पोलीस दलातील कार्यरत नसलेल्या, मयत अधिकाऱ्यांची नावे केंद्र शासनाला कळविणार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मालमत्ता तपशील प्रकरण

मुंबईदि. 16 : भारतीय पोलीस सेवा संवर्गातील अधिकाऱ्यांना त्यांचे वार्षिक अचल मालमत्ता विवरणपत्र भरणे आवश्यक असते. हे विवरणपत्र न भरलेल्या राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांची यादी केंद्र शासनाने पाठविली असून त्यातील कार्यरत नसलेल्यामयत अधिकाऱ्यांची नावे वगळण्यात यावीत असे केंद्र शासनाला कळविण्यात येत आहेअशी माहिती गृह विभागामार्फत देण्यात आली आहे.

राज्यातील काही शहीद पोलीस अधिकाऱ्यांकडे तसेच सेवानिवृत्तखात्यातून कमी करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांकडून मालमत्तेचा तपशील मागविण्यात आल्यासंदर्भातील वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्या अनुषंगाने गृह विभागाने हा खुलासा दिला आहे.


भारतीय पोलीस सेवा संवर्गातील अधिकाऱ्यांना त्यांचे वार्षिक अचल मालमत्ता विवरणपत्र भरण्याकरिता एक ऑनलाईन प्रणाली केंद्र शासनाने विकसीत केली आहे. त्याबाबतची सुविधा SPARROW प्रणालीवर देण्यात आली आहे. सर्व कार्यरत भापोसे अधिकाऱ्यांना त्यांचे वार्षिक मालमत्ता विवरणपत्र 31 जानेवारीपूर्वी भरणे आवश्यक असते. सन 2018 मध्ये ज्या अधिकाऱ्यांनी त्यांचे वार्षिक विवरणपत्र SPARROW प्रणालीवर भरले नसतील अशा अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय गृह मंत्रालयाचे सचिव यांच्या अर्धशासकीय पत्राद्वारे राज्य शासनास कळविण्यात आली. तसेच सन 2019 चे मालमत्ता विवरणपत्र विहीत मुदतीत भरण्यात यावेअशी सूचनाही राज्य शासनाला या पत्राद्वारे करण्यात आली होती. या यादीतील कार्यरत नसलेल्यामयत अधिकाऱ्यांची नावे वगळण्यात यावीत असे केंद्र शासनाला कळविण्यात येत आहेअशी माहिती गृह विभागामार्फत देण्यात आली आहे.
००००
इरशाद बागवान/विसंअ/16.1.2020

0000

The case of asset details
Central Government will be informed with
not on duty and dead officers’ names

Mumbai, date. 16th: Officers of Indian Police Service cadre need to submit their annual immovable asset statement. The Central Government has sent a list that includes the name of state police state officers who have not submitted this statement detail. The Home Department told that names of the dead, not-on-duty officers would be informed to the Central Government.

The news was published that martyr, retired, and suspended state police officers were asked to submit asset details. Home Department clarified on the matter. Central Government has developed an online portal where the officers in Indian Police Service can fill in their annual immovable asset statement. The facility is provided on the SPARROW portal. All active Indian Police Service officers need to submit their annual immovable asset statement before 31st January. Names of officers who did not submit their annual statement on SPARROW for the year 2018 were informed to the State Government through a semi-government letter by the Secretary of Central Home Department.  The same letter also instructs the State Government to submit statement for the year 2019 in the given time limit. Home Department cleared that Central Government will be informed to cut names of inactive, dead officers from this list.

0000कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.