गँगस्टर एजाज युसुफ लकडावाला याला अटक - गृह मंत्री अनिल देशमुख यांची माहिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
पोलिसांच्या कामगिरीबद्दल केले अभिनंदन

मुंबईदि. ९ : गँगस्टर एजाज युसुफ लकडावाला याला काल रात्री पाटणा शहरातून अटक करण्यात आली असल्याची माहिती गृह मंत्री अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. एका मोठ्या गँगस्टरला पकडण्यासाठी मुंबई पोलीस दलाने केलेल्या कामगिरीबद्दल त्यांनी पोलिसांचे अभिनंदन केले.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री.देशमुख बोलत होते. यावेळी मुंबईचे सह पोलीस आयुक्त विनयकुमार चौबेसंतोष रस्तोगी उपस्थित होते.

मंत्री श्री. देशमुख म्हणाले कीगँगस्टर एजाज युसुफ लकडावाला याच्यावर खंडणीचे सुमारे २५ एफआयआर दाखल आहेत. त्याचबरोबर इतर ८० केसेस दाखल असून मोकाचे ४ खटले दाखल आहेत. छोटा राजन हा दाऊद इब्राहीमबरोबर सहभागी असताना लकडावाला त्याच्यासोबत होता. छोटा राजन दाऊदपासून वेगळा झाल्यानंतर लकडावाला हा छोटा राजनसमवेत काम करु लागला. २००८ मध्ये छोटा राजनपासून विभक्त होऊन तो स्वतंत्रपणे ऑपरेट करु लागला. त्याच्यावर खंडणीमोकासारखे विविध खटले दाखल आहेत. पोलिसांच्या प्रयत्नातून काल पाटणा येथून त्याला अटक करण्यात यश आलेअशी माहिती त्यांनी दिली.

शिफा शेख ही लकडावालाची मुलगी आहे. तिने वडिलांचे नाव मनिष अडवाणी असे दाखवून बनावट पासपोर्ट बनवला होता. तिला पासपोर्ट ॲक्टनुसार अटक करण्यात आली. तेथून लकडावालाच्या ठिकाणाची माहिती मिळाली आणि पोलिसांच्या प्रयत्नातून लकडावालाला काल रात्री अटक करण्यात यश आलेअशी माहिती मंत्री श्री.देशमुख यांनी दिली.

कोरेगाव - भीमा प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल. अधिकऱ्यांकडून सविस्तर माहिती घेऊन त्यानंतरच याप्रकरणी भूमिका मांडेनअसे मंत्री श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले कीकोरेगाव- भीमा संदर्भात काही माध्यमांनी माझ्या नावे चुकीची माहिती प्रसारीत केली. कोरेगाव-भीमा संदर्भात सर्व अभ्यास करुन आणि अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर बोलेनअसेही ते म्हणाले.

जेएनयूमधील हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करताना गेटवे ऑफ इंडिया येथे निदर्शने करण्यात आली. त्यावेळी महेक मिर्झा प्रभू या तरुणीच्या हातात ‘फ्री कश्मीर’ असा फलक होता. यामागे तिचा उद्देश काय होता याचा तपास करण्यात येत आहे. काश्मीरमध्ये अजूनही मोबाईल आणि इंटरनेट सेवा सुरळीत नाहीनेत्यांना नजरकैदेत ठेवले आहेया परिस्थितीपासून काश्मीर मुक्त करावा या भूमिकेतून आपण ‘फ्री काश्मीरचा फलक लावलाअसे त्या तरुणीचे म्हणणे आहे. याबाबत पोलीस चौकशी करीत असून संपूर्ण माहिती आल्यानंतर गुन्ह्याबाबत निर्णय घेऊअसे मंत्री श्री.देशमुख यांनी सांगितले.

न्यायमूर्ती लोया प्रकरणाबाबत काही लोकांचा भेटीसाठी फोन आला होता. त्यांच्याशी चर्चा करुन तसेच या प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन त्यानंतरच या प्रकरणाबाबत निर्णय घेऊ. तसेच डिआयजी निशिकांत मोरे प्रकरणामध्ये मोटार ट्रान्सपोर्टचा वाहन चालक असलेला दिनकर साळवे हा पीडित मुलीच्या घरी गेला होताअशी माहिती आहे. त्याची संपूर्ण चौकशी सुरु आहे. चौकशीनंतर योग्य ती कारवाई करण्यात येईलअसे मंत्री श्री.देशमुख यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.