अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी घेतला विविध विभागांचा आढावा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई दि. 6 : अल्पसंख्याक व कौशल्य विकास विभागाच्या मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर संबंधित विभागाविषयी मंत्री नवाब मलिक यांनी विभागांचा आढावा घेतला. यावेळी विभागातील कार्यपद्धतीविषयी संबंधित अधिकाऱ्यांकडून सादरीकरणाच्या माध्यमातून त्यांनी माहिती जाणून घेतली.

आढावा बैठकीचे आयोजन आज मंत्रालयात करण्यात आले होते. यावेळी अल्पसंख्याक विकास विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, सह सचिव स.छ. तडवी, उपसचिव दिनेश सोनवणे, अवर सचिव श्री.चौकेकर तसेच कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, आयुक्त दिपेंद्र कुशवाह, सह सचिव डॉ.सुवर्णा खरात, उपसचिव बी.एस. मांडवे यांच्यासह संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते.  
००००
प्रवीण भुरके/6.1.2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.