शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी पाच समान हप्त्यात मिळणार - शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. ९ : राज्यातील खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीमधील सातव्या वेतन आयोगाची थकबाकी पाच समान वार्षिक हप्त्यात देण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
याचा लाभ राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिकमाध्यमिकउच्च माध्यमिककनिष्ठ महाविद्यालयेअध्यापक विद्यालये व सैनिकी शाळांमधील पूर्णवेळ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीराज्यातील महानगरपालिकानगरपरिषदा व नगरपंचायती या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामधील माध्यमिक विभागामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि अर्धवेळ शिक्षक / शिक्षकेतर अशा एकूण ,२९,५४८ कर्मचाऱ्यांना होणार असल्याचे प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची थकबाकी त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा होणार आहे. तसेच परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना लागू असणारे आणि अंशत : अनुदानित शाळामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच अर्धवेळ शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांना थकबाकीची रक्कम रोखीने मिळणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.