घनकचरा व्यवस्थापनाचा राज्यस्तरीय प्रकल्प आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

स्वच्छ सर्वेक्षण 2020 च्या अनुषगांने मुख्यमंत्र्यांचा मनपा आयुक्त, नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद

मुंबई, दि. 3 : स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये महाराष्ट्रातील शहरे अव्वल येण्यासाठी छोट्या शहरांबरोबरच मोठ्या शहरांनीही एक टीम म्हणून काम करावे. कचरामुक्त शहरांसाठी घनकचरा व्यवस्थापनचा राज्याचा विस्तृत प्रकल्प आराखडा तयार करावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिल्या. तसेच शहरे स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्रत्येक शहरामध्ये नागरिकांना आनंद देणारी सुंदर उद्याने निर्माण करावीत, असेही त्यांनी सांगितले.
        
स्वच्छ सर्वेक्षण 2020 च्या अनुषगांने आज मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी राज्यातील महानगरपालिका आयुक्त व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री अनिल परब, मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.
        
नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी सादरीकरणाद्वारे स्वच्छ महाराष्ट्र अभियानात आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा सादर केला.

मुख्यमंत्री श्री. म्हणाले, राज्यातील शहरे स्वच्छतेत अग्रेसर राहण्यासाठी सर्वच जण चांगले काम करत आहेत. मात्र, सर्वेक्षणात राज्यातील जास्तीत जास्त शहरांना पहिल्या दहामध्ये मानाकंन मिळण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने सामान्य नागरिक म्हणून आपल्या शहरांकडे पाहणे आवश्यक आहे. त्यातून नागरिकांना काय हवे हे कळण्यास मदत होते. शहरे ही देशाचा चेहरा असल्यामुळे येथील रस्ते, पदपथ, मैदाने, रुग्णालये स्वच्छ व सुंदर राहावीत, यासाठी प्रयत्न व्हावेत. रस्त्यांवरुन चालताना नागरिकांना आनंददायी वाटावे, आपली शहरे पाहण्यासाठी परदेशी पर्यटक यावेत, अशी ती असावीत. त्यासाठी कामांचे प्राधान्यक्रम ठरविण्यात यावे.
        
राज्यातील कचरामुक्तीसाठी राज्यस्तरीय एकत्रित आराखडा तयार करावा. यामध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्प, या प्रकल्पाच्या ठिकाणी हरित पट्टा, कचरा विलगीकरण आदींचा समावेश असावा. तसेच ओला व सुका कचरा शंभर टक्के वेगळा करण्यासाठी प्रयत्न करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शहराचे सौंदर्य वाढविण्यासाठी प्रत्येक शहराने जाहिरात फलक धोरण (होर्डिंग पॉलिसी) तयार करावे. त्यावर कोणते संदेश देण्यात यावे,  असेही त्यांनी यावेळी सांगितले.

अमृत वन योजनेअंतर्गत शहरातील मोकळ्या जागांवर वन निर्माण करणाऱ्या बार्शी, नवी मुंबई, नाशिक, सांगली, उदगीर, अचलपूर आदी शहरांचे कौतुक करून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील सर्वच शहरांमध्ये अमृत वन प्रकल्प राबविण्यात यावा. तसेच अशी अमृत वने दीर्घकाळ टिकावीत यासाठी या ठिकाणी देशी झाडे लावण्यात यावीत. तसेच अशी ठिकाणे कायमस्वरुपी राहावीत, यासाठी त्यांना कायदेशीर संरक्षण द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

मोठ्या शहरांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे - श्री. शिंदे
        
नगरविकासमंत्री श्री. शिंदे म्हणाले, शहरातील रस्ते, पदपथ यांची स्वच्छता व सुरक्षितता महत्त्वाची आहे. स्वच्छ सर्वेक्षणात मानांकन मिळविण्यासाठी मोठ्या शहरांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. राज्यातील शहरांचा दाखला इंदोरसारख्या इतर शहरांनी घ्यावा, अशी परिस्थिती करण्यात यावी. तसेच घातक कचरा, जैववैद्यकीय कचरा, ई कचरा यासंदर्भातही प्रभावीपणे काम करावे लागणार आहे.


