जिल्हयातील समस्या लोकप्रतिनिधी व शासनाच्या समन्वयाने चर्चेतून सोडविणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



मुख्यमंत्र्यांनी घेतला परभणी जिल्ह‌्याचा आढावा 

औरंगाबाद, दि. ९ : परभणी जिल्ह्यातील विविध समस्या, अडचणी लोकप्रतिनिधी व शासनाच्या समन्वयाने चर्चेतून सोडविण्यात येणार असून अशा आढावा बैठकींचे नियोजन यापुढेही करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.

विभागीय आयुक्त कार्यालयात परभणी जिल्ह्यातील विविध समस्या तसेच अडचणीबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्यावेळी मुख्यमंत्री श्री ठाकरे बोलत होते.


परभणी येथे कृषी विभागाचे उप विभागीय कार्यालय सुरु करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवावा त्यास तात्काळ मंजुरी देण्यात येईल. तसेच रिक्त पदांच्या बाबतीत आढावा घेऊन ही पदे एक महिन्यात भरावीत, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी यावेळी दिले. परभणी जिल्हा क्रीडा संकुलाची अवस्था दयनीय झाली असून या क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगत या संकुलाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत अशी अपेक्षाही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

शिर्डी येथील साईबाबांचे जन्मस्थळ असलेल्या पाथरीचा विकास करण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे श्री.ठाकरे यांनी यावेळी सांगितले. वैद्यकीय प्रवेशाबाबत मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी वैद्यकीय प्रवेशाबाबत असलेली झोन पद्धती तपासून त्यात सुधारणा करणार असे सांगून परभणी बाह्यवळण रस्त्यासाठी भुसंपादनाचा विषय मार्गी लावण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

परभणी शहराची पिण्याच्या पाण्यासाठीची वाढती गरज लक्षात घेऊन अतिरिक्त पाईपलाईन, भूमिगत गटार योजना, जिल्ह्यातील बंधाऱ्याची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश श्री.ठाकरे यांनी दिले. येलदरी धरणाची गळती दुरुस्त करुन धरणापासून सिंचनासाठी डावे व उजवे कालवे निर्माण करुन शेतीला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी यावेळी सांगितले.  उद्योगांना चालना देण्यासाठी नवीन औद्योगिक वसाहत निर्माण करण्यासाठी त्वरित जागा उपलब्ध करण्याबाबतही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले. शहरातील झोपडपट्टीधारकांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही करण्याच्या सूचना श्री.ठाकरे यांनी यावेळी केली.

या बैठकीस पर्यावरणपर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरेसार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपेरोहयो  मंत्री संदिपान भूमरेमहसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तारपर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडेखासदार संजय जाधवआमदार सर्वश्री डॉ. राहुल पाटीलसुरेश वरपुडकरबाबाजानी दुर्राणीमेघना बोर्डीकर – साकोरेमुख्य सचिव अजोय मेहतामुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी आदींसह विविध विभागाचे प्रधान  सचिवऔरंगाबाद विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरजिल्हाधिकारी पी. शिवशंकरजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. पृथ्वीराजआदींसह जिल्ह्यातील सर्व विभागांचे  वरिष्ठ अधिकारीप्रमुख यांची उपस्थिती होती. यावेळी लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील विविध समस्या मांडल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.