'दिलखुलास' कार्यक्रमात उद्या ‘आपला महाराष्ट्र’ विशेष वार्तापत्र

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



मुंबई, दि. 3 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलासकार्यक्रमात आपला महाराष्ट्रहे विशेष वार्तापत्र  शनिवार दि. ०४ जानेवारी रोजी प्रसारित होणार आहे. हे वार्तापत्र राज्यातील आकाशवाणीच्या 22 केंद्रांवरून तसेच प्रसारभारतीच्या 'न्यूज ऑन एअर' या ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.
  
आपला महाराष्ट्रया वार्तापत्रात दर आठवड्यात राज्यातील विविध भागांत घडलेल्या घटना, घडामोडी, शासनाचे महत्त्वाचे निर्णय यांचा विस्तृत आढावा घेतला जातो. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, परभणी, रत्नागिरी, सांगली,  अहमदनगर, अकोला,  अमरावती, बीड, चंद्रपूर, धुळे, नांदेड, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, सातारा, सोलापूर,यवतमाळ या 22 आकाशवाणी केंद्रावरून हे वार्तापत्र प्रसारित  केले जाणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.