'आपलं गिरगाव' दिनदर्शिकेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत




मुंबई, दि 10 : आपलं गिरगाव दिनदर्शिका 2020 चे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मातोश्री येथे करण्यात आले.

यावेळी खासदार अनिल देसाई, रवींद्र मिर्लेकर, श्रीमती मीनाताई कांबळी, विभागप्रमुख पांडुरंग सपकाळ,ज्येष्ठ चित्रपट समिक्षक अरुण पुराणिक, दिलीप ठाकूर, अशोक मुळे, प्रथमेश सपकाळ, बाळ अहिर आदी उपस्थित होते.

दिनदर्शिकेच्या मुखपृष्ठवर मूळ गिरगावकर असलेले मुंबईचे शिल्पकार नाना उर्फ जगन्नाथ शंकर शेट यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले आहे. या दिनदर्शिकेमध्ये मूळ गिरगावकरांची ओळख, लेख आणि
छायाचित्राच्या माध्यमातून जपण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यात साहित्य, कला,सणसंस्कृती,शिक्षण, धार्मिक ,पर्यटन यासह 12 विषयाचा समावेश यामध्ये प्रामुख्याने करण्यात आला आहे.  हे कॅलेन्डर अरुण पुराणिक, दिलीप ठाकूर व अश्विन बापट यांनी संपादित केले आहे आणि पांडुरंग सकपाळ यांनी प्रकाशित केले आहे. जुन्या गिरगावची आठवण करुन देणारी भरपूर छायाचित्रे आणि माहिती हे या कॅलेंडरचे वैशिष्ट्य आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.