शिवभोजन योजनेचा शुभारंभ २६ जानेवारी रोजी - अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचा आढावा


मुंबईदि. ९ : राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करुन देण्याच्या योजनेचा शुभारंभ २६ जानेवारी २०२० रोजी होणार असल्याची माहिती अन्ननागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिली.           

अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठक‍ आज मंत्रालयात आयोजित केली होती त्यावेळी श्री. भुजबळ बोलत होते.           

श्री. भुजबळ म्हणालेशिवभोजन योजनेअंतर्गत सुरु करण्यात येणाऱ्या भोजनालयात २ चपात्या, १ वाटी भाजी, १ मूद भात व १ वाटी वरण समाविष्ट असलेली जेवणाची थाळी १० रुपयाला देण्यात येईल.  या विभागातंर्गत येणाऱ्या सर्व सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे सक्षमीकरण करुन वाजवी दरात आवश्यक वस्तूंची ग्राहकांना उपलब्धता करुन देणार आहे. सार्वजनिक वितरणासाठी आवश्यक असलेली साठवणूक क्षमता आधुनिक व सक्षम करणार आहे. प्रत्येक शिधापत्रिकेतमहिला सक्षमीकरणासाठी शिधापत्रिका कुटुंब प्रमुख म्हणून कुटुंबातील ज्येष्ठ महिला सदस्याची निवड करण्यात येणार आहे. NFSAमध्ये अंत्योदय अन्न योजना लाभार्थ्यांना प्रति महिना 35 किलो धान्य आणि पीएचएच / एपीएल शेतकरी लाभार्थ्यांना प्रती महिना 5 किलो प्रती व्यक्ती धान्य दिले जात आहे. याव्यतिरिक्तशेतकरी आत्महत्याप्रवण जिल्हेविद्यार्थी वसतिगृहे, आश्रम शाळाबालगृहे आणि कल्याणकारी संस्था यांना अनुदानित अन्नधान्य पुरवठा केला जाईल. हे उपक्रम अधिक चांगल्या प्रकारे  राबविण्यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. यासाठी  आवश्यक ती सर्व मदत शासनामार्फत केली जाईल.     

रास्त भावधान्य दुकानदारांचे सक्षमीकरणसंगणीकृत सार्वजनिक वितरण व्यवस्थासार्वजनिक  व्यवस्थेद्वारे केरोसीन वितरणसुधारीत धान्य वितरण प्रणालीपसंतीनुसार थेट लाभ हस्तांतरण (DBT), कल्याणकारी संस्था व वसतीगृह योजनागोदाम व्यवस्थापनतांदुळ फोर्टीफीकेशनशिवभोजन योजनेच्या तयारीचा आढावाभविष्यातील विभागाची वाटचालवैधमापन शास्त्र विभाग व ग्राहक संरक्षण विभागाची माहितीविभागातील रिक्त पदांचा आढावा श्री.भुजबळ यांनी सादरीकरणातून घेतला.              

यावेळी अन्ननागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव महेश पाठकवैध मापन शास्त्र नियंत्रक अमिताभ गुप्ता यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.