पोलिसांना सर्वोत्तम प्रशिक्षण,अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी कटिबद्ध - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

पोलीस वर्धापन दिन समारंभात प्रथमच संचलनासह मुख्यमंत्र्यांना मानवंदना

मुंबई, दि. २ : "आपल्या हिमतीने शिवरायांच्या महाराष्ट्राची मान जगात उंचवा. त्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाला आवश्यक असणारे जगात उपलब्ध असे सर्वोत्तम प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधांचे पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिली. महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त आयोजित संचलन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मरोळ येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र प्रांगणात आयोजित या समारंभात पोलीस दलातील विविध विभागांच्या पथकांनी शानदार संचलन करून मानवंदना दिली. महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात प्रथमच ध्वजप्रदान दिनानिमित्त असे संचलन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या पहिल्याच संचलनात मानवंदना स्वीकारण्याची संधी मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी हा क्षण आयुष्यातील अनमोल ठेवा बनल्याचे नमूद केले.

या संचलनात राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या पोलीस वाद्यवृंद पथकांनी संस्मरणीय अशा धून सादर करून रंग भरला. तर विशेष सुरक्षा विभागाने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेशी निगडित प्रात्यक्षिकांनी थरार निर्माण केला.संचलनास मंत्री आदित्य ठाकरे, आमदार रमेश लटके, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायसवाल, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सुरुवातीलाच उपस्थितांना आणि विशेषतः पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, वर्ष संपताना नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील दीक्षान्त समारंभास तर नवीन वर्ष सुरू होताना या देखण्या आणि शिस्तबद्ध संचलनाचे साक्षीदार होता आले, हा आनंददायी योगायोग आहे. महाराष्ट्र पोलीस दलाला तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते ध्वज प्रदान करण्यात आला होता. हा ध्वजाचा मान मिळविणे जितके अभिमानास्पद आहे, तितकेच हा मान टिकवणे आणि वाढविणे महत्त्वाचे आहे. पोलिसांसाठी या "अभय मुद्रा" वरील ब्रीदवाक्याप्रमाणे कर्तव्य बजावण्याची कठीण जबाबदारी असते. त्यामध्ये ताण-तणाव स्वीकारून, इतरांना निर्धास्त करावे लागते. पोलिसांच्या खबरदारीमुळेच सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत निर्धास्तपणे केले. त्यासाठी पोलिसांना "मानाचा मुजरा" या शब्दांत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी कौतुकोद्गार काढले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, बदलत्या कालानुरूप पोलिसांपुढे आव्हानंही मोठी आहेत. विघातक शक्ती अत्याधुनिक गोष्टी वापरू लागले आहेत. त्यामुळे त्यांचा मुकाबला करण्यासाठी पोलिसांना एक पाऊल पुढे राहावे लागेल. यासाठी जगात उपलब्ध असे सर्वोत्तम प्रशिक्षण आणि सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न असेल. सुविधाच्या रुपाने पाठबळ दिले जाईल. त्यातून त्यांनी हिंमत कमवावी अशी अपेक्षा आहे. या हिमतीमुळेच शिवरायांच्या महाराष्ट्राची मान आणखी उंचावता येईल. त्यामुळे पोलिस दलाला पाठबळ देण्यासाठी वचनबद्ध असल्याचा पुनरूच्चारही त्यांनी केला.

सुरुवातीला राज्य राखीव पोलीस दल, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी, मुंबई पोलीस यांच्यासह विविध पथकांनी बंदुकीच्या हवेत फैरी झाडून सलामी दिली. त्यानंतर शानदार संचलनासह मानवंदना दिली. परेड कमांडर पोलीस उपायुक्त अखिलेश कुमार सिंह यांच्या नेतृत्वात संचलन करण्यात आले. पोलीस निरीक्षक संजय कल्याणी यांच्या नेतृत्वात पोलीस वाद्यवृंद पथकांनी सुश्राव्य धून सादर केल्या.

संचलन समारंभात प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य तुषार दोशी यांनी आभार मानले.

मुख्यमंत्र्यांनी उलगडले ऋणानुबंध

महाराष्ट्र पोलीस दलाला २ जानेवारी १९६१ ला तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत ध्वज प्रदान केला. हा ध्वज जे. जे. स्कूल ऑफ आर्टसचे प्राचार्य व्ही. एन. आडारकर यांच्या संकल्पनेतून साकारला आहे. प्राचार्य आडारकर हे  मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या कलानगर मध्येच राहतात. तसेच स्वतः मुख्यमंत्री ठाकरे हे जे.जे. स्कूल ऑफ आर्टसचे विद्यार्थी. त्यामुळे ध्वज प्रदानाच्या निमित्ताने आयोजित आणि त्यातही पहिल्यांदाच संचलनासह होणाऱ्या या समारंभास उपस्थित राहता आले. असाही पोलिसांशी ऋणानुबंध जोडल्याचा पट मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी भाषणात उलगडला.


पोलिसांच्या निवासस्थान संकुलाचे भूमिपूजन संपन्न

महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या वतीने मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी बांधण्यात येणाऱ्या मरोळ येथील निवासस्थानाच्या प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

या प्रकल्पात प्रशासकीय इमारत, विश्रांतीगृह, वसतिगृह, क्रिडासंकुल यांच्यासह सर्व सुविधायुक्त ४४८ सदनिकांचे बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी तळमजल्यासह सात मजल्यांच्या सोळा इमारती उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे २२५ कोटी १३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यावेळी पोलीस महासंचालक (गृहनिर्माण) बिपीन बिहारी यांनी स्वागत केले व प्रकल्पाची माहिती दिली.