नदी स्वच्छता व नागरी जंगल यावर भर द्यावा - आदित्य ठाकरे
मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, कचरामुक्त शहरे झाल्यास शहरांचे सौंदर्य वाढेल. शहरातील स्वच्छतेबरोबर नद्यांच्या स्वच्छतेवर भर देण्यात यावा. यासाठी ग्रामविकास, नगरविकास व पर्यावरण विभागाने एकत्र येऊन आराखडा तयार करावा. शहरी जंगल वाढविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यासाठी मियावाकी पद्धतीने उद्याने उभारावीत. ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री शहर सडक योजना सुरू करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक जिल्ह्यात आपत्ती प्रतिसाद दल निर्माण करावेत. नागरिकांच्या तक्रारींसाठी ऑनलाईन पद्धती वापरावी. शहरीकरणाबरोबरच ग्रामीणीकरण व्हायला हवे.

यावेळी बृहन्मुंबई, नाशिक, नवी मुंबई, औरंगाबाद या महापालिकाच्या आयुक्तांनी तसेच लोणावळा व कराड नगरपालिकाच्या मुख्याधिकाऱ्यांनी स्वच्छ सर्वेक्षणात होत असलेल्या प्रगतीची माहिती दिली.

या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला मंत्रालयात मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे,  बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्यासह नवी मुंबई, ठाणे, उल्हासनगर, मीरा भाईंदर, भिवंडी निजामपूर, पनवेल या महानगरपालिकांचे आयुक्त उपस्थित होते.
०००००

