महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर (सोनवणे) यांनी स्वीकारला कार्यभार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबईदि. ९ : महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर (सोनवणे) यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. मंत्रालय विस्तार इमारतीत पाचव्या मजल्यावरील त्यांचे दालन क्रमांक ५४० हे आहे.

यावेळी माजी मंत्री अनीस अहमदमहिला व बालविकास सचिव आय. ए. कुंदनआयसीडीएस आयुक्त इंद्रा मालोसहसचिव लालसिंग गुजरउपायुक्त गोकूळ देवरे आदी उपस्थित होते. उपस्थितांनी मंत्री श्रीमती ठाकूर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

श्रीमती ठाकूर (सोनवणे) म्हणाल्याबचतगट चळवळीद्वारे महिला सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने काम करणार आहे. महिला आयोगाचे सेंटर प्रत्येक जिल्ह्यात स्थापन करण्याचा मानस आहे. महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या दृष्टीने काम करणार आहोत. तसेच बालगृहअनाथ मुलेबालकल्याणसाठी नवीन योजना आणण्यात येईलअसेही त्यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.