मंत्री सुनिल केदार यांनी स्वीकारला कार्यभार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबईदि. ९ : मंत्री सुनिल केदार यांनी आज पशुसंवर्धनदुग्ध व्यवसाय विकासक्रीडा व युवक कल्याण विभागाचा कार्यभार स्वीकारला. मंत्रालयातील मुख्य इमारतीतील दालन क्र.२०१ हे त्यांचे कार्यालय आहे. पदभार स्वीकारताना माजी आमदार राजू तिमांडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.            

श्री.केदार म्हणालेमी पहिल्यांदा राज्यमंत्री झालो तेव्हा माझे स्व.माँसाहेब मिनाताई ठाकरे यांनी औक्षण करुन मला आशिर्वाद दिला होता. पदभार स्वीकारण्यापूर्वी मी काल स्व.मिनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले आणि आजही पदभार स्वीकारल्यानंतर स्व.मिनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.            

श्री.केदार म्हणालेमाझ्याकडे पशुसंवर्धनदुग्ध व्यवसाय विकासक्रीडा व युवक कल्याण या खात्यांचे मंत्रीपद मिळाले असून या माध्यमातून राज्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. युवकांच्या कल्याणासाठी प्राधान्य देऊन राज्याच्या विकासासाठी काम करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.           

पदभार स्वीकारण्यापूर्वी श्री.केदार यांनी मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन वंदन केले.
000
राजू धोत्रे/वि.सं.अ./9.01.2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.