सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 3 : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जंयतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आज मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.मंत्री अनिल परब, आदित्य ठाकरे, आमदार रोहित पवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, सचिव (र.वा.का.) आन्शू सिन्हा, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्याम तागडे, पर्यटन विभागाच्या सचिव विनिता वेद सिंगल यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.