राज्यात ११ जानेवारीपासून 'रस्ता सुरक्षा अभियान २०२०'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 9 : केंद्र शासनाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहासोबतच राज्यात दिनांक 11 ते 17 जानेवारी 2020 या कालावधीत '31वे रस्ता सुरक्षा अभियान 2020' साजरा करण्यात येत आहे.

मोटार वाहन अपघातास परिणामकारकरित्या आळा बसावा व नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने दरवर्षी देशभरात रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात करण्यात येतो.

रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत परिवहन विभागवाहतूक पोलीस विभागआरोग्य विभागसार्वजनिक बांधकाम विभागशालेय शिक्षण विभाग व इतर संबंधित संस्था व संघटना यांच्या सहकार्याने रस्ता सुरक्षिततेसाठी जनजागृती व जनप्रबोधनाकरिता विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा रस्ते सुरक्षा समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीने रस्ता सुरक्षा अभियान 2020 करिता जिल्ह्यातील अंमलबजावणी व नियोजनाबाबत समितीची बैठक घेऊन संबंधिताना निर्देश देण्यात यावे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात यावेअसे आवाहन गृह (परिवहन) विभागाद्वारे करण्यात आले आहे.

वाहन चालवत असताना नियमांचे उल्लंघन होऊ नये. निष्काळजीपणे वाहन चालविल्याने चालकासोबत प्रवाशांचा जीव धोक्यात येतो. म्हणून अपघात रोखण्यासाठी व सुरक्षित प्रवासासाठी लोकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे असते. रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या माध्यमातून लोकांना वाहन चालविताना तसेच रस्त्यावर चालत असताना आपण कशी काळजी घेतली पाहिजेयासाठी वाहतूक नियमांचे महत्त्व सांगून जनजागृती करणे आवश्यक आहे.

जनजागृतीपर राबविण्यात येणारे उपक्रम
सुरक्षा अभियान 2020 करिता परिवहन विभाग तसेच पोलीस (वाहतूक) विभाग यांच्याद्वारे चौकसभा घेणेबॅनर्स लावणेमाहितीपत्रकेहॅन्डबिलवाहनचालकांची वाहतूक प्रबोधनपर कार्यशाळा आयोजित करणेअपघातातील जखमींचा जीव वाचविणे व त्यांच्यावर तातडीने उपचार करणे तसेच शालेय विद्यार्थ्यांचे प्रबोधन असे अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्याव्दारे वाहन चालकांची प्रबोधन शिबीर घेणेएस.टी वाहनातून रस्ते सुरक्षिततेसंदर्भात कायमस्वरूपी फिरते प्रदर्शन आयोजित करणेअपघातप्रवण वाहनचालकांसाठी समुपदेशन/सिम्युलेटर प्रशिक्षण अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे प्रवासी मार्गदर्शक बोर्ड लावणेरस्ता दुरुस्तीचे ठिकाणी सावधानतेचा इशारा व उपाययोजनाखड्डे दुरुस्तीसाईनबोर्ड व माहितीचे बोर्ड असे अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याद्वारे ब्लॅक स्पॉटझेब्रा क्रॉसिंगअसे अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. महानगरपालिका व नगरपालिका यांच्याव्दारे रस्त्यांची दुरूस्ती व देखभाल करणेपादचाऱ्यांकरिता सोयी-सुविधाझेब्रा क्रॉसिंगजनजागृती व चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे.

शालेय शिक्षण विभागाद्वारे चर्चासत्राचे आयोजनरस्ता सुरक्षा विषयाचा पाठ्यक्रमांत समावेश करणेएनसीसी व एनएसएसच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा अभियान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणेविषयासंबंधी चित्रकला स्पर्धेचे आयोजन असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे इमर्जन्सी टीमवैद्यकिय शिबिरांचे आयोजनगोल्डन अवर प्रथमोपचाराचे प्रशिक्षण हे उपक्रम व अपघातातील जखमींचा जीव वाचविणे व त्यांच्यावर तातडीने उपचार करणे- यामध्ये अपघातावेळी तेथे उपस्थित असलेल्या व्यक्तींचे प्रथम प्राधान्य अपघातग्रस्त व्यक्तींचा जीव वाचविणे व त्यांना लवकरात लवकर वैद्यकीय उपचार मिळवून देणेहे असले पाहिजे आणि अपघातग्रस्त व्यक्तींवर तातडीने उपचार करण्याऱ्या वैद्यकीय व्यवसायिकांना तसे करण्यामध्ये कोणताही कायदेशीर अडथळा/त्रास संभवत नाहीया सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालास प्रसिध्दी देवून त्या माध्यमातून जनजागृती करून 108 क्रमांकाचा आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा वापर करण्यासाठी प्रबोधन करण्यात येणार आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.