचे प्रस्ताव आठ दिवसात सादर करण्याचे निर्देशही श्री. चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिले. मुदखेड ते भोकर या एकपदरी रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा प्रस्तावही सादर करण्याच्या सूचना केल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.