स्वच्छ सर्वेक्षण में अव्वल स्थान प्राप्त करने के लिए टीम के रूप में काम करें
कचरामुक्त शहरों के लिए घनकचरा व्यवस्थापन का
राज्यस्तरीय प्रकल्प तैयार किए जाए
- मुख्यमंत्री
मुंबई, दि. 3 : स्वच्छ सर्वेक्षण 2020 में महाराष्ट्र की शहरों ने अव्वल स्थान प्राप्त करने के लिए छोटे-छोटे शहरों के साथ बड़े शहरों ने भी एक टीम के रूप में काम करना चाहिए। कचरामुक्त शहरों के लिए घनकचरा व्यवस्थापन का राज्य मे विस्तार से (विस्तृत) प्रारूप तैयार किए जाए, यह निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने आज यहाँ पर संबंधितों को दिए। उन्होंने कहा कि शहर स्वच्छ एवं सुंदर करने के लिए एवं प्रत्येक शहरों में नागरिकों को खुशी मिल सके, ऐसे सुंदर गार्डनों का निर्माण किया जाए।
          स्वच्छ सर्वेक्षण 2020 के मद्देनजर आज मुख्यमंत्री श्री. ठाकरे ने राज्य के महानगरपालिका आयुक्त व नगरपालिकाओं के मुख्याधिकारियों से वीडियो कॉन्फरन्स के द्वारा संवाद साधा।  इस दौरान नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री अनिल परब, मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित थे।
          नगर विकास विभाग की प्रधान सचिव मनिषा म्हैसकर ने स्वच्छ महाराष्ट्र अभियान के अंतर्गत अभी तक किए गए कामों का प्रस्तुतीकरण किया।
मुख्यमंत्री ने कहा कि राज्य के शहर स्वच्छता में अग्रसर रहने के लिए सभी अच्छा काम कर रहे है। लेकिन  सर्वेक्षण में राज्य के अधिक से अधिक शहरों को प्रथम दस मानाकंन मिलने के लिए सभी ने एक साथ आकर काम करना जरूरी है। इसके लिए प्रत्येक अधिकारी ने आम नागरिक के रूप में अपने शहर की ओर देखना आवश्यक है । इससे नागरिकों को क्या चाहिए, इस बात को समझने में आसानी होगी। शहर यह देश का चेहरा होने से यहाँ के रास्ते, पदपथ, मैदान, अस्पताल स्वच्छ एवं सुंदर  रहने इसके लिए प्रयास होना चाहिए। रास्ते से चलते समय नागरिकों को खुशी महसूस हो, अपना शहर देखने के लिए विदेशों से पर्यटक आए यह भावना लोगों के मन होनी चाहिए।  इसके लिए कामों का प्राधान्यक्रम भी तया किया जाए।
         उन्होंने कहा कि  राज्य को कचरामुक्ति करने के लिए राज्यस्तरीय एकीकृत प्रारूप तैयार किया जाए। इसमें कचरा प्रक्रिया प्रकल्प, इस प्रकल्प के स्थान पर हरित पट्टा, कचरा विलगीकरण आदि को भी शामिल किया जाए। साथ ही गीला और सुका कचरा सौं फीसदी अलग करने के लिए प्रयास किया जाए। साथ ही शहरों का सौंदर्यीकरण बढ़ाने के लिए प्रत्येक शहरों ने विज्ञापन बोर्ड नीति (होर्डिंग पॉलीसी) बनाए। इस पर कौन से संदेश दिया जाए, इस पर ध्यान दिया जाए।
अमृत वन योजना के अंतर्गत शहर के खाली जगहों पर वन निर्माण करनेवाले बार्शी, नवी मुंबई, नाशिक, सांगली, उदगीर, अचलपूर आदि शहरों की सराहना करते हुए मुख्यमंत्री ने कहा कि राज्य के सभी शहरों में अमृत वन प्रकल्प चलाया जाए। साथ ही इस तरह के अमृत वन दीर्घकाल रह सके, इसके लिए इन जगहों पर देशी पेड़ लगाए जाए। इसके अलावा यह स्थान  कायमस्वरुपी रह सके, इसके लिए भी कानूनन संरक्षण दिया जाने की बात भी उन्होंने कहीं है।
बड़े शहर अधिक प्रयास करें - श्री. शिंदे
          नगरविकास मंत्री श्री. एकनाथ शिंदे ने कहा कि शहर के रास्ते, पदपथ की  स्वच्छता एवं सुरक्षितता महत्त्वपूर्ण है। स्वच्छ सर्वेक्षण में मानांकन मिलने के लिए बड़े शहरों ने अधिक प्रयास करना चाहिए।  राज्य के शहरों की ओर (दाखला) इंदोर जैसे शहरों ने ध्यान देना चाहिए, इस तरह की परिस्थिति बनाई जाए। साथ ही घातक कचरा, जैववैद्यकीय कचरा आदि  कचरे को लेकर भी प्रभावपूर्ण तरीके से काम करना जरूरी है।
नदी स्वच्छता एवं नागरी जंगल पर ध्यान दिया जाए - आदित्य ठाकरे
          मंत्री आदित्य ठाकरे ने कहा कि कचरामुक्त शहर होने पर शहरों का सौंदर्य बढ़ेगा। शहरों की स्वच्छता के साथ-साथ नदियों की स्वच्छता पर ध्यान दिया जाए। इसके लिए ग्रामविकास, नगरविकास एवं पर्यावरण विभाग ने एक साथ आकर प्रारूप बनाना चाहिए। शहरी जंगल बढ़ाने के लिए प्रयास होना जरूरी है। इसके लिए मियावाकी पद्धति से उद्यान का निर्माण किया जाए। ग्राम सड़क योजना के मद्देनजर मुख्यमंत्री शहर सड़क योजना शुरू करने की आवश्यकता है।  प्रत्येक जिले में आपदा प्रतिसाद दल निर्माण किया जाए। नागरिकों की शिकायतों के लिए ऑनलाईन पद्धति का उपयोग किया जाए।  शहरीकरण के साथ-साथ ग्रामीणीकरण भी होना जरूरी है।
इस दौरान बृहन्मुंबई, नाशिक, नवी मुंबई, औरंगाबाद इन महापालिका के आयुक्तों ने और लोणावला और  कराड नगरपालिका के मुख्याधिकारी ने स्वच्छ सर्वेक्षण में हो रहे विकास जानकारी दी।          इस वीडियो कॉन्फरन्सिंग के दौरान मंत्रालय में मुख्यमंत्री के  प्रधान सचिव विकास खारगेबृहन्मुंबई महानगरपालिका के अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी समेत नवी मुंबई, ठाणे, उल्हासनगर, मीरा भाईंदर, भिवंडी निजामपुर, पनवेल इन महानगरपालिका के आयुक्त उपस्थित थे।

००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.