भारतास नव्या विचारांची आणि जुन्या आदर्शांची गरज - भगत सिंह कोश्यारी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


'ॲटोनॉमस कॉलेजेस इन इंडिया : द रोड अहेड' कार्यशाळेचे उद्घाटन

मुंबई, दि. 7 : महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये शिस्तीचे वातावरण असणे गरजेचे आहे. स्वायत्त महाविद्यालये आणि विद्यापीठांनी याबाबत विचार करुन योजना निर्मितीसाठी आपल्या सूचना कराव्यात. नवीन भारतास नव्या विचारांची आणि जुन्या आदर्शांची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

बी. के. बिर्ला महाविद्यालय (स्वायत्त) कल्याण आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडी, शिमला यांच्या संयुक्त विद्यमाने 'ॲटोनॉमस कॉलेजेस इन इंडिया : द रोड अहेड' या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे सेंचुरी भवन, वरळी येथे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, आपले शैक्षणिक काम हे बुद्धिमत्ता निर्माण करणारे आहे. स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे, ‘शिक्षण म्हणजे माणसात असलेल्या परिपूर्णतेचे प्रकटीकरण होय. हा विचार खरेच वास्तवामध्ये साध्य होतोय का, याचा विचार आपण केला पाहिजे. देशाच्या विकासामध्ये चांगल्या मनुष्यबळाची आवश्यकता असून स्वायत्त शिक्षण संस्थेच्या माध्यमातून चांगले विचार व चांगला दृष्टीकोन देणारे मनुष्यबळ निर्माण झाले पाहिजे. अशा संस्थांच्या मदतीने सृजनशील विचारांच्या माध्यमातून  शिक्षण व्यवस्थेत बदल घडविण्यासाठी व ‍विद्यार्थ्यांना नवी दिशा देण्याचे काम केले पाहिजे.

स्वायत्त महाविद्यालयांच्या  माध्यमातून आदर्श संस्कार विद्यार्थ्यांना मिळतील या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. जेणेकरुन येणारी पिढी आदर्शवत तयार होईल व देशात आपला आदर्श निर्माण करेल, असा विश्वासही राज्यपाल यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी बी.के. बिर्ला महाविद्यालय (स्वायत्त) आणि बी.के.बिर्ला पब्लिक स्कूल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ओ. आर.  चितलांगे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडी, शिमलाचे संचालक प्रा.मकरंद परांजपे, बी. के. बी. सी. के. चे संचालक डॉ. नरेंद्र चंद्रा, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर यांच्यासह स्वायत्त महाविद्यालयातील प्राचार्य तसेच प्राध्यापक यावेळी उपस्थित होते
000
प्रवीण भुरके/दि.7.1.2020



'ॲटोनॉमस कॉलेजेस इन इंडिया : द रोड अहेड' कार्यशाला
भारत को नए विचार और पुराने आदर्शों की जरूरत
-  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : महाविद्यालय और विश्वविद्यालयों में नियमों का वातावरण होना आवश्यक है. स्वायत्त महाविद्यालय और विश्वविद्यालय इस संदर्भ में विचार कर योजना निर्मिति के लिए अपनी सूचनाएं दें. नए भारत के लिए नए विचार और पुराने आदर्शो की जरूरत है, ऐसा प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ने किया.
बी. के. बिर्ला महाविद्यालय (स्वायत्त) कल्याण और इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडवान्स्ड स्टडी, शिमला के संयुक्त तत्वावधान में ॲटोनॉमस कॉलेजेस इन इंडिया’ : द रोड अहेड' इस विषयपर दो दिवसीय कार्यशाला का सेंचुरी भवन, वरली में आयोजन किया गया है. इस कार्यशाला का उद्घाटन  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी के हाथों हुआ. इस समय वे बोल रहे थे.
राज्यपाल श्री. कोश्यारी ने कहा, अपना शैक्षिक काम बुद्धिमत्ता निर्माण करनेवाला है. स्वामी विवेकानंद ने कहा है कि शिक्षण यानी मनुष्य के परिपूर्णता का प्रकटीकरण है. यह विचार वास्तविकता साध्य हो रहा है या नहीं, इसका विचार हमें करना होगा. देश के विकास के लिए अच्छे श्रमशक्ति की जरूरत है. स्वायत्त शिक्षण संस्थानों के माध्यम से अच्छे विचार और अच्छा दृष्टिकोण देनेवाली श्रमशक्ति तैयार होनी चाहिए. ऐसे संस्थाओं की मदद से सृजनशील विचारों के माध्यम से शिक्षण व्यवस्था में बदलाव लाने के लिए और विद्यार्थियों को नई दिशा देने का काम किया जाना चाहिए.
स्वायत्त महाविद्यालयों के  माध्यम से आदर्श संस्कार विद्यार्थियों को मिलें, इस दृष्टि से प्रयास किए जाने चाहिए. जिसके की आनेवाली पीढ़ी आदर्श तैयार हो और देश में अपना आदर्श निर्माण करेगा, ऐसा विश्वास राज्यपाल ने इस समय व्यक्त किया. 
इस समय बी.के. बिर्ला महाविद्यालय (स्वायत्त) और बी.के.बिर्ला पब्लिक स्कूल गवर्निग कौन्सिल के अध्यक्ष ओ. आर.  चितलांगे, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ ॲडवान्स्ड स्टडी, शिमला के संचालक प्रा.मकरंद परांजपे, बी. के. बी. सी. के. के संचालक डॉ. नरेंद्र चंद्रा, मुंबई विश्वविद्यालय के कुलगुरु सुहास पेडणेकर के समेत स्वायत्त महाविद्यालयों के प्राचार्य तथा प्राध्यापक इस समय उपस्थित थे.

००००



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.