'एक कलासक्त प्रवास : मातोश्री ते मंत्रालय' पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 28- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीवर आधारित 'एक कलासक्त प्रवास : मातोश्री ते मंत्रालय' या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मंत्रालयात झाले.

विधान परिषदेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या या पुस्तकाचे लेखन आणि संपादन मनोज आवाळे यांनी केले आहे.

या पुस्तक प्रकाशन प्रसंगी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार डॉ. मनीषा कायंदे, लेखक मनोज आवाळे, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.