महाराष्ट्र पर्यटन आणि इंडियन हेरिटेज सोसायटीमार्फत ‘मुंबई संस्कृती’ महोत्सवाचे आयोजन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबईदि. ९ महाराष्ट्र पर्यटन आणि इंडियन हेरीटेज सोसायटीमुंबई यांच्यावतीने ‘मुंबई संस्कृती’ या शास्त्रीयनृत्य व संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. एशियाटीक सोसायटीहॉर्नीमन सर्कलफोर्टमुंबई येथे हा महोत्सव ११  १२ जानेवारी, २०२० या कालावधीत आयोजित करण्यात आला असून महोत्सवाच्या माध्यमातून अभिजात कला व संस्कृतीचे जतन करण्यात येणार आहे. यंदाचे महोत्सवाचे २८ वे वर्ष असून 'यूज लाईव्ह म्युझिक टू सेव्ह हेरीटेजया संकल्पनेवर हा महोत्सव आधारीत आहे.

मुंबई संस्कृतीच्या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी उस्ताद अमजदअली खान यांच्यासह अयान अली बांगेश व अमान अली बांगेश यांची सुरेल जुगलबंदी रंगणार आहे. तर महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील नामांकित पं. संजीव अभ्यंकर (गायन) व कलारामनाथ (व्हायोलीन) यांची सुरेल मैफिल पर्यटक/संगीतप्रेमींना अनुभवता येणार आहे.

आपली संस्कृतीपरंपरा आणि ओळख कायम निर्माण करुन ठेवण्यासाठी इंडियन हेरीटेज सोसायटी कायम प्रयत्नशील असते. सन 1992 पासून त्यांनी या सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून आपली संस्कृती जपली आहे. यापूर्वी हा महोत्सव वाळकेश्वर येथील ऐतिहासिक बाणगंगा तलाव येथे ‘बाणगंगा महोत्सव’ या नावाने आयोजित करण्यात येत असे. तथापि न्यायालयाच्या ध्वनी प्रदूषण प्रतिबंधात्मक निर्णयामुळे आदेशानंतर तो एशियाटीक लायब्ररी येथे स्थलांतरीत करुन तो मुंबई संस्कृती या नावाने आयोजित करण्यात येतो. या महोत्सवाचा शासनाच्या वार्षिक कार्यक्रम सूचीमध्ये अंतर्भाव करण्यात आलेला आहे. हा महोत्सव संगीतप्रेमीमध्ये एक प्रतिष्ठीत महोत्सव म्हणून परिचित आहे.

मुंबई संस्कृती हा महोत्सव सर्वांसाठी नि:शुल्क आहे. कार्यक्रमांची निशुल्क प्रवेशिका महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे माहिती व आरक्षण केंद्रे व महाराष्ट्र वॉच कंपनी (दादर पूर्व)चेतना बुकस्टॉल येथे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

मुंबई संस्कृती फेस्टिव्हलबद्दल माहिती

इंडियन हेरीटेज सोसायटी दरवर्षी हा महोत्सव महाराष्ट्र पर्यटनच्या सहकार्याने आयोजित करते. हा कार्यक्रम दरवर्षी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात शनिवारी आणि रविवारी आयोजित केला जातो. सांस्कृतिक वारसा आणि समृद्धी जपण्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.