फोर्स वनच्या प्रशिक्षण केंद्राचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

फोर्स वन या विशेष पोलिस दलाच्या जोगेश्वरी येथील प्रशिक्षण केंद्रास मुख्यमंत्री श्री. ठाकरे , मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. याप्रसंगी पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायसवाल, प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख तथा अतिरिक्त पोलीस महासंचालक सुखविंदर सिंह उपस्थित होते. या केंद्राने नुकताच पुणे येथे झालेल्या अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले आहे. यासह नेमबाजी आणि प्रशिक्षणातील काठीण्यपातळीतील प्राविण्यासाठीची पदके पटकाविली आहेत. या बाबींचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी विशेष कौतुक केले.

महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज
महाराष्ट्र पोलीस दल दरवर्षी २ जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन म्हणून साजरा करते. महाराष्ट्र पोलीस दलास या दिवशी भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पोलीस ध्वज प्रदान करण्यात आला होता. ज्यामुळे महाराष्ट्र पोलीसांना विशेष दर्जा मिळाला. या ध्वजावर पोलीस दलाचे 'अभय मुद्रा' हे बोधचिन्ह म्हणजे उजव्या हाताचा पंजा चित्रांकित आहे. त्यामध्येच "वाईटाचा नाश आणि चांगल्याचे रक्षण" या अर्थाचे जनतेला संरक्षणाची ग्वाही देणारे "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" हे संस्कृतमधील पोलिसांचे ब्रीद समाविष्ट आहे.
०००००

Government is committed to give best training and
facilities to the police force
- Chief Minister Uddhav Thackeray
Chief Minister received the guard of honor on Police Anniversary Day

Mumbai, 2.Jan : Maharashtra police will uphold the pride and honour of Chatrapati Shivaji Maharaj’s state through out the world. Police Force will be provided with the best training and state-of-the-art facilities" promised Chief Minister Uddhav Thackeray.

He was speaking in a ceremony organized on the occasion of Police Anniversary Day, at the Police Training Center, Marol. For the first time in the history of the Maharashtra Police Force, a parade has been launched to mark the occasion.  In this movement, police orchestras from different districts of the state colored the program by presenting memorable tune. On the other hand, demonstrations related to the security of the most important persons were presented by the Special Security Department.

Minister Aditya Thackeray, MLA Ramesh Latke, Additional Home Secretary Sanjay Kumar, Director General of Police Subodh Kumar Jaiswal, Mumbai Police Commissioner Sanjay Barve along with senior officers were present on the occasion.

Mr. Thackeray initially gave news year wishes to the all present people and especially to the police officers, employees. He further said, it was a pleasant coincidence that he could witness the convocation ceremony at the Police Training Center in Nashik at the end of the year and anniversary program at the beginning of the New Year. The flag was handed over to the Maharashtra Police Force by the former Prime Minister Jawaharlal Nehru. As proud as it was to receive this flag, it was important to maintain and enhance it.

“Sadrakshanay Khalnigrahnay” (Protecting the righteous while controlling and annihilating the evil) is the motto of Maharashtra Police and it is a difficult task for the police to perform their duties according to this motto. They have been working in stress. Due to the vigilance of the police, we are assured while giving farewell to the last year and welcoming New Year” said Chief Minister.

He further added that the according to changing time, challenges were even bigger in front of police. Deadly forces were using modern thing to commit the crime. Therefore, the police would have to go one step further to combat them. Hence state government would try to get the best training and facilities in the world available for them. These facilities and training would increase their courage.

Initially, various teams including State Reserve Police Force, Maharashtra Police Academy and Mumbai Police opened fire on the gun. It was followed by a spectacular performance. The parade was led by Deputy Commissioner of Police Akhilesh Kumar Singh while Police orchestras led by police inspector Sanjay Kalyani. Principal of the training center Tushar Doshi gave the vote of thanks.

The Chief Minister unveiled the sentiments

Maharashtra Police Force got the flag at the hands of then Prime Minister Jawaharlal Nehru on January 2, 1961 in the presence of former Chief Minister Yashwantrao Chavan. The concept of this flag was of V. N. Adarkar, Principal of J. J.School of Arts. Principal Adarkar live at Kalanagar where Chief Minister, Thackeray's residence is located. Also, the Chief Minister himself was a student of the J.J. School of Art. Hence Mr. Thackeray felt very fortunate that he could attend the ceremony was organized for the purpose of flag-giving and parade for the first time.

Bhoomipujan of the police residence complex

Chief Minister Uddhav Thackeray performed the Bhoomipujan of residence project conducted by Maharashtra State Police Housing and Welfare Corporation for officers and employees of Mumbai Police Force.

Construction of 448 residence with all required facilities along with administrative building, rest house, hostel, sports complex will be done under this protection.  Sixteen buildings having seven floors will be erected in this residence complex. Total expenditure of this project is Rs 225.13 crore. 

Bipin Bihari, Director General of Police (Housing) welcomed all guests and informed about the project.

CM appreciates Force One's training center

Chief Minister Uddhav Thackeray and Minister Aditya Thackeray visited training center of special squad Force One at Jogeshwari. Director General of Police Subodh Kumar Jaiswal, Head of Training Centers and Additional Director General of Police Sukhwinder Singh were present on the occasion. The center recently won a gold medal in the All India Police Commando Competition in Pune. Along with this, it has won medals in shooting and rigorous training. Chief Minister praised this training center.

Flag of Maharashtra Police Force

The Maharashtra Police Force celebrates its anniversary every year on the 2nd January. On this day of the Maharashtra Police force had received a flag at the hands of the first Indian Prime Minister, Pandit Jawaharlal Nehru. This gave special status to Maharashtra Police force. A picture of police force’s ‘Abhay Mudra’ (right hand paw) and motto of police ‘Sadrakshnay Khalnigrahnay’ are on this flag.

0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.