महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रे कमी करण्यासाठी कृती आराखडा सादर करण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे निर्देश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, 14 : राज्यातील राज्य व जिल्हा मार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रे (ब्लॅक स्पॉट) कमी करण्यासाठी कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. अशोक चव्हाण यांनी आज दिले.

रस्ते सुरक्षेसंदर्भात विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांचा आढावा आज श्री. चव्हाण यांनी मंत्रालयात घेतला. त्यावेळी ते बोलत होते. प्रधान सचिव मनोज सौनिक, सचिव (रस्ते) सी. पी. जोशी, सचिव (बांधकामे) अजित सगणे आदी उपस्थित होते.

श्री. चव्हाण म्हणाले, राज्यात राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावर 325 ठिकाणी अपघातप्रवण क्षेत्रे असून त्यापैकी 242 ठिकाणांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित कामे सुरू आहेत.  राज्य व जिल्हा मार्गावरील अपघात कमी व्हावेत, यासाठी अपघातप्रवण क्षेत्रे (ब्लॅक स्पॉट) शोधून तेथे अपघात होऊ नयेत, यासाठी उपाय योजावेत. यासाठी कालमर्यादा ठरवून विशेष मोहीम आखण्यात यावी. तसेच महामार्गावरील चौकांचे सुशोभिकरण करण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीचा वापर करावा. महामार्गावर दुतर्फा वृक्षारोपण करण्यासाठी तज्ञांचा सल्ला घेऊन जूनमध्ये वृक्षारोपण मोहिम आखावी.

वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे घाट रस्त्यांची दुरवस्था होते.  अशा रस्त्यांचे काँक्रिटीकरण करावे आणि हे रस्ते सुव्यवस्थित रहावे म्हणून उपाययोजना करावेत. तसेच फुट ओव्हर ब्रिजच्या धोरणासंदर्भात फेरविचार करण्याचे निर्देशही श्री. चव्हाण यांनी यावेळी दिले.
००००
नंदकुमार वाघमारे/विसंअ/14.1.2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.